- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भाजपचे जेष्ठ नेते माजी आमदार कोरोनाग्रस्त;ओझोन मध्ये उपचार सुरू
अकोला: कोरोना महामारीने अकोल्यात भयावह स्थिती निर्माण झाली आहे. सामान्य माणसाची मदत करण्यासाठी अनेक हात अकोल्यात सरसावले. त्यात अग्रेसर होते, भाजपचे जेष्ठ नेते माजी आमदार डॉ जगन्नाथ ढोणे.आज सकाळी रविवारी २१ जून रोजी त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून ,सध्या डॉ ढोणे हे ओझोन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याची माहिती त्यांचे निकटवर्तीय धनंजय मिश्रा यांनी दिली.
कोरोना संकटातून नागरिकांचा बचाव व्हावा, यासाठी त्यांनी आतापर्यंत कमीतकमी दहा हजार मास्क आणि तेवढाच आयुर्वेदिक काढा वितरित केला. खरे तर त्यांना त्यांच्या संस्थेकडून पीएम केयर आणि सी एम केयर फंड मध्ये डोनेशन देण्याची इच्छा होती. परंतू, मित्र मंडळीने त्यांना मास्क निर्मिती करून वाटप करण्याचा सल्ला दिला होता.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते आयुर्वेदिक काढ्याचे तर मास्क वितरण शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते एप्रिल मध्ये पार पडला होता. पण निसर्गाची रितच वेगळी असते, त्यांनाही कोरोनाने सोडले नाही. डॉ ढोणे हे एम एस सर्जन आहेत. भाजपा मध्ये प्रवेश घेण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय होते.सध्या डॉ जगन्नाथ ढोणे हे ओझोन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.कोरोनावर मात करून ते लवकर बरे व्हावे,अशी अकोलेकर प्रार्थना करीत आहेत.
...............
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा