Corona virus effect:जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची धास्ती!

अकोला जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची धास्ती!

*परिसरात कोविड-19चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी कार्यवाही करण्याची मुख्यधिकारीकडे केली मागणी

*नाशिक जिल्हा परिषद मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने अकोला जि. प. कर्मचारी सतर्क

अकोला: नाशिक जिल्हा परिषदेमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे वृत्त एका दैनिकामध्ये प्रसिध्द झाले. त्यामुळे अकोला जिल्हा परिषदेमध्ये याची पुनरावृत्ती होऊ नये, याकरिता प्रशासना मार्फत तातडीने उपाययोजना करण्याकरिता सोमवारी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी सूरज गोहाड उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा),  विद्या पवार मुख्य लेखा व वित्त अधिकारी तसेच संघटनेच्या वतीने सुनिल जानोरकर, राज्य सरचिटणीस विलास वरोकार, जिल्हाध्यक्ष राम मेहरे, कार्याध्यक्ष गिरीश मोगरे, जिल्हा सचिव, राजेंद्र भटकर, नितीन सुदालकर उपस्थित होते.

सद्यस्थितीत अकोला जिल्हयामध्ये कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर झाला असून,रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थिती मध्ये जिल्हा परिषद अंतर्गत सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषद मुख्यालयातील कार्यालया मध्ये योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात तालुक्यातील व जिल्हा मुख्यालयामधील ब-याच कर्मचाऱ्यां कडून  कार्यालयामध्ये योग्य ती दक्षता घेण्यात येत नसल्या बाबत संघटनेकडे नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच याबाबत  संघटनेने पडताळणी केली असता,
जिल्हा परिषद मुख्यालया मधील विविध कार्यालयामध्ये योग्य ती काळजी घेण्यात येत नसल्याचे दिसुन आले. ब-याच कार्यालयामध्ये स्वच्छता होत नसल्याचे चित्र आहे. तसेच कार्यालयामधील प्रसाधन गृहांची अवस्था सुध्दा दयनीय झालेली आहे. त्याचप्रमाणे कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वारावर कोणत्याच प्रकारची
प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेली नाही. यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची धास्ती बसलेली आहे,असे निवेदनात नमूद केले आहे.

कोरोना आजाराचे गांर्भीय लक्षात
घेता, जिल्हा परिषद मुख्यालय व सर्व पंचायत समिती कार्यालयामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्या बाबत संबधीतास योग्य ते निर्देश देण्यात यावेत. जेणे करुनया रोगाचा प्रादुर्भाव हा कार्यालयामध्ये होणार नाही,असे निवेदनात शेवटी नमूद केले आहे.

............

टिप्पण्या