- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Akola: कोरोना अलर्ट:आज दिवसभरात 27 पॉझिटिव्ह; 5 रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यू
*आज शनिवार दि. २० जून २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल- ३२३*
*पॉझिटीव्ह- २७*
*निगेटीव्ह- २९६*
*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन्ही पुरुष आहेत.
त्यातील जवाहर नगर व जठारपेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान आज(दि. २०) रोजी उपचार घेताना ५ रुग्णाचा मृत्यू झाला. त्यापैकी शंकर नगर, अकोट फैल येथील ६३ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला असून ते दि. १६ जून रोजी दाखल झाले होते, गुलजारपूरा येथील ६२ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला असून ते दि. १६ जून रोजी दाखल झाले होते, पातूर येथील ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून ती दि. १५ जून रोजी दाखल झाले होती, मोठी उमरी येथील ५५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला असून ते दि. ८ जून रोजी शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल झाले होते त्याना ओझोन हॉस्पीटल येथे दि. १४ जून रोजी रेफर करण्यात आले होते. त्यांचा मृत्यू ओझोन हॉस्पीटल येथे आज झाला आहे, तर अकबर प्लॉट, अकोट येथील ७५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला असून ते दि. ५ जून रोजी दाखल झाले होते. त्यांचादि.१९ जून रोजी मृत्यू झाला आहे.
आज दुपारनंतर १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील सहा जणांना घरी तर चार जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह* *अहवाल-११६३*
*मयत-६४ (६३+१), डिस्चार्ज- ७५२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह *पॉझिटीव्ह)- ३४७*
*(शासकीय वैद्यकीय* *महाविद्यालयाकडून प्राप्त *माहितीनुसार)*
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा