Child marriage:'बाल विवाह प्रतिबंधक कायदा व ग्रामसेवकांची भूमिका' या विषयावर वेबिनार

'बाल विवाह प्रतिबंधक कायदा व ग्रामसेवकांची भूमिका' या विषयावर वेबिनार
अकोला: 'बाल विवाह प्रतिबंधक कायदा २००६ व ग्रामसेवकांची भूमिका' या विषयावार,  तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटी अकोला द्वारासंचलित चाईल्ड लाईन (1098) व संकल्प साधना संस्था व्दारा मंगळवारी वेबिनारचे आयोजन केले होते.

बालविवाह प्रतिबंधक कायदा व यामधे ग्रामसेवकांची भूमिका यावर सखोल मार्गदर्शन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुभाष पवार यांनी  केले. कुठेही बालविवाह होत असेल तर कोणताही व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये त्या परिवारा विरुद्ध तक्रार देवू शकतो, अशी विशेष माहिती आपल्या मार्गदर्शनात त्यांनी दिली.
 यावेळी  ऍड. सुनीता कपिले यांनी बाल विवाह प्रकरणात बाल कल्याण समितीची भूमिका स्पष्ट केली. तसेच ऍड.संजय सेंगर यांनी बाल विवाह प्रतिबंधक कायदा २००६ यावर मार्गदर्शन केले. सोबत बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण )अधिनियम २०१५ या कायद्यातील कलमांचा उपयोग करता येईल असे मत व्यक्त केले.
बाल विवाह हे बहुदा ग्रामीण भागात होत असतात असा अनेक लोकांचा समज आहे हे जरी खरे असेल तरी शहरी भागामध्ये सुद्धा बाल विवाहाचे  प्रमाण कमी नाही म्हणून शहरी भागला ज्या दृष्टीने पहिल्या जाते त्याच दृष्टीने ग्रामीण भागाकडे पाहण्याची आज आवश्यकता आहे. देशातून बाल विवाह ही कुप्रथा नष्ट करणे काळाची गरज आहे. असं मत त्यांनी व्यक्त केले.

बालविवाह मुक्त  सक्षम भारत निर्माण करण्याचे स्वप्न बघणारे  अनेक मान्यवर या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते.
वेबिनारला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सुभाष पवार (मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.अकोला), बाल कल्याण समिती अकोलाच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी, बाल कल्याण समिती अकोलाच्या सदस्या ऍड.सुनीता कपिले आमंत्रित होत्या. मार्गदर्शक म्हणून ऍड.संजय सेंगर, (सदस्य, बाल न्याय मंडळ, अकोला), ऍड.अनिता शिंदे-गुरव ( सदस्या  बाल न्यायमंडळ अकोला) यांचे मार्गदर्शन लाभले.

वेबिनारचे संचालन पदमाकर सदांशिव  (जिल्हा समुपदेशक चाइल्ड लाइन ) यांनी केले.प्रास्ताविक  सुगत वाघमारे यांनी केले. आभार प्रदर्शन हर्षाली गजभिये (जिल्हा समन्वयक चाइल्ड लाइन,अकोला) यांनी केले. कार्यक्रमाला  विष्णुदास मुंडोकर, चाइल्ड लाइन डायरेक्टर,अकोला आणि सर्व ग्राम सेवक यांची उपस्थिती होती.वेबिनार मध्ये ३७ मान्यवरांनी भाग घेतला.तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष सुगत वाघमारे यांच्या संकल्पनेतून वेबिनारचे आयोजन केले होते. 


टिप्पण्या