- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
'प्रभात'ची सानिका ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत देशातून प्रथम
अकोला: राष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या लेक्सिकन सुपर स्पीकर या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रभात ज्युनियर कॉलेजची विद्यार्थीनी सानिका दशरत जुमळे हीने बेस्ट स्पीकर इन इंग्लिश हा पुरस्कार घेतला असून देशातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
द लेक्सिकन ग्रुप ऑफ इन्स्टिंट्यूटस, पूणे द्वारे ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा चार गटात घेण्यात आली. या स्पर्धेसाठी 'सकारात्मकता-सर्वात मोठी रोगप्रतिकारक शक्ती', 'शारीरिक स्वरूपात अंतर राखा; मानसिक नाही', 'नैसर्गिक आपत्त्ती निवारण काळाची गरज', 'सर्व काही महत्त्वाचे', 'वर्ष २०५०' इत्यादी विषय देण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातील विद्यार्थांनी सहभाग नोदवला. सानिकाने इंग्रजी गटातून सकारात्मकता-सर्वात मोठी रोगप्रतिकारक शक्ती या विषयावर आपले मत प्रभावीपणे मांडले व तिची अंतीम फेरीसाठी निवड झाली.
अंतिम फेरीमध्ये जनमताच्या आधारे सानिकाची बेस्ट स्पीकर इन इंग्लिश या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सानिकाला तिची आई रिना जुमळे व प्रभातचे सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे यांचे मार्गदर्शन लाभले.
सानिकाच्या या यशाबदल प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर, शैक्षणिक संचालक कांचन पटोकार, प्राचार्य वृषाली वाघमारे व उपप्राचार्य अर्चना बेलसरे, व्यवस्थापक अभिजीत जोशी यांनी कौतुक केले आहे.

.........
टिप्पण्या
Congratulations Sanika
उत्तर द्याहटवा