India-China:पंतप्रधानांनी चिनी मालावर भारतात बंदी घालावी- योगेश ढोरे

पंतप्रधानांनी चिनी मालावर भारतात बंदी घालावी- योगेश ढोरे

मातोश्री प्रतिष्ठानने केला चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा दहन


अकोला : गलवान घाटीमध्ये भारत आणि चीन मध्ये युद्ध स्थिती निर्माण झाली असून,  भारतीय सैन्यावर हल्ला केला. यामध्ये तीन सैनिक व एक अधिकारी आणि  दुसरे दिवशी २० भारतीय जवान शहिद झाले. 
हा हल्ला भ्याड स्वरुपाचा व भारताचा विश्वास घातच असून चीनला धडा शिकवण्यासाठी भारतीय जवानांनी सुध्दा त्यांना प्रतिउत्तर दिले. यामध्ये चीनच्या ४३ जवानांना प्राण गमवावे लागले.भारतीय सैन्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शुक्रवारी दहन करण्यात आले. तसेच चिनी वस्तुची होळी करण्यात आली . यावेळी चीनच्या राष्ट्राध्यक्ष यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला 'जोडे मारो आंदोलन' करण्यात आले.

"चीनी वस्तुचा वापर टाळा व स्वदेशी वस्तु वापरण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी जनजागृती करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनी मालावर भारतात बंदी घालावी. म्हणजे भारतातच चिनी वस्तू आल्या नाही तर लोक चिनी वस्तू वापरणार नाहीत."

योगेश ढोरे
अध्यक्ष, मातोश्री प्रतिष्ठान


भारतीय शहिदांना श्रद्धांजली
पुतळा दहन नंतर भारतीय शहीद वीर पुत्रांना श्रध्दांजली अर्पण करून, शांती मार्गाने आंदोलनाचा समारोप करण्यात आला.

व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा

मातोश्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष योगेश ढोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी उदय घोगरे , गजानन गोलाईत , शिवादल मित्र परिवारचे अध्यक्ष अक्षय झटाले , सुधीर शिंदे , शुभम इंगळे , प्रवीण श्रीवास्तव , श्याम वाफदाने , रोहित इचे , रामराज्य प्रतिष्ठान अध्यक्ष धिरज देशमुख, चेतन तोडकर , दीपक काटे , भरत यादव , पंकज बाजड , हरीश पांडे , अभिषेक वानखडे , भुषण शेळके , विकास ताले , विजय बुडुकले , शुभम वाकोडे यांच्यासह संपुर्ण मातोश्री प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.
........................
 

टिप्पण्या