अकोला:संचारबंदीत ३० जून पर्यंत वाढ; शहर व ग्रामीण भागात आदेश लागू

अकोला:संचारबंदीत ३० जून पर्यंत वाढ; शहर व ग्रामीण भागात आदेश लागू

अकोला,दि.२ :  महाराष्‍ट्र शासन, महसूल व वन विभाग यांच्या पत्रानुसार दि.३० जून पर्यंत लॉकडाऊन चा कालावधी वाढविण्‍यात आला असून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्‍यात आल्‍या आहेत.  त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनीही याच संदर्भात २१ मे रोजी निर्गमित केलेल्‍या आदेशामध्‍ये अंशतः बदल करुन  शासनाच्या  सुधारीत मार्गदर्शक सूचनेनुसार  दि.३० जून २०२० चे मध्‍यरात्रीपर्यंतचे सुधारीत आदेश निर्गमित केले आहेत. 
या आदेशान्वये संचारबंदीचा कालावधी हा बुधवार दि. ३ ते मंगळवार दि. ३० जून  पर्यंतवाढविण्यात आला आहे.त्यानुसार निर्बंधामध्ये देण्यात आलेली सुलभता व टप्पानिहाय लॉकडाऊन उघडण्याबाबत दिलेल्या दिशानिर्देशानुसार हे आदेश संपूर्ण अकोला  शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील.

 हे आदेश कोविड-१९ च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरीता  मध्ये दिलेल्या निर्देशांन्वये करण्यात आले आहेत. त्यानुसार,

१.सर्व प्रकारच्या सार्वजनिक व कामाच्या ठिकाणी मास्क लावणे अनिवार्य असेल याचे पालन न झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थामहसूलपोलीस विभाग दंडात्मक कारवाई करतील.
२)     सर्व प्रकारच्या सार्वजनिक स्‍थळी ,  वाहतूकीच्या व कामाच्या ठिकाणी सामाजिक अंतर (Social Distancing ) च्या नियमांचे पालन करण्यात यावे. सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीमध्ये कमीत कमी ६ फुटाचे अंतर राखतील तसेच दुकानांमध्ये ग्राहकांनी खरेदी करतेवेळी दुकानदार यांनी दोन ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर राहील याची दक्षता घ्यावी. तसेच एकावेळी  ५ पेक्षा जास्त जास्त लोक एकत्रित येणार नाही याची दक्षता घ्यावी व तसे  आढळून  न आल्यास याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थामहसूलपोलीस विभागांनी  दंडात्मक कारवाई करावी.
३)     सार्वजनिक ठिकाणी गर्दी होईल अशा प्रकारचे कोणतेही कार्यक्रममेळावेसभा आयोजित करता येणार नाहीत.
४)   लग्न समारंभाकरीता केवळ २० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी अनुज्ञेय राहील  याबाबत संबंधीत उपविभागीय अधिकारी  यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. तसेच संबंधित तहसिल/पोलीस स्टेशन यांना याबाबत सूचित करावे.
५)    सार्वजनिक स्‍थळी  (रस्तेबाजाररुग्‍णालयकार्यालये इ. ) ठिकाणी थुंकत असल्याचे आढळूंन आल्यास संबंधीत विभागाने कारवाई करावी.
६)     दारु, पानतंबाखूतंबाखूजन्य पदार्थ यांचा सार्वजनिक ठिकाणी वापर व विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे.
७)    महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद राहतील.
८)    या कालावधीत जास्तीत जास्त लोकांना घरुन  काम करण्याची (Work from Home ) मुभा राहील . त्याकरीता कार्यालयदुकानेऔद्योगिक क्षेत्रवाणीज्यिक आस्थापना यांनी त्यांचे कामाच्या वेळां त्या प्रमाणे निश्चित कराव्या.
९)     सर्व सार्वजनिक ठिकाणी आत यावयाच्या व बाहेर जावयाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनींगहॅन्ड वॉशसॅनीटायझरइ. ची व्यवस्था करण्यात यावी.
१०) सर्व प्रकारच्या कार्यालये/दुकाने/आस्थापना येथील कामाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनींगहॅन्ड वॉशव सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात यावी.
११) सर्व कामाच्या ठिकाणी काम करतांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात यावे. कामगार/कर्मचारी यांच्या मध्ये सुरक्षित अंतर ठेवणेकामाच्या वेळा बदलतांना दोन शिफ्ट  मध्ये अंतर ठेवणे, दुपारच्या जेवणाच्या वेळामध्‍ये अंतर ठेवण्यात यावे.
रात्री संचारबंदी
संचारबंदीच्या आदेशाचे पालन करतांना कुठल्याही व्यक्तीनागरिंकांना हालचाल करण्याकरीता व मुक्‍त
 संचार करण्‍याकरिता रात्री नऊ ते सकाळी पाच वा. पर्यंत सक्त मनाई करण्यात आली आहे.

असुरक्षित व्यक्तींची खबरदारी
६५ वर्ष व त्यावरील वृद्धआजारी व्यक्तीगर्भवती महिला१० वर्षाखालील मुले यांनी अत्यावश्यक व वैद्यकीय सेवा वगळंता घराबाहेर पडु नये.
प्रतिबंधात्मक क्षेत्रांकरीता (Containment Zone) मार्गदर्शक सुचना


१)     ज्या ठिकाणी कोविड-१९ या साथीच्या रोगाचा मोठया प्रमाणात उद्रेक झाला आहे असे क्षेत्र किंवा असे क्लस्टर (Containment Zone ) या ठिकाणी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय (MoHFW) यांनी दिलेल्या निर्देशानुसार संबंधित आयुक्त/सक्षम प्राधिकारी यांनी सिमांकन करुंन प्रवेशास प्रतिबंध करण्यात यावा.
२)     अशा  Containment Zone व Buffer Zone  मध्ये मार्गदर्शक सूचनांनुसार संचारबंदी कालावधी मध्ये अत्याश्यक व मुलभूत सेवा यांना देण्यात आलेली सूट लागू राहणार नाही. तसेच इतर परवानगी देण्यात आलेल्या बाबी सुध्दा प्रतिबंधीत राहतील.
३)     अशा Containment Zone व Buffer Zone मध्ये कडक नियंत्रण ठेवण्यात यावे तसेच अशा परिसरामध्ये आपत्कालीन अत्यावश्यक सेवा (वैद्यकीय सेवाकायदा व सुव्यस्थेची निगडित सेवा) वगळंता इतर कोणतीही व्यक्ती यांना   Containment Zone मध्ये आंत किंवा बाहेर तपासणी केल्याशिवाय सोडू नये.
४)   या आदेशामध्ये दिलेल्या दिशानिर्देशाव्यतिरिक्त  Containment Zone व Buffer Zone करीता आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय (MoHFW) यांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसार सर्व प्रकारच्या आरोग्य विषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
निर्बंधामध्ये सुलभता व टप्प्यानिहाय लॉकडाऊन उघडण्याबाबत निर्देश
१)     सर्व दुकाने/आस्थापना ह्या सकाळी  नऊ ते सायं. पाच वा. या कालावधीत  सुरु  राहतील.
२)     दुकाने व आस्थापना सुरु असतांना ग्राहकांकरीता पार्कींगची व्यवस्था करण्याबाबत आयुक्तमहानगरपालीका अकोला  तसेच मुख्याधिकारी नगर परिषद/नगर पंचायत यांनी नियोजन करावे. 
३)     ई-कॉमर्स क्षेत्राकरीता सर्व प्रकारच्या अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याकरीता परवानगी राहील.
४)   महानगरपालीका क्षेत्रातील सर्व प्रकारची बांधकामे (सार्वजनिक/खाजगी/शासकीय) ज्यांना परवानगी प्रदान करण्यात आलेली आहे ती सर्व सुरु राहतील. पावसाळ्यापूर्वी करावयाची सर्व प्रकारची (सार्वजनिक/खाजगी/शासकीय) कामे सुरु राहतील.
५)    सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आरोग्य व वैद्यकीयकोषागारआपत्ती व्यवस्थापनपोलीसअन्न व नागरी पुरवठामहानगरपालीका सेवा या आवश्यकतेनुसार सुरु राहतील. त्या व्यतीरिक्त असलेली इतर शासकीय कार्यालये त्यांचेकडील एकूण कर्मचारी पैकी ५%  किंवा कमीत कमी १० यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राह्य धरुन  सुरु  राहतील. केंद्रीय शासकीय कार्यालये ही त्यांना पूर्वी सूचित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार सुरु  राहतील.
६)     परवाना प्राप्त असलेले व अन्न व औषध प्रशासन यांनी परवानगी दिलेले रेस्टॉरेंट/खाद्यगृहे यांचे मार्फत घरपोच सेवा देता येईल.
७)    ऑनलाईन/दुरस्थ शिक्षण यांना परवानगी राहील व त्याला अधिक वाव देण्यात यावा.
८)    सर्व प्रकारच्या शासकीय कार्यालयातील आस्थापना ह्या एकूण ५%  किंवा कमीत कमी १० कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राहय धरुन सुरु राहतील.
९)     नागरिकांना हालचाल करण्याकरीता चारचाकी वाहनांमध्ये चालका व्यतीरिक्त २ व्यक्तींना व दुचाकीवर एका व्यक्तीला परवानगी राहील.
१०) यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या सर्व दुकाने/आस्थापना हया नियमितपणे सुरु राहतील.
मिशन बिगीनः फेज-१(दि.४ जून पासून लागू)
१)     सर्व प्रकारच्या सार्वजनिक ठिकाणी शारीरिक कसरती जसे सायकलींगजॉगींगधावणेचालणे यांना सकाळी पाच ते सात या कालावधीत परवानगी देण्यात येत आहे. कुठल्याही प्रकारे समुह हालचाल करण्यासतसेच जास्त अंतरापर्यंत जाण्या येण्यास मनाई राहील.
२)     लोकांना सायकलींग करण्याकरीता प्रोत्साहीत करण्यात येत असून त्यामुळें आपोआपच सामाजिक अंतर राखता येईल.
३)     स्वयंरोजगार संबधित कामे उदा. प्लंबींगइलेक्ट्रिशिअनकिड नियंत्रणतांत्रीक कामे इ. कामे करतांना सामाजिक अंतर (Social distancing) चे सर्व नियम पाळावे तसेच मास्कसॅनीटायजर यांचा वापर करणे अनिवार्य राहील.
४)   सर्व प्रकारचे वाहन दुरुस्तीबाबतचे गॅरेजकार्यशाळा यांनी वाहन दुरुस्ती करतांना ग्राहकांना ठराविक वेळ देऊन कामे करावी.
५)    सर्व प्रकारचे शासकीय कार्यालये (अत्यावश्यक सेवाआरोग्यकोषागारेआपत्ती व्यवस्थापनपोलीस विभाग, ,NIC , अन्न व नागरी पुरवठा, FCI, NYK, महानगरपालीका सेवा ह्या त्यांना आवश्यक असलेल्या कर्मचारी संख्येप्रमाणे काम करतील ) हे जास्तीत जास्त १५%  किंवा कमीत कमी १५ कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राह्य धरुन सुरु राहतील.


मिशन बिगीन फेज-२ (दि. जून पासून लागू)
सर्व प्रकारच्‍या  बाजारपेठ क्षेत्रामधील असलेली दुकाने (मॉल्समार्केट कॉम्प्लेक्स वगळूंन) यांना पी-०१पी-०२ या तत्वावर (रस्ता/गल्ली यांच्या एका बाजूला असलेली दुकाने सम तारखेस व (रस्ता/गल्ली यांच्या दुस-या  बाजूला असलेली दुकाने विषम तारखेस) ही सकाळी  नऊ ते सायं. पाच  वाजेपर्यंत खालील अटी व शर्तींच्या आधारे सुरु  ठेवण्यास परवानगी राहील याबाबत आयुक्तमहानगरपालीका अकोला  तसेच मुख्याधिकारी नगर परिषद/नगर पंचायत यांनी नियोजन करावे. 
१)     सदर दुकाने व आस्थापना सुरु  असतांना ग्राहकांच्‍या वाहनांकरिता  पार्कींगची व्यवस्था करावी.
२)     दुकानामध्ये कपडेवस्त्रे खरेदी करतांना ग्राहकांना Trial Rooms  वापरण्याची परवानगी राहणार नाही. तसेच खरेदी केलेला माल हा अदलाबदलकिंवा परत करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
३)     दुकानामध्ये खरेदी करतांना सामाजिक अंतर (Social Distancing ) च्या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी ही संबंधित दुकानदाराची राहील. त्याकरीता अंतर राखण्याकरीता आवश्यक त्या खुणा करणेटोकन पध्दती वापरणेघरपोच सेवा ह्यांना परवानगी राहील.
४)   ग्राहकांनी दुकानामध्ये खरेदी करण्याकरीता जातेवेळी  पायी चालावे अथवा सायकलीचा वापर करावा. याकरीता जवळंपास असलेल्या बाजारपेठपरिचित दुकाने यांचा वापर करावा. शक्यतो दुरचा प्रवास करुन खरेदी करणे टाळावे.
५)    सामाजिक अंतर (Social Distancing) व इतर नियमांचे पालन करीत नसल्याचे निर्दशनास आल्यास अशा दुकानांवर/आस्थापनांवर सक्षम अधिकारी यांनी तात्काळ कार्यवाही करुन दुकान बंद/सील करावे.
६)     सर्व प्रकारच्या सार्वजनिक स्‍थळी  वाहतूक करतांना टॅक्सीऑटोरिक्षाचारचाकी वाहनांमध्ये चालका व्यतिरिक्त इतर दोन व्यक्ती व दुचाकीवर एका व्यक्तीस वाहतूक करण्याची परवानगी राहील व त्‍यासाठी योग्‍य पार्किंग करावे.
मिशन बिगीन फेज-३(दि. ८ जून पासून लागू)
                        सर्व प्रकारचे खाजगी कार्यालये त्यांचेकडे असलेल्या एकूण कर्मचारी संख्येपैकी आवश्यकतेप्रमाणे १०% पर्यंत कर्मचारी यांचा वापर करु  शकतात. वरील मुद्यांत समाविष्ट नस्णाऱ्या  व प्रतिबंधित न केलेल्या सर्व बाबींना खालील अटी व शर्तींच्या आधारे सुरुं ठेवण्याकरीता परवानगी अनुज्ञेय राहील.
१)     परवानगी अनुज्ञेय असलेल्या कुठल्याही उपक्रमास कोणत्याही प्रकारच्या शासकीय परवानगीची आवश्यकता असणार नाही.
२)     स्पोर्ट कॉम्प्लेक्सखेळांचे मैदानव इतर सार्वजनिक ठिकाणे व्यक्तीगत व्यायामाकरीता खुले राहतील तथापि प्रेक्षकांना एकत्र येण्यास व सांघीक खेळ खेळण्यास मनाई राहील. सर्व प्रकारच्या शारिरिक व इतर कसरती करतांना सोशल डिस्टंसींग च्या नियमांचे पालन करावे लागेल. 
३)     सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक करतांना चार चाकी गाडीमध्ये चालका व्यतीरिक्त इतर २ प्रवासी अनुज्ञेय राहतील. तीन चाकीगाडी (उदा. ऑटो) मध्ये चालका व्यतीरिक्त दोन प्रवासीदुचाकीवर केवळं चालक यांना परवानगी राहील दुसरा प्रवासी अनुज्ञेय राहणार नाही.
४)   आंतर जिल्हा बस वाहतूक करतांना बस मधील असलेल्या एकूण प्रवासी क्षमतेच्या ५०% प्रवाशी सह सोशल डिस्टंसिंग व निर्जंतुकीकरण करुन वाहतूकीकरीता परवानगी अनुज्ञेय राहील. याकरीता विभागीय नियंत्रकमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळंअकोला  यांनी नियोजन करावे.
५)     अनुज्ञेय दुकाने/आस्थापना हे सकाळी  नऊ ते सायं. पाच वा. पर्यंत नियमित सुरु राहतील. अशा वेळी  दुकानामध्ये अथवा एका ठिकाणी जास्त गर्दी होत असल्याचे दिसून आल्यास संबंधित सक्षम प्राधिकारी (आयुक्तमहानगरपालीका/ मुख्याधिकारी/सचिवग्रा.पं.) यांनी याबाबत तात्काळ दखल घेऊन दुकानेबाजारपेठ बंद करावीत.

संपूर्ण अकोला  शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत खालील सेवा प्रतिबंधीत राहतील-
१)     सर्व प्रकारची शाळामहाविद्यालयेशैक्षणिक प्रशिक्षण केंद्रेखाजगी शिकवणी वर्गकोचिंग क्लासेसहे बंद राहतील. तथापि ऑनलाईन/ आंतर शिक्षण यास मुभा राहील.
२)     सर्व प्रकारची सिनेमागृहेशॉपींग मॉल्सव्यायामशाळाजलतरण तलावमनोरंजन उद्यानेनाटयगृहेबार (मद्यगृहे)प्रेक्षकगृहेमंगल कार्यालयेव इतर संबंधित मनोरंजनाची ठिकाणे ही बंद राहतील.
३)     सर्व प्रकारची सामाजिक/राजकीय मेळावेखेळमनोरंजनशैक्षणिकसांस्कृतिकधार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलन हे लॉकडाऊनच्या कालावधीत बंद राहतील.
४)   सर्व प्रकारची धार्मिक स्थळे/धार्मिक पुजा स्थळे हे सर्व नागरिकांसाठी संचारबंदीच्या कालावधीत बंद राहतील.
५)    सर्व प्रकारची केशकर्तनालयाची  दुकानेसलुनस्पाब्यूटी पार्लर बंद राहतील.
६)     सर्व प्रकारची शॉपींग मॉल्सहॉटेल्सरेस्टारेंटसलॉजींग संचारबंदीच्या कालावधीत बंद राहतीलतथापि त्‍यांना घरपोच सेवा देता येईल. 
विशिष्ट व्यक्ती णि वस्तुंच्या हालचालीसाठी दिशानिर्देश-
१)     राज्यअंतर्गत व राज्यबाहेरील सर्व प्रकारची वैद्यकीय व्यावसायीकनर्सेसपॅरामेडीकल स्टाफसफाई कर्मचारीरुग्णवाहीका यांच्या हालचाली ह्या कुठल्याही निर्बंधाशिवाय सुरु  राहतील.
२)     राज्याअंतर्गत व जिल्ह्यांतर्गत असलेली सर्व प्रकारची मालवाहतूक सुरु राहील. लॉकडाऊनच्या काळात अडकलेले मजुरस्थलांतरीत कामगारयात्रेकरुपर्यटक यांना दिलेल्या दिशानिर्देशानुसार परवानगी अनुज्ञेय राहील.
३)     आंतरराज्यआंतरजिल्हा अंतर्गत असलेली सर्व प्रकारची मालवाहतूक (खाली ट्रक सह) ही कुठल्याही प्राधिकारी यांनी प्रतिबंधीत करु नये.

आरोग्य सेतू वापराबाबत- कोरोना प्रार्दुभाव रोखण्याकरीता आरोग्य सेतु अ‍ॅप हे संभाव्य धोका तात्काळ ओळखण्याचे कार्य करीत असल्याने व्यक्तीगत व समुह संरक्षण करण्याकरीता आरोग्य सेतू अ‍ॅप हे अत्यंत उपयुक्त आहे. सर्व शासकीय कार्यालयामध्ये कोरोना विषाणू पासून संरक्षण होण्याकरीता सर्व कर्मचारी यांनी सुसंगत असलेल्या त्यांचे मोबाईल मध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप वापरण्याबाबत सूचना देण्यात याव्या.
बँकींग सेवा- अकोला  शहर व ग्रामीण जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या सर्व राष्ट्रीयकृत सरकारी बँकखाजगी बँकसहकारी संस्थापतपेढी संस्थाव आर्थिक बाबींशी संबंधित असलेल्या सर्व वित्तिय संस्था ह्या त्यांच्या दैनंदिन कामाच्या वेळेत सुरु  राहतील.
             या संचारबंदीमध्ये अकोला  शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील या आदेशाचा  भंग करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध  भारतीय दंड संहिता- १८६० च्या कलम  १८८ अन्वये  कारवाई करण्यात येईल. हे संचारबंदीचे आदेश हे दिनांक ०३/०६/२०२० चे ००.०० वा. पासून ते दिनांक ३०/०६/२०२० चे २४.०० वा. पर्यंत संपूर्ण अकोला  शहर व जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.

टिप्पण्या