शहरातील व्यावसायिकांनी सम आणि विषम दिनांकाप्रमाणे दुकाने उघडावी- मनपा आयुक्त

शहरातील व्यावसायिकांनी सम आणि विषम दिनांकाप्रमाणे दुकाने उघडावी- मनपा आयुक्त

अकोला:आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा – 2005 तसेच साथरोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 अन्‍वये अकोला महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्‍याकरिता मनपा हद्दीतील दुकाने (मॉल, मार्केट, कॉम्‍प्‍लेक्‍स)वगळून यांची P-1, व P-2 या दोन वर्गात परिशिष्‍ठ नुसार वर्गीकरण करण्‍यात येत असून यांना खालील अटी व शर्तीचे आधारे दुकाने उघडी करून व्‍यवसाय करण्‍यासाठी परवानगी राहील.


1) P-1 या लाईनमधील दुकाने विषम तारखेस दि. 5,7,9,11,13,15,17,19,21,23,25,27,29 या प्रमाणे सुरू राहतील.


2) P-2 या लाईनमधील दुकाने सम तारखेस दि. 6,8,10,12,14,16,18,20,22,24,26,28,30 या प्रमाणे सुरू राहतील.


3) शहरातील सर्व दुकाने व आस्‍थापना सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्‍यास परवानगी राहील.


4) सदर दुकाने व आस्‍थापना सुरू असतांना ग्राहकांच्‍या वाहनाकरिता पार्कींगची व्‍यवस्‍था करावी.


5) दुकानामध्‍ये कपडे, वस्‍त्रे खरेदी करतांना ट्रायल रूम वापरण्‍याची परवानगी राहणार नाही. तसेच खरेदी केलेला माल हा अदला-बदल किंवा परत करण्‍यास परवानगी राहणार नाही.


6) दुकानामध्‍ये खरेदी करतांना ग्राहकांनी व कर्मचा-यांनी सोशल डिस्‍टींग (सामाजिक अंतर) नियमाचे काटेकोरपणे पालन करणे व  चेह-यावर मास्‍क किंवा रूमाल बांधणे अत्‍यावश्‍यक असून या नियमांचे पालन करण्‍याची जबाबदारी दुकानदारांची राहील.


ग्राहकांमध्‍ये आपसातील अंतर ठेवण्‍यासाठी दुकानदारांनी आवश्‍यक त्‍या खुणा करेण, टोकन पध्‍दती वापरणे, घरपोच सेवेस प्राधान्‍य देणे.


7) सोशल डिस्‍टसींग व मास्‍क वापरणे व ईतर नियमांचे पालन करीत नसल्‍याचे आढळल्‍यास अशा दुकानावर/आस्‍थापनावर सक्षम अधिकारी मार्फत दुकान बंद करून सील लावण्‍याची कारवाई करण्‍यात येणर.


8) आस्‍थापना धारकाने थर्मल स्‍कॅनींग, हॅण्‍डवॉश, व सेनीटायझरची व्‍यवस्‍था करणे अनिवार्य राहील.


9) आजार पेठेतील P-1 लाईन सुरू असल्‍यास P-2 लाईनमधील दुकानासमोर पार्कींग करावी.


10) P-1 व P-2 लाईन मधील पान, तंबाकू व तंबाकूजन्‍य पदार्थ विक्री करणारी आस्‍थापना, सिनेमागृहे, शॉपिंग मॉल्‍स, व्‍यायाम शाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, बार (मद्यगृहे) प्रेक्षक गृहे, मंगल कार्यालये, हॉटेल्‍स, रेस्‍टॉरंट, लॉजींग, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्गे, कटींगची दुकाने, सलून, स्‍पा, ब्‍युटर पार्लर, टि-स्‍टॉल बंद राहतील.


11) शहरामध्‍ये कापड, फळे, भाजीपाला, ईत्‍यादी किरकोळ फेरीवाले व्‍यावसायिकांना रस्‍त्‍याच्‍या कडेला बसून व एकाच जागी थांबून व्‍यवसाय करता येणार नाही.


12) या व्‍यतिरिक्‍त दुध डेअरी व दुध विक्री वगळता किराणा, मेडी‍कल, फळे, भाजीपाला, बेकरी, डेली निड्स  विक्रीची दुकाने/आस्‍थापना हे सम विषम दिनांका प्रमाणेच सुरू राहतील.


13) व्‍यवसाय करणारे सर्व आस्‍थापना धाराकांकडे महानगरपालिका बाजार परवाना विभागाचा परवाना असणे आवश्‍यक आहे.


14) सदर आदेश दि. 05/06/2020 ते दि. 30/06/2020 पर्यंत लागू राहील.


15) सदरचे आदेश कंटेन्‍मेंट झोन (प्रतिबंधीत क्षेत्रात) किंवा बफर  झोन मध्‍ये असलेल्‍या बाजार पेठेस लागू राहणार नाही व सदर कंटेन्‍मेंट झोनमध्‍ये कोणतेही आस्‍थापना उघडणार नाही.


16) आस्‍थापना धारकांनी ई-कॉमर्स प्रणाली स्विकारण्‍यास प्राधान्‍य द्यावे तसेच परिशिष्‍ठ मध्‍ये नमुद नसलेले व दाट लोकवस्‍तीतील बाजारपेठ व फळ व भाजीबाजार या करिता स्‍वतंत्र आदेश काढण्‍यात येईल. तो पर्यंत पुर्वीप्रमाणे बाजारपेठ बंद राहतील. तसेच होलसेल फळे आणि भाजीपाला या बाजारपेठ यापुर्वी स्‍थानांतरण केलेले आहे. ते स्‍थानांतरीत केलेल्‍याच ठिकाणी नियमीत प्रशासनाने दिलेल्‍या वेळेमध्‍ये सुरू राहतील.

.........

टिप्पण्या