गल्ली ते दिल्ली:माजी आमदार भदे, सिरस्कार यांचा राकाँ प्रवेश बहुजनांसोबत गद्दारी नव्हे का?

माजी आमदार भदे, सिरस्कार यांचा राकाँ प्रवेश बहुजनांसोबत गद्दारी नव्हे का?
अकोला जिल्ह्यामध्ये सनात्यांची मक्तेदारी संपवून अठरा पगड जातीतील ज्यांना कधीही सत्तेच्या जवळपासही ज्यांनी येऊ दिले नाही अशा समाजातील लोकांना सत्तेत बसवण्याचंं काम ज्या बाळासाहेब आंबेडकरांनी केलं, सामान्यातील सामान्य व ज्या समाजाची कधी कोणत्याच पक्षाने दखल घेतली नाही त्या लहान-सहान मागास समाजाला पं.स. सदस्य, सभापती, जि.प. सभापती, आमदार, मंत्री, कॅबीनेट मंत्र्यापर्यंत नेऊन बसवलं त्यानंतरही ते गद्दारी करत असतील तर त्याला काय? म्हणावे, ज्या बहुजन समाजाच्या भल्यासाठी आतापर्यंत काँग्रेस, राकाँ, भाजपा, सेना काहीही करू शकले नाही म्हणून अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला पॅटर्न उदयास आणला व त्या पॅटर्नचे नाव संपुर्ण महाराष्ट्रभर गाजले सुद्धा ! बहुजन समाजातील वंचिताच्या कल्याणाकरीता झटने सोडून सनातन्याच्या पंगतीला जाऊन बसणे ही बहुजनांसोबत गद्दारीच म्हणावी लागेल! 

भारिप-बमसं ने जिल्हाभरात जे वंचित समाज आहे, ज्यांना कधीही न्याय मिळू शकत नाही, सत्तेच्या जवळपासही फिरकता येत नाही असे असतांना अशा समाजातील लोकांची मोट बांधून मोठ्या कष्टाने पक्ष उभा केला, ज्यांची लायकी नसतांनाही समाजाच्या  भरोशावर व बाळासाहेबांवरील असलेल्या निस्सीम प्रेमापोटी अशा लोकांना निवडून देऊन नेते बनवण्यात आले. त्यानंतर हे नेते झाल्यावर त्यांनी समाजाचे, बहुजनांचे, वंचितांचे काम करणे गरजेचे असतांना यांनी तसे तं केलंच नाही, यांनी आपआपल्या समाजातील किती लोकांना सक्षम बनविले? कोण्या समाजाचे भले केले? यांनी फक्त स्वत:चा स्वार्थ साधत सात पिढ्या बसून खातील एवढी कमाई केली, शाळा कॉलेज काढली व यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी दिली असतांना 
निष्ठेने काम करणार्‍या पदाधिकार्‍यांच्या चुगल्या करून, बाळासाहेबांच्या जवळची असणारी माणसं त्यांची उणी दुणी काढून त्यांना दूर करण्याचे पाप केले व पक्ष खिळखिळाच करत राहिले.

खताच्या गटारी भरणे,भिंती बांधणे, लोकांच्या कामावर मजूर असणार्‍या बळीराम सिरस्कार यांना २००१ मध्ये पारसमधून जि.प.ची उमेदवारी देऊन डायरेक्ट जि.प. अध्यक्ष बनविले, २००३ मध्ये जि.प. सदस्य, सन २००९ व २०१४ मध्ये बाळापूर मतदार संघातून आमदार बनविले. पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून कारभार दिला, त्यानंतर २०१९ मध्ये लोकसभेची उमेदवारी दिली.  अजून काय द्यायचे बाकी होते? बाळासाहेबांनी तळागाळातील माणसाला नेतृत्व दिले, की जनसामान्याचे प्रश्न सोडवीन, हे सारं थोतांड होतं ते उघडं पडलं. भारिप-मध्ये फक्त सत्ता भोगण्यासाठी होतं हे आता लोकांना माहीत पडले,  अशोक वाटीकामध्ये भाषण देतांना बळीराम सिरस्कार म्हणाले होते की, ‘‘दोन एकर जमीन असलेल्या माणसाला कोणतेही राजकीय, सामाजिक  पाठबळ नसतांना या महान असलेल्या बाळासाहेबांनी मला जि.प.चा अध्यक्ष बनविलं, मी आयुष्यभर त्यांना सोडणार नाही त्यांचे उपकार कधीही विसरणार नाही.’’ बाळासाहेबांना अपेक्षीत होतं की, फुले-शाहू-आंबेडकरी विचाराचा वारसा त्यांनी चालवावा.  परंतू घेतलेली शपथही ते या माया लोभापायी विसरले! वास्तविक पाहता तर त्यांनी मोठ्या मनाने प्रा.डॉ. संतोष हुशे सारख्या नेत्याला येथून तिकीट द्या, निवडून आणून दाखवितो असे म्हणायला पाहीजे होते. तसेच  प्रा. धैर्यवर्धन पुंडकर साहेब सहज निवडून  आले असता परंतू त्यांचे विरोधात काम करून त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला त्यांना मोठ्या मनाने निवडून आणले असते तर त्यांचे मोठेपण दिसून आले असते त्यांचा लालसेपायीचा खुजेपणा दिसून आला. 

हरीदास भदे साहेब हे १९९२ मध्ये जि.प.सदस्य व पं.स.चेसभापती झाले. २००३ मध्ये जि.प. सदस्य बनले, २००४ मध्ये बोरगाव मंजू मतदार संघातून आमदार व २००९ मधून अकोला पूर्वचे आमदार म्हणून निवडून आले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहिले, व शेवटच्या क्षणी ते वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव होते!  एवढं भरभरून दिलेलं असतांना त्यांनी त्यांच्या समाजाचं, बहुजन समाजाचंं काम करणे अपेक्षीत असतांना ज्या पक्षांनी कधीही बहुजनांंचं भलं केलं नाही त्यांचे सोबत जाऊन हे मागास समाजासोबत, बहुजनासोबत गद्दारी नाही तर काय म्हणायचे? बाळासाहेबांसाठी काय-काय शपथा घेतल्या, सर्व मातीमोल करून ठेवलं. लालसा फार भयंकर असतात. ज्या पक्षांनी कधी सतरंज्या उचलण्यापलीकडे काहीही नाही दिलं नाही, ज्या पक्षाने काहीही नसतांना भरभरून दिलं काहीही कारण सांगून जात असाल  तर आपल्याला हा बहुजन समाज माफ करणार नाही?
यापूर्वी भाजपाशी तडजोड करण्याच्या हालचाली ऐकू येत होत्या, परंतू त्यांचे प्रतिनिधी निश्चीत असल्यामुळे तिथे दाळ शिजणार नाही असे बघून त्यांनी हा राकाँचा मार्ग निवडला. 
बौद्ध समाजाने जीवाचे रान करायचे, कोणत्याही समाजाचा व्यक्ती असो तो कोणीही असो आमच्या बाळासाहेबांनी सांगीतला म्हणून त्यांचेवर जीव जायेपर्यंत प्रेम करायचे. त्याला भरभरून मते द्यायची. त्यांनी निवडून आल्यावर स्वत:चीच घरे भरायची. तसेही काही जणांची घाण सवय असते, चालत्या गाडीत बसण्याची, भारिप-बमसंची चालती होती पुर्ण भोगून बसले, तिथे सात पिढ्यांना पुरेल इतकी कमाई केली, आता राजकारण करण्यासाठी  बाहेर पडले. अशा लोकांनी राजकारणाला व्यवसाय करून टाकले आहे,अशा लोकांना समाजाचे काहीही घेणे देणे नसते! 
आतापर्यंत भारिप-बमसंमधून गेलेल्यांचा ईतिहास आहे की, ते राजकारण न करताच ईतिहास जमा झालेले आहेत. त्यांना ग्रा.पं.ची निवडणूक लढणेही शक्य झाले नाही अशी गत सोडून गेलेल्याची झालेली आहे. ़कारण मोठे होण्यासाठी बुट,चपला घासून मोठे व्हावे लागते बूट चाटून नव्हे! हे लक्षात असू द्यावे.

राकाँने अमोल दादा मिटकरी यांना आमदारकी देऊन चांगले काम केले आहे. एका दोन एकर वाल्या शेतकर्‍यांच्या मुलाला आमदारकी दिली हे खरेच चांगले काम केले. त्यांची वत्तृâत्वशैली, त्यांचा जनतेवर असलेला प्रभाव, मिटकरी साहेबांनी अशोक वाटीकेमध्ये भाषणामध्ये बाळासाहेब आंबेडकरांसारख्या विदवानाची लोकसभेत गरज आहे असे गर्जून सांगीतले होते. अशा फुले-शाहु-आंबेडकरी विचाराच्या कर्तृत्ववानला आमदारी दिल्याने जिल्ह्यातील राकाँचे ठेकेदार जणू त्यांना दुष्मन समजू लागले आहे,आगपाखड करू लागले आहे. मिटकरी हे महाराष्ट्रभर प्रबोधन करणारे जातीवंत विचारधारेचे आहे. परंतू भदे, सिरस्कार यांच्या घेण्याने येथील मंडळी यांना कशी वागणूक देतील? हा फार मोठा प्रश्न आहे.

श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती आहे की, तुमच्यावर समाजाची फार निष्ठा आहे,  अशा गद्दार लोकांंना समाजाने तीस वर्षापासून तुमच्या म्हणण्याप्रमाणे झेलले आहे. तुम्ही जो माणूस दिला त्यांच्यावर मेंढराप्रमाणे तुटून पडून त्यांनी प्रेम दिलं आहे, याच विचारांच्या लोकांनी समाजातील जवळची नेतेही तुमच्यापासून दूर केली आहे. आतापर्यंत तुम्ही समाजातला आमदार दिला नाही, यापुढे आपणही राजकारणच करा, एकट्याने लढून आपला माणूस आमदार, खासदार होणार नाही, तडजोड करा व आपला माणूस कसा निवडून जाईल याचा विचार करा! कारण गवई साहेबांनी अख्या आयुष्यात एकही समाजाचा आमदार, खासदार होऊ दिला नाही. तुम्ही खरमरीत बोलणी करा, वाटाघाटी केल्यास २८८ आमदारांमध्ये आपल्या बौद्ध समाजाचे किमान २५ आमदार निवडून येऊ शकतात एवढी तुमची ताकद आहे व आपण राष्ट्रीय नेते म्हणून भारतभर राजकारण करू शकता. असे करत असतांना गद्दार लोकांना ओळखायला शिका एवढे मात्र खरे!

या जाणत्या राजाला काय म्हणावे? तुम्ही मराठवाडा विद्यापीठाचं झुलवत ठेवत का असेना नामांतर केलं म्हणून बौद्ध समाज तुम्हाला मानतो. यापुर्वी काँग्रेसने मखराम, बोडखे, भांडे यांना फोडून बाळासाहेबाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला व ते स्वत:च खलास झाले. आपणही या गद्दारांना प्रवेश देऊन बाळासाहेबाला डिवचण्याचं काम केलं आहे, त्यांच्या गळ्यात गळे घालत लढा आर.एस.एस.च्या विरोधात असल्याचं दाखवता व फुले-शाहू-आंबेडकरी चळवळ खिळखीळी उध्वस्त करू पाहता, असे होत राहिल्यास तुम्हाला पुढची स्वपे्न फक्त पाहतच राहावी लागणार, एवढे मात्र खरे! 
एकीकडे कोरानाच्या महामारीने लोक मरत असतांना त्यांनी पक्ष प्रवेशाची एवढी घाई कशासाठी? तोंडाला मुसकं लाऊन प्रवेश करणे एवढं गरजेचं वाटलं का? परंतू तिथे हे मोकळे पणाने बोलू शकणार नाही, मुस्कं बांधल्यागतच राहावे लागेल!

  लेखक
- पंजाबराव वर, अकोला, 
   मो.नं. ९९२२९२४६८४
........
Isn't the entry of former MLA Bhade and Sirskar a betrayal of Bahujans?

टिप्पण्या