सरकारच्या नाकर्तेपणा मुळे जनता खूप मोठया संकटात -प्रकाश भारसाकळे

सरकारच्या नाकर्तेपणा मुळे जनता खूप मोठया संकटात -प्रकाश भारसाकळे
अकोट विधानसभेतील जनतेचे प्रश्न समस्या निकाली काढण्यासाठी अकोटचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन 
अकोला: संपूर्ण देश कोविड -19 ने त्रस्त असून, महाराष्ट्र यात आघाडीवर आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही परिस्थिती उदभवली असून,जनता खूप मोठया संकटात अडकली आहे,असा आरोप आमदार प्रकाश भारसाकळे यांनी करून, अकोट विधानसभेतील जनतेच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात यावे, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांनी शुक्रवारी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.  
अशा आहेत मागण्या
1. अकोट तालुकयातील पुनर्वसित गावांना मूलभूत सुविधा पुरविणे. 
2. अकोट मतदार संघातील शेतकऱ्याची तूर, हरभरा,मका पिकाची सर्व नोंदणी उर्वरित पूर्ण करून शेतकर्याच्या शेवटच्या दाण्या पर्यत गतीने खरेदी करण्यात यावी.
3. अकोट मध्ये वादळी वाऱ्यामुळे नुकसान झलेल्या दुष्काळग्रस्त व गारपीटग्रस्त यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी. 
4. रेशनकार्ड मधील बरेच नावे आर. सि. मधून कमी झाले असून ते त्वरित समाविष्ट करण्यात यावे. 
5.प्रधानमंत्री किसान योजनेमधील शेतकऱ्याना त्याच्या खात्यामध्ये लाभाचे पैसे त्वरित जमा करण्यात यावे. पीकविमा शेतकर्याच्या खात्यात त्वरित जमा 
 करण्यात यावे. 
6. अकोट तालुक्यामध्ये झलेल्या गारपिटीमध्ये फळबागेची नुकसान भरपाई फळउत्पादक शेतकरयांच्या खात्यामध्ये त्वरित जमा करण्यात यावी.
7. पीककर्ज करिता शेतकर्यांना बँकेने ज्या अटी घातल्या आहेत त्या कोरोना च्या प्रादुर्भावामुळे त्याची पूर्तता करणे शक्य नसल्याने त्या शिथिल करण्यात याव्या. तसेच पात्र शेतकर्यांना पीककर्ज तात्काळ मंजूर करण्याबाबत बँकांना आदेशित करण्यात यावे.
भारसाकळे यांनी यंत्रणेला धरले धारेवर
त्यानंतर  आमदार भारसाकळे यांनी अकोट तालुक्यातील नाफेड यंत्रणेचे सर्व  अधिकारी यांच्या कडून नोंदणी व खरेदी यांची तपासणी केली. हरभरा नोंदणी पाच हजार च्यावर असतांना केवळ सातशेच्या जवळपास नोंदणीची उचल झाली ही बाब लक्ष्यात आल्यावर आमदार प्रकाश भारसकळे यांनी सर्व यंत्रणेला धारेवर धरले. लवकरात लवकर उर्वरित हरभरा व तुरीची खरेदी करण्यात यावी. त्याच बरोबर ज्या शेतकऱ्याची तुरीची नोंदणी बाकी असेल त्यांची नोंदणी करून लवकरात लवकर खरेदी करण्याचे आदेश दिले.त्याच बरोबर तेथील उपस्थित नागरिकांच्या समस्या ऐकून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. 
.........
 

टिप्पण्या