कोरोना युद्ध;आठवड्यातील प्रमुख घडामोडी...काय घडलं महाराष्ट्रात

कोरोना युद्ध:आठवड्यातील प्रमुख घडामोडी...काय घडलं महाराष्ट्रात

३१ मे ते ६ जून  या कालावधित कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांचा संक्षिप्त गोषवारा.

३१ मे २०२०

  • १२४८ रुग्णांची घरी रवानगी. आतापर्यंत २९ हजार ३२९ रुग्णांना घरी परतले. २४८७ नवीन रुग्णांचे निदान, ३६ हजार ३१ रुग्णांवर उपचार सुरू. रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात ११.७ दिवस होता, तो १७.५ दिवस झाला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.३५ टक्के.   मृत्यू दर ३.३७ टक्के. कोरोनामुळे मृत्यूंची संख्या २२८६.  
  • महाराष्ट्र सायबर विभागामार्फत सायबर संदर्भात 446  गुन्हे दाखल, 238 व्यक्तींना अटक.
  • मिशन बिगिन अगेन (पुनश्चः प्रारंभ) या अभियानांतर्गत टप्प्या टप्प्याने लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय. त्याची सुरुवात 3 जून, 5 जून आणि 8 जून अशा तीन टप्प्यात. हा आदेश 1 जून पासून अंमलात,  तो 30 जून 2020 पर्यंत लागू.
  • मिशन बिगीन अगेन टप्पा 1 (3 जून 2020 पासून)निर्बंधातून सूट आणि टप्याटप्याने मोकळीकबृहन्मुंबई महानगर पालिका आणि  पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या महानगर पालिका  क्षेत्रात या आधीच्या आदेशानुसार परवानगी देण्यात आलेल्या कामांशिवाय पुढील कामे/कृती यांना काही निर्बंध व अटींसह परवानगी, तथापि या क्षेत्रातील कंटेन्टमेंट झोनमध्ये ही कामे करता येणार नाही.

एकट्याने शारीरिक व्यायाम शक्य- सायकलिंग / जॉगिंग / धावणे / चालणे या वैयक्तिक शारीरिक व्यायामासाठी किनारपट्टी, सार्वजनिक / खाजगी क्रीडांगणे, सोसायट्या/ संस्थांची क्रीडागंणे, उद्याने आणि टेकड्यांवर काही अटी व शर्तींवर नागरिकांना सकाळी 5 ते संध्याकाळी ७ पर्यंत परवानगी. मात्र, बंद भागामध्ये (इनडोअर) अथवा इनडोअर स्टेडियम मध्ये कोणत्याही शारीरिक व्यायाम प्रकारांना परवानगी नाही./कोणत्याही सामूहिक कामास (ग्रुप अटिव्हिटी) अथवा क्रियेस परवानगी नाही. मुलांबरोबर प्रौढ व्यक्ती असणे आवश्यक./ लोकांनी मर्यादीत कालावधीसाठी शारिरीक व्यायामासाठी घराबाहेर पडावे, असा सल्ला./ इतर कोणतीही कामे/कृती अथवा उपक्रमांना परवानगी नाही./नागरिकांना फक्त नजिकच्या / शेजारच्या मोकळ्या जागांचा वापर करण्याची परवानगी. लांब पल्ल्याच्या प्रवासास परवानगी नाही./ नागरिकांनी गर्दी असलेल्या मोकळ्या जागी जाणे टाळावे, असा सल्ला../सायकलिंग सारख्या शारीरिक व्यायामावर जास्त भर द्यावा, जेणेकरून सामाजिक अंतर ठेवण्यास आपोआप आणि सहजरीत्या मदत होईल.

स्वयंरोजगार शक्य- प्लंबर, इलेक्ट्रिशियन, किटक नियंत्रक (पेस्ट कंट्रोल) व तंत्रज्ञ यासारख्या स्वयंरोजगार करणाऱ्यांनी योग्य सामाजिक अंतर पाळून, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून कामे करावीत./ पूर्व परवानगी/ वेळ ठरवून घेतलेल्या  वाहनांसाठी दुरुस्ती व वर्कशॉप सुरू करता येतील.

शासकीय कार्यालये- सर्व शासकीय कार्यालये 15 टक्के कर्मचारी अथवा किमान 15 कर्मचारी यापैकी जी जास्त संख्या असेल त्या संख्येच्या मनुष्यबळांसह सुरू होतील. (अपवाद - आणीबाणी, आरोग्य व वैद्यकीय, कोषागरे , आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, एनआयसी, अन्न व नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायके, नगरपालिका सेवा. ही कार्यालये कामाच्या गरजेनुसारच्या पातळीपर्यंत कामे करू शकतात.)

मिशन बिगीन अगेन – फेज २ (५ जून २०२०)- सर्व मार्केटस्, मार्केट क्षेत्र आणि दुकाने (मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सशिवाय) ही पी – १, पी – २ तत्वावर (बेसिसवर) सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु. (रस्ता, गल्ली किंवा एखाद्या क्षेत्रातील एका बाजूची दुकाने ही विषम तारखेला तर दुसऱ्या बाजूची दुकाने ही सम तारखेला खुली राहतील)./ कपड्यांच्या किंवा तत्सम दुकानांमध्ये ट्रायल रुमचा वापर करता येणार नाही. ग्राहकांना उभे राहण्यासाठी जमिनीवर चिन्ह तयार करणे, टोकन पद्धती, होम डिलीव्हरी आदींना प्रोत्साहन./ खरेदीसाठी लोकांनी पायी जावे किंवा सायकलचा वापर करावा. शक्यतो जवळची दुकाने, मार्केटमध्ये खरेदी करावी. बिगर अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी लांबच्या प्रवासाला अनुमती नाही. / टॅक्सी, कॅब, ॲग्रीगेटर- अत्यावश्यक सेवेकरिता १ अधिक २ प्रवासी, रिक्षा- अत्यावश्यक सेवेकरिता १ अधिक २ प्रवासी, चारचाकी वाहन- अत्यावश्यक सेवेकरिता १ अधिक २ प्रवासी तर मोटरसायकल- अत्यावश्यक सेवेकरिता १ प्रवासी, याप्रमाणे अनुमती.

मिशन बिगिन अगेन - टप्पा क्रमांक 3 (8 जून पासून)- सर्व खाजगी कार्यालये 10 टक्के मनुष्यबळासह सुरु करता येतील. इतर कर्मचारी घरी राहून काम करतील./जी कामे करण्यासाठी बंदी नाही ती सुरु ठेवता येतील. अशा कामांसाठी कोणत्याही शासकीय परवानगीची गरज नाही. स्टेडियम आणि खुली क्रीडा संकुले ही व्यक्तिगत कवायती, व्यायामासाठी वापरता येतील. मात्र या ठिकाणी प्रेक्षक वा दर्शकांच्या सहभागावर पूर्णपणे बंदी. इनडोअर स्टेडियममध्ये कोणत्याही बाबीस परवानगी नाही. सर्व शारीरिक कवायती आणि व्यायाम सामाजिक अंतराचे नियम पाळून करणे आवश्यक./खाजगी आणि सार्वजनिक वाहतुकीचे व्यवस्थापन पुढील प्रमाणे - दुचाकी एक प्रवासी, तीन चाकी किंवा ऑटो रिक्शा – 1 अधिक 2 प्रवासी, चार चाकी वाहन - 1 अधिक 2 प्रवासी./जिल्ह्यांतर्गत बस वाहतुकीला जास्तीत जास्त 50 टक्के क्षमतेसह अनुमती. यामध्ये दोन व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, स्वच्छताविषयक काळजी घेणे गरजेचे./आंतरजिल्हा (एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात) बस वाहतुकीला अनुमती नाही./दुकाने, मार्केटस् सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुली राहतील. गर्दी दिसल्यास किंवा सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास प्रशासनाकडून ही दुकाने किंवा मार्केट तातडीने बंद करण्यात येतील.

पुढील बाबींना प्रतिबंधशाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था,विविध शिकवणी वर्ग./आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास. (गृह मंत्रालयाच्या परवानगीने जात असलेले प्रवासी सोडून)/मेट्रो रेल्वे सेवा./स्वतंत्र आदेश आणि मानक प्रक्रियेद्वारे (एसओपी) परवानगी न घेतल्यास रेल्वे आणि आंतरदेशीय विमान प्रवासास बंदी./सिनेमा हॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, मोठे सभागृह, आणि तत्सम इतर ठिकाणे./सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम तसेच मोठे समारंभ./सार्वजनिक धार्मिक स्थाने,पूजास्थळे,केश कर्तनालये, सलून आणि ब्युटी पार्लर, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर आदरातिथ्य सेवा./निर्बंध कमी करण्याची प्रक्रिया तसेच यातील काही बाबींना सुरू सुरू करण्यास विशिष्ट मानकांद्वारे आणि मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून टप्प्याटप्प्याने परवानगी.

  • मुख्यमंत्री सहायता निधीत आतापर्यंत ३६१ कोटी ३२ लाख ५७ हजार ५९९ रुपये जमा , १२३ कोटी ३९ लाख १२ हजार ४१० रुपये कोरोना विषयक विविध कारणांसाठी खर्च, १ लाख २९ हजार दात्यांकडून निधी.   तपशील - औरंगाबाद जवळीन रेल्वे अपघातातील मजुरांना सहाय्य - ८० लाख, सेंट जॉर्ज रुग्णालय २० कोटी, कोविड चाचणी- ३ कोटी ८२ लाख ५० हजार रुपये, श्रमिक रेल्वे तिकीट खर्च- ९७ कोटी ६९ लाख ५५ हजार ४९० रुपये, रत्नागिरी प्रयोगशाळा १ कोटी ७ लाख ६ हजार ९२०
  • फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांचा जनतेशी संवाद. ठळक मुद्दे  - पुन:श्च हरिओम करत  ३ जुनपासून " मिशन बिगीन अगेन"ची सुरुवात, टप्प्या टप्प्याने निर्बंध शिथील, जबाबदारी आणि खबरदारीने पुढे जावे लागेल, एकदा सुरु केलेले व्यवहार पुन्हा बंद होणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी स्वंयशिस्त, जिद्द आणि संयम कायम ठेवा.पहिल्या टप्प्यात ३ जूनपासून खासगी आणि सार्वजनिक मैदान,समुद्र किनारे, सायकलिंग, जॉगिंग आणि धावणे-चालणे यांना मान्यता,  मात्र कोणत्याही सामूहिक कृतीला मान्यता नाही. ५ जूनपासून दुकाने आणि ८ जूनपासून १० टक्के कर्मचारी असलेली खासगी कार्यालये उघडली जाणार. काळजी घेऊन घराबाहेर पडा, स्वच्छता आणि स्वंयशिस्त पाळा. मास्क वापरणे , चेहऱ्याला हात न लावणे, शारीरिक अंतर ठेवणे या नियमांचे काटेकोरपणे पालन करा. येत्या दोन दिवसात पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ येण्याची शक्यता लक्षात  घेऊन सिंधुदूर्गपासून मुंबईपर्यंतच्या किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांनी काळजी घेणे आवश्यक, पावसाळयाची काळजी घेण्यासाठी यंत्रणेला सुसज्ज राहण्याच्या सूचना, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या झालेल्या सर्व सत्रांचे मिळालेले गुण लक्षात घेऊन सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करण्याचा आणि त्यांचा पुढच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा करण्याचा निर्णय. ज्यांना हे मान्य आहे त्यांच्यासाठी हा निर्णय, परीक्षा दिल्यानंतर अधिक चांगले गुण मिळवू शकलो असतो असे ज्या विद्यार्थ्याना वाटते त्यांच्यासाठी  काही कालावधीने परीक्षा घेणार. जिथे शाळा सुरु करता येतील तिथे शारीरिक अंतराच्या व इतर उपाययोजनांसह शाळा सुरु करणे, जिथे शक्य नाही तिथे ऑनलाइन शाळा, टॅब, लॅपटॉपच्या माध्यमातून शिक्षण,  याबाबत येत्या काही दिवसात निर्णय. काही गोष्टी सुरु करावयास परवानगी देण्यात आली असली तरी गर्दी करण्यास, सभा-समारंभ आणि उत्सव करण्यास परवानगी नाही. सार्वजनिक ठिकाणी पहाटे पाच पासून सायंकाळी सात पर्यंत व्यवहार करण्यास मान्यता. पुढच्या रविवारपासून वृत्तपत्रे घरपोच, विक्रेत्यांनी वृत्तपत्र घरपोच देणाऱ्या तरूणांची काळजी घेणे आवश्यक, निर्बंध शिथील करतांना हायरिस्क गटातील व्यक्तींची काळजी घेणे गरजेचे. हृदयरोग, मधुमेह, असलेले, गरोदर स्त्रिया आणि ५५ ते ६० वर्षावरील व्यक्ती यांनी घरातच राहावे, , आजघडीला राज्यात ६५ हजार कोविड रुग्ण, त्यातील २८ हजार रुग्ण ठणठणीत बरे, प्रत्यक्षात ३४ हजार ॲक्टिव्ह रुग्ण, या ३४ हजार रुग्णांमध्ये २४ हजार रुग्णांमध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षण नाही, मध्यम आणि तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या ९५००. १२०० रुग्ण गंभीर असून त्यापैकी फक्त २०० जण व्हेंटिलेटरवर , महाराष्ट्राची परिस्थिती आटोक्याबाहेर गेली  नसल्याचे या आकडेवारीवरुन स्पष्ट. प्रारंभी पुण्यात आणि कस्तुरबा रुग्णालय, मुंबई येथे दोनच असलेल्या विषाणू प्रयोगशाळा ७७, एकदोन दिवसात १०० होतील. पावसाळ्या सुरुवातीला ३ हॉस्पीटलमध्ये विलगीकरणाची असलेली सुविधा आता २५७६ रुग्णालयात उपलब्ध , अडीचलाख आयसोलेशनची सुविधा आणि २५००० बेडस ऑक्सीजनच्या सुविधेसह उपलब्ध, आयसीयू बेडसच्या संख्येत २५० हून ८५०० इतकी वाढ. रेल्वे आणि बसच्या माध्यमातून आतापर्यंत १६ लाख  श्रमिकांची त्यांच्या राज्यात रवानगी. शिवभोजन योजनेअंतर्गत मे महिन्यात ३२ लाख ७७ हजारांहून अधिक थाळ्यांचे वितरण.
  • शालेय शिक्षण विभागाचा मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्यामार्फत आढावा. ठळक मुद्दे - जूनमध्ये शालेय वर्ष सुरू झाले पाहिजे. जिथे ऑनलाईन शक्य आहे,  तिथे त्या पद्धतीने सुरू करा.  पुढील काळात ऑनलाइन शिक्षणाची मजबूत यंत्रणा दीर्घ काळासाठी विकसित करा. कनेक्टिविटी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या दुर्गम भागात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून शाळा सुरू करा.  प्रत्यक्ष शाळा सुरू करणे अडचणीचे असले त्या ठिकाणी इतर पर्यायांचा वापर करा, कोरोना बाधित रुग्णाना क्वारंटाईन करण्यासाठी ज्या शाळा ताब्यात घेतल्या होत्या, त्यांचे निर्जंतुकीकरण शासन खर्चाने करून देण्यात येईल.  शिक्षकांना शिक्षणाशिवाय इतर कामे दिली जाऊ नये यासंदर्भात लवकरच निर्णय, इतर मुद्दे - विद्यार्थ्यांना ऑनलाइन तसेच टिव्ही, रेडिओच्या माध्यमातून शिक्षण पोहचविण्याची तयारी पूर्ण. अभ्यासक्रमासाठी लागणारी पाठ्यपुस्तके प्रत्येक शाळेपर्यंत येत्या 15 जून पर्यंत पोहचविण्याचे नियोजन. गुगल क्लासरूम सेवा गुगल कंपनी शालेय शिक्षण विभागाला मोफत पुरविण्यास तयार. दीक्षा ॲपवर महाराष्ट्राने तयार केलेल्या ई साहित्याला चांगला प्रतिसाद , टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यासाठीचा आराखडा तयार, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सणांच्या सुट्ट्या कमी करुन शैक्षणिक सत्र मे पर्यंत वाढविण्याच्या प्रस्तावांचा समावेश.
  • चित्रपट, दूरचित्रवाणी  मालिका, ओटीटी मालिका यांच्या चित्रीकरणास काही अटी व शर्तींच्या अधीन राहून मान्यता.
  • कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, नर्स व वैद्यकीय कर्मचारी यांच्यासाठी पीपीई किट औषध दुकानांमधून उपलब्ध, पीपीई किट उपलब्ध असलेल्या प्रत्येक जिल्ह्यातील औषध दुकानांची यादी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागामार्फत जाहीर. पीपीई किट वितरणामध्ये आणखी औषध दुकानदारांना सहभागी होण्याची इच्छा असल्यास त्यांनी आपल्या जिल्ह्यातील सहायक आयुक्त (ड्रग्ज) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन.
  • बृहन्मुंबईतील करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर आणि नर्सेस यांची आवश्यकता असल्याने त्यांना मानधन तत्वावर कोविड कालावधीसाठी घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री अमित विलासराव देशमुख यांचे निर्देश.45 वर्षापेक्षा कमी वय, ज्यांना कुठलाही आजार नाही, ज्यांची इंटर्नशिप पूर्ण व ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन आहे, अशा डॉक्टरांना मानधन तत्त्वावर कोविड कालावधीसाठी गरजेनुसार घेण्यात येणार. या डॉक्टरांना दरमहा 80 हजार रुपये मानधन. फिजिशियन यांनाही मानधन तत्वावर घेणार. भूलतज्ञ आणि इंटेन्सिविस्ट यांना दरमहा दोन लाख रुपये मानधन.नर्सेसना दरमहा ३० हजार रुपये या मानधन.
  • महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांमधून फेब्रुवारी 2019 मध्ये एम.बी.बी.एस. परीक्षा उत्तीर्ण होऊन इंटर्नशिप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना तात्पुरते पदवी प्रमाणपत्र देण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांचे निर्देश. या निर्णयामुळे एम.बी.बी.एस. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी करता येणे शक्य. त्यामुळे चार हजार डॉक्टर्स सध्याच्या कोविडजन्य परिस्थितीत  वैद्यकीय सेवा देण्यासाठी उपलब्ध होतील.
  • नागरी सहकारी बँका व नागरी / ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्थांवर लॉकडाऊनचे होणारे दूरगामी परिणाम आणि त्यावर करावयाच्या उपाययोजना यासाठी समिती गठीत करण्यात आल्याची सहकार मंत्री श्री बाळासाहेब पाटील यांची माहिती. महाराष्ट्र राज्य अर्बन बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनासकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत  डॉ. पी. एल. खंडागळे अप्पर निबंधक सहकारी संस्था पुणे, धनंजय डोईफोडे प्रादेशिक सहसंचालक साखर पुणे, जयवंत जालगावकर अध्यक्ष  दापोली अर्बन बँक,  काका कोयटे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य नागरी सह. पतसंस्था फेडरेशन पुणे, जिजाबा पवार चेअरमन ज्ञानदीप नागरी सह. पतसंस्था मुंबई, आनंद कटके मिलिंद सोबले  उपनिबंधक सहकारी संस्था पुणे यांचा समावेश.
  • लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या त्रिस्तरीय पत संरचनेवर  होणारे दूरगामी परिणाम व त्यावरील उपाययोजना करण्यासाठी समिती गठीत करण्यात आल्याची सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती. सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत डॉ.आनंद जोगदंड, अप्पर आयुक्त व विशेष निबंधक पुणे, श्रीकृष्ण वाडेकर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्‍था कोल्हापूर, अजित देशमुख, कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई,  शैलेश कोतमिरे प्रशासक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोलापूर, डॉ. संतोष कोरपे चेअरमन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अकोला, प्रताप चव्हाण मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे, अशोक खरात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बुलढाणा, यांचा समावेश.
  • उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव येथे 200 करोना सैनिकांचे पथक सज्ज.
  • लॉकडाऊन कालावधीत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर झालेले दूरगामी परिणाम आणि येणाऱ्या अडचणी यावर उपाययोजना करण्यासाठी  समिती नेमण्यात आल्याची पणन मंत्री श्री बाळासाहेब पाटील यांची माहिती. पणन संचालक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये पणन सहसंचालक विनायक कोकरे,  ए.के. चव्हाण, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई,  बी.जे.देशमुख, प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे, कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सभापती ललित शहा, कृषि उत्पन्न बाजार समिती हिंगणघाटचे सभापती सुधीर कोठारी, कृषि उत्पन्न बाजार समिती जळगावचे सभापती कैलास चौधरी, कृषि उत्पन्न बाजार समिती बारामतीचे सचिव अरविंद जगताप,  कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांचा समावेश.
  • अमरावती जिल्हा कोविड रुग्णालयातील दाखल रूग्णांची स्थिती व तेथील सुविधांचा आढावा घेण्यासाठी महिला व बालकल्याण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची या रूग्णालयातील कोविड वॉर्डाला भेट, उपचार घेत असलेल्या रूग्णांची विचारपूस करुन दिलासा.

१ जून २०२०

  • मे महिन्यात 1 कोटी 52 लाख 52 हजार 4 शिधापत्रिकाधारकांना 74 लाख 84 हजार 10 क्विंटल अन्नधान्याचे वाटप, 33 लाख 84 हजार 40 शिवभोजन थाळ्यांचे    वाटप करण्यात आल्याची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री छगन भुजबळ यांची माहिती.
  • मासेमारी हंगामाच्या शेवटच्या दिवशी  (31 मे) परराज्यांतील मच्छीमार/ खलाशांना गावी जाता यावे, यासाठी रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून उत्तरप्रदेश व आंध्रप्रदेश मधील मच्छीमारांना गावी पाठवण्याची मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्याद्वारे व्यवस्था. याद्वारे 2300 मच्छिमार व खलाशांना श्रमिक रेल्वेद्वारे त्यांच्या राज्यात रवानगी            .
  • लॉकडाऊन सुरू झाल्यापासून कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ४,४०,६९६ पोलिसांमार्फत पासेसचे वितरण, ५,९२,५८० व्यक्तींना क्वारंटाइन, २२ मार्च ते ३१ मे  या कालावधीत  १,२१,०७५ गुन्ह्यांची नोंद, २३,६४१ व्यक्तींना अटक, विविध गुन्ह्यांसाठी ६ कोटी ११ लाख ९३ हजार ८४८ रुपयांचा दंड , पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २५७ घटना, त्यात ८३५ व्यक्तींना ताब्यात, हेल्पलाइन क्रमांक १०० नंबरवर ९८,६४२ दूरध्वनी, क्वारंटाइन शिक्का असलेल्या ७०६ व्यक्तींना शोधून त्यांची विलगीकरण कक्षात रवानगी. एकूण ५,९२,५८० व्यक्ती क्वारंटाइन, अवैध वाहतूक करणाऱ्या १३२३ वाहनांवर गुन्हे दाखल, ७६,८८३ वाहने जप्त,  मुंबईतील १५ पोलीस व १ अधिकारी अशा एकूण १६, पुणे २, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, ए.टी.एस. १, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण १ अशा २७ पोलिसांचा मृत्यू. पोलिसांना कोरोना संदर्भातील लक्षणे दिसून आल्यास  तातडीने उपचार करण्यासाठी सर्वत्र नियंत्रण कक्ष, १९१ पोलीस अधिकारी व १३२३ पोलीस कोरोना  बाधित, त्यांच्यावर उपचार सुरू. सध्या ८१० रिलिफ कँम्प मध्ये ३७,९९४ लोकांची व्यवस्था.  
  • महाराष्ट्र सायबर विभागामार्फत सायबर संदर्भात ४५०  गुन्हे दाखल, २३९ व्यक्तींना अटक.  तपशील- आक्षेपार्ह व्हाट्सअॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १८६ गुन्हे, फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १८० गुन्हे, टिकटॉक विडिओ शेअर प्रकरणी २३ गुन्हे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ८ गुन्हे, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे, सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, यू ट्यूब) गैरवापर केल्या प्रकरणी ४९ गुन्हे. १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स काढून टाकण्यात यश.
  • लॉकडाऊन दरम्यान औषध निर्मिती उद्योगांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांच्याद्वारे विविध फार्मा कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत वेबिनारद्वारे संवाद, देशात तीन ठिकाणी फार्मा पार्क सुरू करण्याचा केंद्र शासनाचा प्रस्ताव, यापैकी एक फार्मापार्क महाराष्ट्रात सुरू होण्यासाठी प्रयत्न करण्याचे सुतोवाच. औषध उत्पादक कंपन्यांच्या सूचनांनुसार रायगड जिल्ह्यात देशातील सर्वात अद्यायवत अशा फार्मापार्कचे नियोजन.
  • कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मार्चच्या तुलनेत मे मध्ये सुमारे साडेतीन पटीने वाढून ४३.३५ टक्के एवढे. मे मध्ये सर्वाधिक रुग्ण बरे, रुग्ण दुपटीचा कालावधी (डबलींग रेट) ११ वरून १७.५ दिवसांवर. ३१ मे अखेर ६७ हजार ६५५ रुग्णांपैकी  २९ हजार ३२९ रुग्ण बरे, रिकव्हरी रेट मार्चच्या तुलनेत सुमारे साडे तीन पटीने वाढून ४३.३५ टक्के एवढा.
  • १ मे ते १ जून या महिनाभरात  ११ लाख ८६  हजार २१२ परप्रांतीय कामगारांची ८२२ श्रमिक ट्रेनद्वारे स्वगृही रवानगी. तपशील- ४५० बिहार, १७७ मध्यप्रदेश,  ३४, झारखंड ३२, कर्नाटक  ६, ओरिसा १७, राजस्थान २०, पश्चिम बंगाल ४७, छत्तीसगड ६.    
  • कोवीड 19 च्या साथरोगामुळे निर्माण झालेली परिस्थिती व आर्थिक काटकसरीच्या धोरणामुळे आदिवासी समाजातील मुलांसाठी नामांकित इंग्रजी शाळेतील प्रवेशास आदिवासी विभागाने तात्पुरती स्थगिती दिली असून आदिवासी समाजातील 53 हजार विद्यार्थ्यांचे इंग्रजी माध्यमातील शिक्षण सुरूच राहणार असल्याची आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांची माहिती. यंदा 2640  मुलांना  इंग्रजी माध्यमात इयत्ता पहिली पासून शिक्षण घेण्यासाठी या वर्षी प्रवेश देणार, मानांकित शाळेतील इयत्ता दुसरी ते बारावीतील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरूच राहणार.

2 जून 2020

               मंत्रीमंडळ निर्णय

  • मुंबईतील खासगी रुग्णालयांनी 80 टक्के बेडस राखीव ठेवण्याच्या शासनाच्या आदेशांचे काटेकोर पालन करावे यासाठी अशा रुग्णालयांमध्ये पालिकेने अधिकारी नियुक्त करण्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश. उपाययोजना तपशील-  प्रत्येक बेडला युनिक आयडी, डायलिसीस रुग्णांना यापुढे उपचार मिळणार, प्रयोगशाळांना 24 तासात चाचणी अहवाल देणे बंधनकारक, मुंबईत रुग्ण दुपटीचा वेग 19 दिवसांवर.  3750 खाजगी डॉक्टर उपचारांसाठी येण्यासाठी तयार, 450 डॉक्टर्स पैकी 60 जणांचे प्रशिक्षण पूर्ण , मुंबईत सध्या 21 हजार ॲक्टिव्ह रुग्ण. राज्याचा तपशील- देशाच्या एकूण रुग्ण संख्येच्या 35.23 टक्के रुग्ण महाराष्ट्रात, देशाच्या तुलनेत 31.19 टक्के रुग्ण सुधारण्याचे प्रमाण, महाराष्ट्रात मृत्यू दर 3.37 टक्के असून देशाचा मृत्यू दर 2.82 टक्के. जगात दर दहा लक्ष लोकांमागे 778 मृत्यू असताना महाराष्ट्रात हे प्रमाण 48. राज्यातील 30 ते 40 वयोगटात कोरोना लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 40 टक्के तर 40 ते 50 वयोगटात ते 18 टक्के. 50 ते 60 वयोगटात ते 16.5 टक्के, मृत्यू पावलेल्या 32 टक्के रुग्णांना इतर कोणतेही आजार नव्हते. 67 टक्के लोकांमध्ये इतर आजार. मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 41.33 टक्के, ठाण्यात 36.59 टक्के, आत्तापर्यंत 4.5 लक्ष चाचण्या पूर्ण, देशात 2621 चाचण्या होतात. पूर्वी एकूण झालेल्या चाचण्यांपैकी 18 टक्के पॉझिटिव्ह, ते कमी होऊन 15.5 टक्के, सध्या केवळ 1400 रुग्ण गंभीर. 70 लाख चाचण्या पूर्ण. एकूण 18 हजार पथकांची यासाठी नियुक्ती.  
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा निर्णय. यामुळे या योजनेच्या अंगीकृत सर्व रुग्णालयांमध्ये नागरिकांना उपचार घेता येणे शक्य. या संदर्भातील निर्णयास मंत्रिमंडळाची कार्योत्तर मंजुरी.
  • वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने तातडीने निर्णय घेऊन अनिश्चितता दूर करण्याचे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांचे निर्देश.
  • लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ४,४४,३३३ पास  पोलीस विभागामार्फत वितरीत, ६,०३,७४१ व्यक्तींना क्वारंटाइन,  दि.२२ मार्च ते १ जून  या कालावधीत  १,२१,२३० गुन्ह्यांची नोंद, २३,६५१ व्यक्तींना अटक. विविध गुन्ह्यांसाठी ६ कोटी २२ लाख ४९ हजार ९५१ रुपयांचा दंड.
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ई-पास ला जून अखेरपर्यंत मुदतवाढ, दि.२३ मार्च ते ३१ मे २०२० पर्यंतच्या काळात रेशन धान्य वाटप करतांना अनियमितता तसेच नियमांचे पालन न केलेल्या ४८३ रेशन दुकानांचे निलंबन, ३२२ रेशन दुकानांचे परवाने रद्द, ९३ रास्तभाव दुकानदारांची १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्यात आल्याची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री  श्री छगन भुजबळ यांची माहिती. तपशील - नागपूर महसूल विभाग- ७८ रेशन दुकानांचे निलंबन, १३ दुकानांचा परवाना रद्द. अमरावती महसूल विभाग २२ रेशन दुकानांचे निलंबन ३२ दुकानांचा परवाना रद्द, औरंगाबाद महसूल विभाग ७१ रेशन दुकानांचे निलंबन, ६ दुकानांचा परवाना रद्द. नाशिक महसूल विभागात एकूण ६१ रेशन दुकानांचे निलंबन, ७३ दुकानांचा परवाना रद्द. पुणे महसूल विभाग १९५ रेशन दुकानांचे निलंबन, १८३ दुकानांचा परवाना रद्द. कोकण महसूल विभागात एकूण ३१  रेशन दुकानांचे निलंबन, ७ दुकानांचा परवाना रद्द. मुंबई शहरातील एकूण २५ रेशन दुकानांचे निलंबन ८  दुकानांचा परवाना रद्द.
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राज्य शासनाने ताब्यात घेतल्या असतानाही  खासगी रुग्णालयांकडून अपेक्षित सहकार्य होत नसल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांच्याद्वारे मुंबईतील खासगी रुग्णालयांना भेटी, शासनाचे आदेश न पाळणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचा इषारा.
  • कोरोना विषाणूमुळे होत असलेला प्रादुर्भाव टाळण्यासाठी  SARS COV- 2 ही लस तत्काळ विकसीत करण्यासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत संशोधनास प्रारंभ, या लसीचा सर्वातआधी माकडांवर प्रयोग करण्यात येईल. यासाठी 30 माकडे तत्काळ उपलब्ध करून देण्याचे वनमंत्री श्री संजय राठोड यांचे निर्देश.
  • सायबर विभागामार्फत  ४५३  गुन्हे दाखल, २३९ व्यक्तींना अटक.
  • राज्य आयटीआय निदेशक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी (कोव्हीड १९) साठी २ लाख रुपयांची मदतीचा धनादेश कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांच्याकडे सुपूर्द.

3 जून 2020

  • हिंदुस्थान युनी लिव्हर लि. कंपनीमार्फत  १० कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत. यामध्ये  ५.०४ कोटी रुपयांच्या २८ हजार ८०० टेस्टिंग किटस, ५ कोटी रुपये किंमतीची विविध वैद्यकीय संसाधने- व्हेंटिलेटर्स, पीपीई किटस (वैयक्तिक संरक्षण साधने), मास्क, हातमोजे, पल्स ऑक्सीमिटर, ऑक्सीजन सकेंद्रक (oxygen concentrators) यांचा समावेश. मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आभार व्यक्त.
  • ९९६ रुग्णांना घरी सोडण्यात आले, आतापर्यंत ३२ हजार ३२९ रुग्णांची घरी रवानगी. २५६० नवीन रुग्णांचे निदान, ३९ हजार ९३५ रुग्णांवर उपचार सुरू, सध्या ४६ शासकीय आणि ३६ खाजगी अशा एकूण ८२ प्रयोगशाळा कार्यरत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ९७ हजार २७६ नमुन्यांपैकी ७४ हजार ८६० जण पॉझिटिव्ह. ५ लाख ७१ हजार ९१५ लोक होम क्वारंटाईनमध्ये. दि. १ मे ते १ जून या कालावधीत रुग्ण वाढीचा वेग कमी होत असून दि.१ जून रोजी, देशाच्या सरासरीपेक्षा ( ४.७४ टक्के ) कमी, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीत वाढ, राज्यातील कोरोना प्रसाराचा वेग मंदावत असल्याचे स्पष्ट.

4 जून 2020

  • वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री अमित देशमुख यांनी सादर केलेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय परीक्षा घेण्याबाबतचा विस्तृत आराखड्यास राज्यपाल तथा कुलपती श्री भगतसिंह कोश्यारी यांची मंजूरी. परीक्षा घेण्यासंदर्भात  तीन पर्याय, पहिला- परिस्थिती अनुकुल असल्यास सर्व लेखी परीक्षा १५ जूलै ते १५ ऑगष्ट या कालावधीत, दुसरा - या कालावधीत परिक्षा घेणे शक्य न झाल्यास लेखी परीक्षा १६ ऑगष्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत. तिसरा-             उपरोक्त दोन्ही पर्यायांनुसार परीक्षा होऊ न शकल्यास आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे केंद्रीय वैद्यकीय परिषदेचे मार्गदर्शन घेऊन ऑनलाईन किंवा इतर पध्दतीने परीक्षा घेण्याबाबत निर्णय.
  • मिशन बिगिन अगेन अंतर्गत काही नवीन उपक्रमांना संमती, यासाठी ३१ मे रोजी जारी करण्यात आलेल्या शासन आदेशातील मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा जाहीर, एमएमआर क्षेत्रातील महापालिका तसेच पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिकांमधील कंटेनमेंट झोन वगळून अन्य ठिकाणी ३ जूनपासून मोकळ्या जागांमध्ये सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, वॉकिंग आदी शारीरीक व्यायामांना काही अटिंच्या अधीन राहून संमती देण्यात आली होती. आता या सुविधेचा लाभ घेताना बगिच्यांमधील व्यायाम साहित्य, ओपन एअर जीममधील साहित्य, खेळाच्या मैदानावरील स्विंग्ज, बार्स यांसारखे साहित्य यांचा वापर करता येणार नाही,. ५ जूनपासून सुरु होणाऱ्या मिशन बिगिन अगेन टप्पा २ मध्ये या महापालिका क्षेत्रांमधील कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणचे रोड, गल्ली, भाग यांच्या एका बाजुची दुकाने एका दिवशी त्यांच्या नियमीत वेळेत सुरु राहतील, तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजुची दुकाने नियमीत वेळेत सुरु राहतील, ८ जूनपासून सुरु होणाऱ्या मिशन बिगिन अगेन टप्पा ३ मध्ये या महापालिका क्षेत्रांमधील कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी खाजगी कार्यालयांना १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या क्षमतेसह कामकाज करण्यास संमती.७ जूनपासून या महापालिका क्षेत्रांमधील कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी वृत्तपत्रांची छपाई तसेच ग्राहकांना माहिती देऊन वितरण (होम डिलीव्हरीसह) करण्यास अनुमती. उपरोक्त महापालिका क्षेत्र सोडून राज्याच्या इतर भागात विविध उपक्रमांना काही अटींच्या अधीन राहून संमती देण्यात आली होती. यामध्ये आता विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा या शैक्षणिक संस्थांची कार्यालये, कर्मचारी यांना काही अशैक्षणिक कामांसाठी संमती. यामध्ये ई - मजकूर तयार करणे, उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन तसेच निकाल जाहीर करणे यांचा समावेश. सध्या नागरिकांचा आंतरराज्य तसेच आंतरजिल्हा प्रवास नियंत्रीत स्वरुपात राहील. तथापि, एमएमआर क्षेत्रामधील महापालिकांमध्ये  नागरिकांच्या आंतरजिल्हा प्रवासास कोणत्याही निर्बंधाशिवाय परवानगी. अडकलेले श्रमिक, स्थलांतरीत श्रमिक, यात्रेकरु, पर्यटक यांचा प्रवास मात्र निर्धारित केलेल्या कार्यप्रणालीनुसार (एसओपी) नियंत्रित केला जाईल.
  • लॉकडाऊन सुरू झाल्यापासून १,२२,४८४ गुन्ह्यांची नोंद, २३,८२० व्यक्तींना अटक, विविध गुन्ह्यांसाठी ६ कोटी ३८ लाख ८३ हजार ३५१ रुपयांचा दंड.
  • वंदेभारत अभियानांतर्गत  ३० फ्लाईटसने १९ देशातील ४०१३ नागरिक महाराष्ट्रात दाखल, यामध्ये १३०९ नागरिक मुंबईचे, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या १६९१, इतर राज्यातील प्रवासी १०१३.
  • मुदत संपलेल्या १ हजार ५६६ इतक्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय. यासंदर्भात ग्रामपंचायत कायद्यामध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी अध्यादेश काढण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असल्याची ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती.
  • कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव पाहता तो रोखण्याच्या अनुषंगाने जुलै ते डिसेंबर २०२० दरम्यान प्रस्तावित असलेल्या १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती.
  • कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या आशा गटप्रवर्तक तसेच अर्धवेळ स्त्री परिचर यांच्या कामाची दखल घेऊन प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचा निर्णय. एकूण २ लाख ७४ हजार इतक्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना याचा लाभ. आता आशा गटप्रवर्तक आणि आरोग्य उपकेंद्रांमधील अर्धवेळ स्त्री परिचरांनाही प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल.
  • कोरोनाविरुद्ध काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यात आला असून त्यांच्या वेतनासाठी असलेली ग्रामपंचायत करवसुलीची अट रद्द करण्याचा निर्णय.
  •  1352 रुग्णांना घरी सोडण्यात आले, आतापर्यंत ३३ हजार ६८१ रुग्णांची घरी रवानगी. कोरोनाच्या  2933 नवीन रुग्णांचे निदान, 41 हजार 393 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांची माहिती.

 जून 2020 

  •  कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ४ लाख ५३ हजार ४७७ पासेसचे  पोलीस विभागामार्फत वितरण, दि.२२ मार्च ते ४ जून  या कालावधीत  १,२२,७७२ गुन्हयांची नोंद, २३,८२७ व्यक्तींना अटक, विविध गुन्ह्यांसाठी ६ कोटी ४२ लाख ८३ हजार २११ रुपयांचा दंड.
  • महाराष्ट्रात अडकून पडलेल्या २१ राज्यातील ११ लाख ९० हजार ९९० कामगारांची ८२६ विशेष श्रमिकट्रेन द्वारे मूळ राज्यात रवानगी. या कामगारांच्या तिकीटांसाठी १०० कोटी रुपये शासनाकडून खर्च. तपशील-उत्तर प्रदेश (४५०), राजस्थान (२०), बिहार (१७७), कर्नाटक(६), मध्यप्रदेश (३४),प.बंगाल (४९ )जम्मू (५) ,ओरिसा(१७), छत्तीसगढ(६), आसाम (६ ) उत्तराखंड(३ ), झारखंड (३२ ), आंध्र प्रदेश(३),गुजरात(४ ), हिमाचल प्रदेश (१ ),त्रिपुरा (१), तामिळनाडू(५ ), मणिपूर (३ ) केरळ (2), तेलंगणा(1), मिझोरम (1)      
  • पोल्ट्रीमध्ये करोना विषाणूपेक्षा भयंकर असा ॲपोकॅलिप्टीक व्हायरस येण्याची शक्यता असून त्यामुळे मानव समूहामध्ये कोरोनापेक्षा जास्त मृत्यू होण्याची शक्यता अमेरिकेतील आहार तज्ज्ञ डॉ. मायकल ग्रेगर यांचा हवाला देवून एका वृत्तवाहिनेमध्ये बातमी प्रसिध्द, परंतु ॲपोकॅलिप्टीक असा कोणताही व्हायरस अस्तित्वात नसल्याचे पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव श्री अनूप कुमार यांचा खुलासा.
  • 15 मे 2020 ते 5 जून 2020 या काळात 9 लाख 47 हजार 859  ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवेचा लाभ. मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर, 10,791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 7,261 अनुज्ञप्ती सुरू. अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी दि. 24 मार्च, 2020 पासुन दि. 5 जून 2020 पर्यंत 7,225 गुन्ह्यांची नोंद, 3,344 आरोपींना अटक, 662 वाहने जप्त, 18 कोटी 67 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.
  • १४७५ रुग्णांना घरी सोडण्यात आले, आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ३५ हजार १५६, २४३६ नवीन रुग्णांचे निदान, ४२ हजार २१५ रुग्णांवर उपचार सुरू, ४६ शासकीय आणि ३७ खाजगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख २२ हजार ९४६ नमुन्यांपैकी ८० हजार २२९ जण पॉझिटिव्ह.

६ जून २०२०

  • लॉकडाऊनच्या काळात व लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अन्न नागरी पुरवठा विभागाचा अन्नधान्य वाटपाचा विक्रम, एप्रिल महिन्यात ६८ लाख १३ हजार क्विंटल, मे महिन्यात ७६ लाख ८३ हजार क्विंटल धान्याचे वाटप. १ एप्रिल ते ५ जून पर्यंत ६२ लाख ८४ हजार ४१३ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आल्याची, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत महिन्यात साधारणतः ३५ लाख क्विंटल धान्य वितरण, मात्र एप्रिलमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या ३१ लाख ५१ हजार क्विंटल मोफत तांदूळ वाटपामुळे दुप्पट म्हणजे ६८ लक्ष १३ हजार क्विंटल अन्नधान्य वाटप. मे आणि जून मध्ये केशरी कार्ड धारकांना अतिरिक्त १ लाख ५० हजार क्विंटल धान्य वाटप, मे महिन्यात ७६ लक्ष ८३ हजार क्विंटल धान्य वितरीत, एप्रिल महिन्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ६.६९ कोटी नागरिकांना  ३६ लाख ६१ हजार क्विंटल (९५%) धान्य  वितरीत, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा लाभार्थ्यांना नियमित धान्य घेतल्यानंतर एप्रिल ते जूनपर्यंत एप्रिल महिन्यात ५ कोटी ९३ लाख (९० टक्के) लाभार्थ्यांना ३१ लाख ५१ हजार ३८० क्विंटल मोफत तांदुळाचे वितरण, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या ३६ लाख ५८ हजार ६९९ लाभार्थ्यांना एप्रिल मध्ये राज्यात ते जिथे आहेत त्या ठिकाणी अन्नधान्याची उचल करण्याची सुविधा. मे महिन्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ६.५८ कोटी नागरिकांना ३६ लाख ९२ हजार९० क्विंटल (९० टक्के) धान्य वितरीत, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ६ कोटी ०२ लाख लाभार्थ्यांना ३१ लाख ७३ हजार २२० क्विंटल (९१ टक्के) मोफत तांदळाचे वितरण, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अन्न सुरक्षा योजनेच्या पात्र ७ कोटी लाभार्थ्यांना मे मध्ये ९७ हजार ५ क्विंटल मोफत डाळ वितरण, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या एपीएल केसरी कार्डधारक ३ कोटी ८ लाख लाभार्थ्यांपैकी १ कोटी ५८ लाख (५२ टक्के) नागरिकांना मे मध्ये ८ लाख १८ हजार क्विंटल धान्याचा लाभ. ८३८ शिवभोजन केंद्रांमधून दररोज दीड लाख शिवभोजन थाळीचे वितरण, एप्रिल महिन्यात ७७२ केंद्रांमधून २३ लाख ९९ हजार ७३७ शिवभोजन थाळ्या, मे महिन्यात ८३८ केंद्रांमधून ३३ लाख ८४ हजार ४० शिवभोजन थाळ्या तर जून महिन्यात दि. १ ते ५ जून पर्यंत ८३८ केंद्रांमधून ५ लाख ६३६ शिवभोजन थाळीचे वितरण.
  • कोरोना संकटकाळात हलगर्जीपणा करणाऱ्या काही खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्याचे व  या रुग्णालयांच्या समन्वयासाठी वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्याचे, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी निर्देश.
  • कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी शासन ‘रेमडेसीवीर’ इंजेक्शनच्या १० हजार व्हॉयल्स विकत घेण्यात येणार असल्याची आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांची माहिती.  
  • कोविड संदर्भात आतापर्यंत १ लाख २३ हजार  गुन्ह्यांची नोंद, ६ कोटी ५४ लाख रुपयांचा दंड करण्यात आल्याची, गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांची माहिती.  
  • कोरोना चाचण्यांसाठी मान्यता प्राप्त असलेल्या प्रयोगशाळांचे कोरोना निदान चाचणी शुल्क निश्चित करण्यासाठी, राज्य आरोग्य हमी सेवा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ, सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुल्क निश्चिती समिती स्थापन, यामध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक अजय चंदनवाले, ग्रॅंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रा. अमिता जोशी यांचा समावेश. समितीमार्फत सात दिवसात दर निश्चित केले जातील.
  • महाराष्ट्र सायबर विभागामार्फत सायबर संदर्भात ४५८  गुन्हे दाखल,  २५० व्यक्तींना अटक.  
  • २२३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले, आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ३७ हजार ३९०, २७३९ नवीन रुग्णांचे निदान, ४२ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरू. १२० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद.

टिप्पण्या