- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शेख हबीब यांनी घेतला वयाच्या ८५ व्या वर्षी जगाचा निरोप
अकोला आणि परिसरातील हिंदू ,मुस्लिम समाजातील अनेक लग्नांमध्ये बँड वाजवून लग्ने केली होती धुमधडाक्यात
अकोला: संगीताच्या दुनियेतील सेकसोफोन मास्टर म्हणून परिचित असलेले ताज दरबार बँडचे मालक शेख हबीब यांनी बुधवार, १०जून रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.त्यांच्या पश्चात ३ मुले,६ मुली ,सुना आणि नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे.
लग्ने आणि बँडबाजा यांचा अगदी जवळचा संबंध आहे.बॅंडबाजा वाजल्याशिवाय लग्न झाल्याचे समाधान मिळत नाही .आणि जितका चांगला बँड असतो, तितकी श्रीमंती दोन्ही कंडील मंडळीची दिसत होती. लग्नात बँड वाजविण्यासाठी मातंग समाजात सर्वात जास्त कलाकार होते. त्यामुळे बँड पथके केवळ मातंग समाजातच होती. नव्हे तर बँडचा ठेका हा त्यांच्याच कडे होता. परंतु मुस्लिम समाजातील लग्नांमध्ये आणि हिंदू धर्मातील लग्नांमध्ये ताज दरबार बैंड एक सुप्रसिद्ध बँड होता. त्यातही ऑर्केष्ट्रा
आणि सेकसोफोन हे वाद्य सर्वसामान्य लोकांना मोठे आकर्षण होते. आणि वाद्य वाजविणारे मुस्लिम समाजातील मोहम्मद अली रोड स्थित ताज दरबार बैंडचे मालिक शेख हबीब यांच्यामुळे ताज दरबार बैंड हा सुप्रसिद्ध बँड होता. या बँड ने सन १९७० ते ८० च्या दशकात मोठे नावलौकिक मिळविला होता.
........................
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा