BJP: भाजपाने सुरू केले शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र!

भाजपाने सुरू केले शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र!

अकोला: अकोला जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांच्या मदती साठी मदत केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी दिली आहे.

लेखी स्वरूपात पाठवा तक्रारी

अकोला जिल्ह्यात अनेक शेतकरी पिक विमा रक्कम मिळण्यापासून वंचित असून तसेच अनेक शेतकरी कर्ज माफी झाल्यानंतर सुद्धा कर्ज माफी पासून वंचित आहेत. या संदर्भात अनेक तक्रारी भाजपाकडे प्राप्त झाल्या असून, अशा शेतकऱ्यांनी भाजपाच्या मदतकेंद्र कक्ष येथे लेखी स्वरुपात आपल्या दोन्ही तक्रारी  वेगवेगळ्या online whatsapp नंबर ९७६४२९६९०६  किंवा rsawarkarbjpakola@gmail.com या मेल वर पाठवाव्या.या तक्रारी सोबत आपले आधारकार्ड क्रमांक, मोबाईल नंबर, बँकेचे नाव, बँकेचे शाखा गाव व तालुका,खाता नंबरची माहिती अर्जा सोबत द्यावी.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्ह्यात आंदोलन

भारतीय जनता पक्षाच्या वतीने बँक कर्ज  व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचेशी चर्चा करीत असतांना, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा लाभ ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही. तरी पिक कर्ज देण्यात होत असलेला विलंब, चुकीचे पुनर्गठन, पिक विम्याचे पैसे मिळाले नाही, शासन आदेश असून सुद्धा हमी करिता १०० रुपयाच्या बॉंड पेपरची सक्ती, या विषयांवर शेतकऱ्यांचे प्रश्न प्रखरपणे मांडले. 

तक्रारी आल्यास निश्चित कारवाई

या संदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यास निश्चितपणे कारवाई करू व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सकारात्मक पाऊले उचलू ,असे अभिवचन जिल्हाधिकारी यांनी दिले. 

यासाठी भाजपाने शेतकऱ्यांच्या तक्रारी लेखी स्वरुपात जमा करण्यासाठी मदत केंद्र सुरु केले आहे .तसेच शेतकऱ्यांनी आपली तक्रार भाजपा पदाधिकारी व लोकप्रतिनिधीकडे जमा केल्यास त्या संदर्भात पाठपुरावा जिल्हास्तरावर करण्यात येईल अशी माहिती भाजपा सूत्रांनी दिली आहे.
.........

टिप्पण्या