BJP:केंद्र सरकारच्या वर्षपुर्ती निमित्त संपर्क अभियानाचा अकोला जिल्ह्यात शुभारंभ

केंद्र सरकारच्या वर्षपुर्ती निमित्त संपर्क अभियानाचा अकोला जिल्ह्यात शुभारंभ 
अकोला: महाराष्ट्रातील २ कोटी ७५ लक्ष मतदारांनी नरेंद्र मोदी यांना दुस-यांदा पंतप्रधान केले. गरिबांच्या कल्याणासाठी, देशहितासाठी मोदी यांनी अनेक योजना अमलात आणल्या. त्या योजनांची माहीती गरीब जनतेपर्यंत पोहचविण्याचा उपक्रम १ जुन पासुन सुरु झाला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे ख-या अर्थाने विकासयोध्दा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे ख-या अर्थाने विकासयोध्दा आहे. देशाला प्रगतीपथावर नेण्यांसाठी काहीतरी वेगळे करण्याची उर्मी त्यांच्यात आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाात देशात दुस-यांदा सरकार स्थातपन झाल्यानंतर धारा ३७० रद्द झाले. अयोध्देत प्रभु श्रीरामचंद्राच्या मंदीराच्यात निर्माणाचे भारतवासीयांचे स्वप्न‍ पुर्ण झाले. नागरिकता संशोधन कायदा लागु झाला. आर्थिक सुधारणांना गती देण्यात आली. भारताला आत्मानिर्भर बनविण्यासाठी या नेत्याने राष्ट्रव्यापी अभियान हाती घेतले. 

जिल्ह्यातील  बूथवर १६८३  संपर्क अभियान सुरू 

कोरोनाच्या महामारीच्या सामना करताना आपल्या ओजस्वी कामगीरीने जगाला दिशा दाखविण्याचे काम पंतप्रधान मोदीनी केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाातील आत्मनिर्भर भारत घडविण्यांसाठी आशिर्वाद द्यावा, यासाठी केंद्रीय मंत्री नामदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, जिल्हा महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने सह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व भाजप पदाधिकारी यांनी  जिल्ह्यातील  बूथवर १६८३  संपर्क अभियान सुरू केले. पहिल्याच दिवशी १३हजार ८३२ कुटुंब कुटुंबाशी संपर्क साधण्याचा दावा भाजपा प्रवक्ते गिरीश जोशी यांनी केला.

संपर्क अभियानाचा शुभारंभ १२ जुन रोजी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुस-या टर्मच्या प्रथम वर्षपुर्ती निमित्त भाजपा तर्फे आयोजित संपर्क अभियानाचा शुभारंभ १२ जुन रोजी करण्याात आला. सोशल डिस्टंमसिंगचे काटेकोरपणे पालन करत .  भाजपा लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वात यांच्या  या अभियानाचा श्रीगणेशा झाला. यावेळी मोदी सरकारच्या गेल्या ५ वर्षाच्या कारकिर्दीतील निर्णयांची माहीती त्यांनी दिली. स्वदेशीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाटचाल सुरु आहे. ग्रामआधारीत अर्थव्यवस्थाा, कृषी क्षेत्र, ग्रामोद्योग, लघुउद्योग, कुटीर उद्योग यांना चालना देण्यासाठी त्यांनी उचललेली पावले अतिशय महत्व पुर्ण आहेत. स्वदेशी आणि स्वावलंबनाचा नारा देत देशाचा आत्म सन्मान नरेंद्र मोदी यांनी जागृत केला आहे. वोकल फॉर लोकल हे सुत्र सांगत स्थाानिक उद्योजकांना प्रोत्साहन व स्‍थानिक नागरिकांना रोजगाराच्या  संधी देण्याचे मोठे काम त्यांनी केले आहे. 

६ वर्ष सुवर्णाक्षरात नोंदविले जाणार 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, किसान पेन्शन योजना, लघु व्यापारी मानधन योजना, हर घर जल योजना अशा विविध योजनांच्या माध्यामातुन सर्व घटकांना दिलासा देणारे निर्णय त्यांनी घेतले. देशाच्या इतिहासात मोदीजींच्या नेतृत्वातील हे ६ वर्ष सुवर्णाक्षरात नोंदविले जाणार आहेत. गेल्या १ वर्षात जे महत्वपुर्ण निर्णय त्यांनी घेतले हे सर्व घटकांसाठी कल्याणकारी आहेत. जागतिक मंचावर RCEP चा विरोध करत मोदी सरकारने देशातील शेतकरी व छोटया व्यावसायींकाच्या हिताला व सुरक्षेला प्राधान्य दिले. आर्थिक सुधारणांकडे वाटचाल करत १० सरकारी बँकांचे विलनीकरण करत ४ मोठया बँका बनविण्यााचे महत्वपुर्ण पाऊल त्यांनी उचलले. सोबतच बँकांसाठी ५५,२५० कोटीच्या बेलआउट पॅकेजची घोषणा त्यांनी केली. सर्वे सुखीनः संतु सर्वे निरामयः या उक्तीनुसार कोरोना महामारीच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय या देशाला सुरक्षा कवच प्रदान करणारे ठरले. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाचे भुषण असल्याचे प्रतिपादन आ. रणधीर सावरकर यांनी केले. यावेळी मोदी सरकारच्या विविध उपलब्धींची प्रकाशने, जिल्हयात झालेल्या विकास कामांची माहीती, कोरोनाशी लढतांना घ्यावयाच्या खबरदारीच्या उपाययोजनांची माहीती देणारी पत्रके त्यांनी कुटुंब प्रमुखांना भेट दिले. या उपक्रमाचे अकोलेकरांनी कौतुक केले.
.................................

टिप्पण्या