- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*कोरोना अलर्ट*:Akola:आज 31 पॉझिटिव्ह!
*आज गुरुवार दि.२५ जून २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-१७९*
*पॉझिटीव्ह अहवाल-३१*
*निगेटीव्ह-१४८*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी प्राप्त अहवालात ३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात १२ महिला व १९ पुरुष रुग्ण आहेत. त्यातील आठ जण हरिहरपेठ येथील, सहा जण डाबकी रोड येथील, आदर्श कॉलनी येथील तीन, सिंधी कॅम्प येथील दोघे तर उर्वरीत बाळापूर, अण्णाभाऊ साठे नगर, श्रीवास्तव चौक, भीमनगर, गंगानगर, पातूर, काळवाडी, अकोट फैल, तारफैल, देशमुख फैल, लक्ष्मीनगर, केंद्र खुर्द जि. हिंगोली येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका केंद्र खुर्द जि.हिंगोली येथील २१ वर्षीय महिलेचा समावेश असून ही महिला दि.२२ रोजी दाखल झाली होती. तिचा काल (दि.२४) रात्री मृत्यू झाला. तिचा अहवाल आज पॉझिटीव्ह आला आहे. तसेच अन्य एक ५० वर्षीय पुरुष रुग्ण खामखेड ता. बाळापुर येथिल रहिवासी आहे. हा रुग्ण दि.१५ रोजी दाखल झाला होता. त्याचा काल रात्री मृत्यू झाला.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १३४०*
*मयत-७३ (७२+१), डिस्चार्ज-९०५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ३६२*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
आज कोरोना रुग्णांना दिलेला नाश्ता
आजचे पर्जन्यमान
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा