- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
विद्यार्थी उद्योजकतेसाठी शिवाजी महाविद्यालयाचा अभ्यंकर व रसोई उद्योगाशी सामंजस्य करार
अकोला: श्री शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उद्योजकतेची आवड निर्माण व्हावी व शिक्षणानंतर स्वतःचा उद्योग स्थापन करण्यासाठी प्रेरणा मिळावी, याकरिता प्राचार्य डॉ रामेश्वर भिसे, विज्ञान विभागाचे डॉ गजानन कोरपे, वाणिज्य विभागाचे डॉ अनिल राऊत यांनी अकोला येथील अभ्यंकर समूह व रसोई उद्योग एमआयडीसी परिसर येथे जावून महाविद्यालयाचा व ह्या उद्योगांचा एक सामंजस्य करार स्थापन केला.
भविष्यामध्ये या उद्योग समूहाचे उत्पादने विद्यार्थी उद्योजकता सेल मधून व ग्राहक भंडारा मधून विक्री करतील व तशाच प्रकारची उत्पादने आपण देखील निर्माण करू शकतो, अशा स्वरूपाची भावना तयार होईल या हेतूने हा सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कडून बॅचलर ऑफ व्होकेशनल या अभ्यासक्रमाची मागणी देखील महाविद्यालयांनी केली आहे. अशा विद्यार्थ्यांना व वाणिज्य तसेच अर्थशास्त्र व विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांना अशाप्रकारचा सामंजस्य करार अधिक उपयुक्त ठरेल.
महाविद्यालयातील उद्योजकता सेलच्या समन्वयक डॉ अंजली कावरे यांनी गृहविज्ञान विभागात विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांकडून अनेक गृहोपयोगी वस्तू बनविल्या असून, त्याची नियमित विक्री महाविद्यालयात सुरू आहे. त्यामध्ये अशा सामंजस्य कराराची अधिक भर पडून विद्यार्थी उद्योजककडे वळतील, असे मत प्राचार्य डॉ भिसे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी अभ्यंकर समूहाचे अभ्यंकर ब्रदर्स मसालेवाले इन्स्टंट फूड तसेच रसोई स्पायसेस आणि ऍग्रो प्रोसेसर यांचे संचालक आशिष चंदाराणा व प्राध्यापक अतुल यादगिरे उपस्थित होते.
.........
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा