अकोला ते अकोट महामार्ग क्रमांक 161-A चे कामगार आर्थिक विवंचनेत

अकोला ते अकोट महामार्ग क्रमांक 161-A चे कामगार आर्थिक विवंचनेत
अकोला: अकोला ते अकोट महामार्ग क्र. 161-A चे काम दिनांक 11  डिसेंबर 2017 पासून चालू करण्यात आले आहे हे काम तीन भागात विभागले असून, मुख्य कंत्राट एम. बी. पाटील या कंपनीला मिळाले आहे. अकोला ते अकोट एकूण 44 किलोमीटर लांबीचा रोड यातील पॅकेज क्रमांक एक अकोला ते गांधीग्राम जवळपास 16 किलोमीटर लांबीच्या रोडचे काम  साठे इन्फ्राकॉन पुणे या कंपनीने दिनांक 11/ 12/ 2017 पासून सुरू केले. यातील अकोला ते सुकोडा फाटा यामध्ये कोणतेही काम झाले नाही. सुकोडा फाटा ते सांगवी मोहाडी पर्यंत दोन्ही बाजूला काँक्रिट झाले आहे. त्यासमोर पाचशे मीटर रोडचे काम अपूर्ण आहे आणि त्यापुढे उगवा फाट्यापर्यंत दोन्ही बाजूने  काँक्रीट रोड पूर्ण झाला आहे. उगवा फाटा ते कसली फाटा यामध्ये काही ठिकाणी काँक्रिटीकरण झाले आणि काही ठिकाणी बाकी आहे. कासली फाटा ते वल्लभनगर फाटा एका बाजूने कॉंक्रीट झाले आणि दुसऱ्या बाजूने काम अपूर्ण आहे. वल्लभनगर फाटा ते हिंगणा तामसवाडी पर्यंत एका बाजूने कॉंक्रीट झाले आणि दुसऱ्या बाजूने काम बाकी आहे हिंगणा तामसवाडी ते गांधीग्राम दोन्ही बाजूने खोदकाम झाले आहे आणि काम अपूर्ण आहे. यामधील बऱ्यापैकी पुलांचे काम पूर्ण झाले आहे आणि काही फुलांचे काम अपूर्ण आहे. 

या कामावर दि. 11/ 12/ 2017  पासून रात्रंदिवस काम करणारे कामगार कोरोनामुळे घरी बसले आहेत.

श्री साठे  इन्फ्राकॉन या कंपनीत जवळपास 70 ते 75 कर्मचारी काम करत आहेत. आणि त्यांचे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यापासूनचे पगार अद्यापही केले नसून या अशा लॉकडांऊनच्या गंभीर परिस्थितीत कंपनीने आपल्या  कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.  

मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांनी शासन निर्णय क्र. संकीर्ण 2020/ प्र.क्र. 45/.काम-9, दि. 31 मार्च 2020 नुसार आदेशित केल्यानुसार,  राज्यात दि. 22 मार्च  2020 पासून लॉकडाउन संपेपर्यंत सर्व खाजगी अस्थापना, कारखाने, कंपन्या, दुकाने इत्यादी अस्थापना यांचे सर्व कामगार कंत्राटी ज्यांना कोरोना व्हायरस covid-19 च्या प्रभावामुळे महाराष्ट्र शासनाच्या आदेशामुळे घरी/ स्थानबद्ध राहावे लागत आहे. अशा उपरोक्त नमूद सर्व कामगार / कर्मचारी कर्तव्यावर असल्याचे समजण्यात यावे आणि त्यांना बंद काळातील संपूर्ण वेतन व भत्ते अदा करण्यात यावेत असे निर्देशित आहे. तरीसुद्धा ही कंपनी कामगारांकडे दुर्लक्ष करत असून सुमारे 70 ते 75 कामगार वारंवार कंपनी मॅनेजरला आपल्या पगाराबाबत विनवण्या करत आहे. कंपनी मॅनेजर ने अद्यापही कामगारांची दखल घेतली नसून  कामगारांनी शेवटी सहा.कामगार आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे दि. 18 मे 2020 रोजी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची कोणत्याच कार्यालयाने दखल घेतली नसून हे कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.

covid-19 या संसर्गजन्य रोगाच्या प्रभावामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये कंपनीने आपल्या कामगार  कर्मचाऱ्यांकडे साफ कानाडोळा केला असून  या कर्मचाऱ्यांचे मार्च ते मे या तीन महिन्यांचे पगार केले नाहीत.

या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पगार होण्यासाठी दिनांक 18 मे 2020 रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात अर्ज केला होता. तसेच  16 मे रोजी कंपनीचे मालक प्रमोद साठे यांना मेल व कंपनी मॅनेजर यांना दि. 17 मे 2020 रोजी, ई-मेलद्वारे कळविले होते.  जिल्हाधिकारी महोदय यांना दिनांक 18 मे रोजी कळविण्यात आले मात्र कोणत्याही कार्यालयाचे उत्तर अद्यापही आले नाही. अकोल्यातील 70 ते 75 कामगार त्यांचा पगार न झाल्याने आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.
.........


टिप्पण्या