world family day:लॉकडाऊन काळात एकत्र कुंटूब पध्दतीत मांडेकर परिवार

(जागतिक कुंटूबदिन १५मे)

लॉकडाऊन काळात एकत्र कुंटूब पध्दतीत  मांडेकर परिवार
      (हा फोटो lockdown पूर्वीचा आहे)

शंभर वर्षानंतर आलेल्या जागतिक संकटाच्या काळातही अकोला शहरातील मांडेकर परिवार २७ सदस्यांसह एकत्रितपणे संयुक्त कुटुंबाचा वारसा जपून नांदत आहे.मांडेकर परिवारात एकाच छताखाली आज चार पिढ्या परस्परांना सहकार्य करीत, जीवनातील चढ-उताराचा सामना, त्याग भावनेने  करून परस्पराच्या सुख-दुःखाचे भागीदार होऊन लॉक डाऊन च्या काळात  नित्य प्रार्थना, उपासना करून थोरांच्या विचारांचे पालन करीत संयुक्त कुटुंबाच्या माध्यमातून कोरोना विषाणूवर मात करीत आहे.
मांडेकर परिवारातील पितामह स्वर्गीय रामभाऊ बळीरामजी मांडेकर २००५ मध्ये स्वर्गवासी झाल्यावर,त्यांच्या पत्नी श्रीमती रमाबाई मांडेकर ९५ व्या वर्षात घराचे धुरा सांभाळत आहेत, दुसऱ्या पिढीत पाच मुले, त्यांच्या सुविध पत्नी ,एक मुलगी म्हणजेच घरातील कर्ता पुरुष ज्येष्ठ मुलगा महादेव यांच्या नियंत्रणात पुरुषोत्तम ,गोपाल, रामदास व लहाना ज्ञानेश्वर मुलगी सौ. दुर्गा ही कारंज्यात नांदत आहे तर तिसऱ्या पिढीत पाच नातू सह सात नाती  यापैकी सहा नातीचे विवाह होऊन  सामुहिक परिवाराच्या संस्काराने स्वतःचा संसार फुलविला असून दोन नातसुना  सामूहिक कुटुंबातील जीवनातील चढ-उताराच्या साक्षी होऊन अनुभव घेत आहे .तर शेवटच्या चौथ्या पिढीतील चार बालगोपाल स्वच्छंद जीवन सामूहिक रित्या जगत आहे.
        
 स्वर्गीय पितामह यांच्या धोरणाने पाच मुले एकत्रकुटूंब पद्धतीचा वेल उंचावत आहे .त्यांचा पाया मजबूत होत होत असल्याने आर्थिक फायदा- तोट्याला महत्व न देता जीवनातील संस्कारक्षम कार्यपद्धतीने व्यवहार करण्याचे धोरण कुटुंबाने जोपासले दिसते. घरातील ज्येष्ठांचेआचरण, त्याग, संयम, संस्कार ,निर्णय क्षमता तसेच चुकीच्या पद्धतीला वाव न देणे यामुळे कुटुंबात नैतिकतेचा प्रभाव वाढून चुकीच्या धोरणाला पायबंद होतो .स्वहितासाठी आर्थिक लाभ चिरकाल टिकणारा नसल्याने जीवनातील चढ-उतारात नुकसान व प्रतिमा मलिन करणारे असल्याची जाणीव जेष्ठा तर्फे यासंबंधी मार्गदर्शन कुटुंबात देण्यात येऊन विचारांची देवाण-घेवाण स्पष्टपणे करण्यात येते.वर्तमानातील  वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करण्यात येत नसल्याने मांडेकर परिवार एकत्रपणे नांदत असल्याचे दिसत आहे .आहे तसेच सदस्यांची ऊन्नती ,समाजहित, राष्ट्रहित, सहकार्याचे धोरण ,'स्व' ची जाणीव ठेऊन घरातील ज्येष्ठ मंडळीचे कार्य करण्याचे धोरण सर्वांना विश्वासात घेऊन ,महिलांना सन्मान देऊन सामुहिक कुंटूबाची पध्दत मांडेकर परिवाराने अंगिकारलेली दिसून येते.
   मांडेकर परिवारात गणनायक महागणपतीचा उत्सव विशेष स्वरूपात दरवर्षी करण्यात येतो, शेती संबंधी दायित्व म्हणून वृषभ राजाचा पोळा उत्सव साजरा केला जातो तसेच जयहिन्द चौकातील दुर्गा प्रतिष्ठाने आहेत. संत महात्म्याची कृतज्ञता म्हणून वैचारीक विचाराची  देवान -घेवाणाचे  कार्यक्रम प्रसंगानुसार होत असतात. देशावरील संकट कालीन स्थितीत , सध्याच्यालॉकडाऊन कालावधीत नियमाचे पालन करीत कुटुंबात नियमित सत्संग , प्रार्थना स्वरूपात  उपासना, राष्ट्रवंदना सामूहिक रित्या घेण्यात येऊन दररोज प्रार्थना विषयावरील भाष्य करण्यात येवून वैचारिक उंची वाढविण्याचा कार्यक्रम यामाध्यमातून  जीवनातील कर्तव्य ,जबाबदारी, संयम या माध्यमातून त्याग, समर्पण वृत्तीची जाणीव कुटुंबाला करून देण्यात येते.
      आजच्या धावपळीच्या युगात संयुक्तकुटूंबा द्वारे अनेक कार्य होऊ शकतात. परस्परांना समजून आदरभाव ,स्नेह , स्वात्विक मूल्यांची जोपासना करून कुटुंबातील सदस्यांच्या गरजांचीपुर्तता,  स्वावलंबन, प्रामाणिकपणा या माध्यमातून होऊ शकते व व्यक्ती सक्षम व निस्वार्थी बनू शकतो असा विश्वास कुटुंब प्रमुखांना वाटतो. चांगले व संस्कारक्षम प्रतिभावान व्यक्ती बनविण्यासाठी एकत्र कुटुंब पद्धती भविष्यात उपयोगी होऊ शकते.

टिप्पण्या