social work:मास्टर पॉवर जीम तर्फे सेवाभावी कार्य

मास्टर पॉवर जीम तर्फे सेवाभावी कार्य
अकोला: डाबकी रोड परिसरातील मास्टर पॉवर जीम संचालक व सामाजिक कार्यकर्ते मनोज पाटील व मास्टर पॉवर जीम मित्र परीवार सदस्य, सहकारी हे काही सेवाभावी उपक्रम राबवित आहेत. कोरोना वायरस महामारीच्या रोग प्रतिकात्मक मानवी शरीरात प्रतिकार शक्ती तयार करने कामी होमियोपँथीचे औषध हे परिणामकारक ठरू शकते. हे आयुष मंत्रालय, स्वास्थ संघटनेने मान्य केले असून त्या अनुषगाने डॉ.प्रवीन अग्रवाल M. D. Homepathy व डॉ. जयेश जैस्वाल M. D. Homepathy यांनी अत्यंत सेवाभावी उद्देशाने मास्टर पावर मित्र परिवार संघटनेला मदतीचा हात पुढे केला आहे.  वरून सघंटनेने औषधी वाटपाचा उपक्रम हाती घेतला असून., आतापर्यंत दोन दिवसात एकंदर पाचशे घरांना ,कुटूंबात ही प्रतिकार शक्तींची (इम्यानिटी पावर)औषधी वाटप झालेली असून ती पुर्ण प्रभाग क्रं.आठ मधील जवळ-जवळ दोन हजार- कुटूंब घरापर्यंत पोहचविण्याचा मानस व संकल्प मास्टर पावर व मनोज पाटील मित्र परीवाराने घेतला आहे.  
          या कार्याच्या जोडीला जीम गृपच्या सदस्यानीं यथा शक्ती नुसार रोजंदारीच्या ठप्प या कार्यकाळात सुद्धा आर्थिक झीज सहन करून, सँनिटायझरसह  तीन फवारनी यंत्राद्वारे,  पुर्ण प्रभागात नियमित फवारनीचा उपक्रम राबविन्याचे कोरोना वरीयर्सचे कार्यधरतीवर,साहसी वृत्तीने यंत्र पाठिवर बांधून सेवेचा ध्यास न डगमगता हाती घेतलेला आहे.  जीम सदस्य, इत्यादी मित्रांचा या उपक्रमात सहस्नेह यशस्वी सहभाग असून सर्व सामान्य नागरीकांच्या  मनस्वी कौतुकास मास्टर पावर गृपचे  मनाेज पाटील, अशोक परळीकर,शाम क्षिरसागर,सुनिल गोहर,परेश धुमाळे,अमोल पुंडकर,कार्तिक दांडगे,पिंटू साबळे,अभय डाहाळे,बाबू धाडसे,संतोष हिरूळकर, रोहीत गांवडे अनिल वाडेकर,सुशिल दांदडे ,रितेश श्रीवास्तव,शुभंम पवार, दिपक खोंड,रुषीकेश जुनगडे, पात्र ठरले आहेत.

टिप्पण्या