MH police:अडचणीत सापडलेल्या हजारो प्रवाश्यांचा मार्ग अकोल्याच्या सुपुत्राने केला सुकर!

अडचणीत सापडलेल्या हजारो प्रवाश्यांचा मार्ग अकोल्याच्या सुपुत्राने केला सुकर!

             Anil Paraskar

अकोला: कोरोना विषाणू महामारीमुळे लॉकडाउन करण्यात आले. राज्याच्याच नव्हेतर जिल्हा सीमाबंदी झाल्या. हजारो नागरिक जिथे आहेत तिथेच थांबले. लॉकडाउनमुळे मजूर,कामगार वर्गाचे खूपच हाल झाले. देशातच विदारक परिस्थिती निर्माण झाली.मात्र, यासर्व लोकांसाठी देवदूत म्हणून धावून आला,तो अकोल्याचा सुपुत्र. त्याने तयार केलेल्या ई-पास वर आज हजारो मजूर,कामगार,विद्यार्थी,व्यापारी आपल्या गावी सुखरूप पोहचत आहे. या अकोल्याच्या सुपुत्राने नाव आहे अनिल पारसकर.

पारस्कार हे मूळ अकोल्याचे. जुनेशहर डाबकी रोड  येथील रहिवासी. शिक्षण पूर्ण करून ते पुण्याला गेले.मग दिल्लीला यूपीएससीचा कठीण अभ्यास करून, त्यात ऊत्तीर्ण झाले. आज ते रायगड पोलीस अधिक्षक या पदावर कार्यरत आहे. मजुरांचा शेकडो मैल पायी प्रवास होत असल्याचे पाहून पारसकर यांचे मन उद्विग्न झाले.आपल्याला या लोकांसाठी काहीतरी करता येईल का,हा विचार त्यांच्या मनात घर करून बसला होता. मग कल्पना सुचून त्यावर लगेच काम सुरू केले. या प्रयत्नांतुनच पारसकर यांनी ऑनलाइन पोर्टल निर्माण केले. आज  हा प्रयोग रायगड जिल्ह्यांतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी संकट काळी हे राबवल्यामुळे असंख्य अडचणीत सापडलेल्या प्रवाशांना सुखरूप घरी जाण्याची परवानगी मिळाली. इ - पास मुळे लोकांना दिलासा मिळाला. नागरिकांना त्यांच्या ऐश्चिक जागी जाण्याची रीतसर परवानगीही मिळाली.


या पोर्टलचा उपयोग पोलिस प्रशासन आणि राज्यातील जनतेला झाला. आतापर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यांतून लाखो नागरिकांनी या पोर्टलला भेट देवून, इच्छित स्थळी जाण्यासाठी प्रशासनची अधिकृत परवानगी मिळवली.

http://bharatiyaalankar24.blogspot.com/2020/05/blog-post_2.html

पोलिस प्रशासनात सेवा बजावत असताना लोकोपयोगी पडणाऱ्या वेगवेगळ्या कल्पना राबविण्यात पारसकर आघाडीवर आहेत. रायगड पोलीसच्या समाज माध्यम अकाउंटवर भेट दिली की,हे सहज लक्षात येते. पारस्कार यांनी केवळ दोन-तीन दिवसांत सुरुवातीला केवळ रायगड जिल्ह्यापुरते हे पोर्टल बनविले होते. जनता कर्फ्यू २२ मार्चला होता. त्यानंतर २४ मार्चपासून राज्य सरकारने लॉकडाउन जाहीर केले. त्याच दिवशी अधीक्षक पारसकर यांनी रायगड जिल्ह्यासाठी हे पोर्टल सुरू केले. या पार्टलची उपयोगिता, परिणामकारकता व पारदर्शकतेमुळे कोकण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक निकेत कौशिक प्रभावीत झाले. या पोर्टलची उपयोगिता त्यांनी राज्याचे पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मिलिंद भारंबे यांच्या कानावर घातली. हे पोर्टल पाहताच भारंबे यांनी हे पोर्टल राज्यभर वापरण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार २८ मार्चपासून covid19.mhpolice.in या पोर्टलचा राज्य पातळीवर उपयोग सुरू करण्यात आला.

पोर्टलचा राज्यव्यापी वापर सुरू झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसांत आवश्‍यकतेप्रमाणे आणि आलेल्या सूचनांप्रमाणे त्यात २५० प्रकारचे बदल करण्यात आले. पोर्टलच्या सुरळीत कामकाजासाठी १० सदस्यांची चमू तयार केली आहे. पोर्टलचे काम सुरळीत चालावे, त्यात कोणत्याही अडचणी येऊ नयेत तसेच अर्जांची संख्या वाढली तर पोर्टलवर लोड येऊन कामकाज विस्कळित होऊ नये, याची जबाबदारी या चमूकडे सोपविण्यात आली.

सध्या राज्यातल्या विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. परवाना मिळविण्याची प्रक्रिया सुलभ असल्याने परवान्यासाठी अर्ज करण्याऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रोज जवळपास चाळीस ते पन्नास हजार अर्ज ऑनलाईन भरल्या जात आहे. संकटकाळी पारसकर यांनी तयार केलेल्या या पोर्टलमुळे जिल्हा व पोलिस प्रशासनाचे काम सुसह्य झाले आहे,एवढे निश्चित.


http://bharatiyaalankar24.blogspot.com/2020/05/corona-lockdown.html

http://bharatiyaalankar24.blogspot.com/2020/05/blog-post_11.html





टिप्पण्या