Crime news:अकोट मधील त्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी अखेर गुन्हे दाखल!

अकोट मधील त्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी अखेर गुन्हे दाखल!

आरोपींनी दिली होती पोलिसांना धमकी 

१७ मे च्या रात्री घडली घटना; आज घेतली दखल!


नीलिमा शिंगणे-जगड 

अकोला : पोलिसांना मारहाण,शिवीगाळ करणे आदी कृत्य करून पोलिसांचे मनोधैर्य कमी करण्याचा प्रयत्न समाज कंटकांकडून बऱ्याचदा केला जातो. अशीच एक घटना अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात घडली.लॉकडाउनमध्ये बाहेर फिरताना रोखल्याने युवकांनी  पोलिसांसोबत शाब्दिक वाद घालून परिसरात पुन्हा दिसल्यास हात पाय तोडुन टाकण्याची धमकी पोलिसांना दिली. ही घटना १७ मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झाल्याने, प्रकरणाची दखल घेवून आज शनिवार ३० मे रोजी अखेर आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले.

अकोट शहर पोलिस स्टेशन हद्दितील शौकत अली चौक परिसरात रात्री पेट्रोलिंग करणाऱ्या दोन पोलिसांनी लॉकडाउन मध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या युवकांना थांबवले. दरम्यान,त्यानंतर याच युवकांनी पोलिसांना अश्लील शिविगाळ केली. तसेच पोलिसांनी या परिसरात पेट्रोलिंगकरिता दिसल्यास परिणाम भोगायला तयार रहा, अशी धमकीही दिली. तर पोलिसच दारू पिऊन कर्तव्य बजावत असल्याचा आरोप करत या युवकांनी वाद घातला. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला. मात्र, या प्रकरणातं  कुठल्याही प्रकारची तक्रार नोंदवण्यात आली नव्हती.  प्रकरण आपसात मिटविण्यात आले होते. 

थोडक्यात हकिकत अशी की, आकोट शहर येथे दि.३० मे  रोजी सोशल मिडीयावर व्हायरल झालेला व्हीडीओ वरून ,पोलीसांना धमक्या देणा-या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. सोशल मिडीयावर व्हायरल झालेला व्हीडीओ पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांनी पाहीला असता, त्यामध्ये ताज शरीफ राणा रा कांगरपुरा हा इसम सार्वजनिक ठीकाणी आम रस्त्यावर  धारोळीवेस चौकीजवळ पोलीस कर्मचारी यांना जोरजोराने आरडा ओरड करतांना व अश्लील शिविगाळ करतांना व हातपाय तोडण्याची धमकी देतांना दिसला . या घटनेची चौकशी केली असता,व्हिडिओत दिसत असलेले पोलीस कर्मचारी  पो.स्टे.आकोट शहर येथे नेमणूकीस आहे. दि.१७ मे रोजी रात्री ८ ते दि.१८ मे  सकाळी ८ वाजेपावेतो यांची धारोळी वेस बीट परिसरामध्ये बीट मार्शल क्र.२ वर पेट्रोलींग डयुटी होती. एएसआय सुरेश राउत  हे नाईट ऑफीसर असतांना त्याचदिवशी रात्री ११ वाजताच्या दरम्यान  धारोळीवेस ते ईफतेखार प्लॉट रोडवर पेटोलींग करीत असतांना, लॉकडाउन असल्याने रोडवर उभे असलेल्या लोकांना घरी जाण्याबाबत सूचना देत असता, त्या दरम्यान ताज शरीफ राणा रा.कांगपूरा अकोट हा ईफतेखार प्लॉट कडे जात असतांना, त्याला पोलिसांनी अडवून सूचना केल्या. यानंतर धारोळीवेस चौकी जवळ पोलीस आणि युवकामधेय शाब्दीक बाचाबाची झाली.युवकाने अश्लील भाषेत शिवीगाळ करुन पोलिसांना हातपाय तोडण्याची धमकी दिली. 

जिल्हाधिकारी  अकोला यांचे कोविड १९ बाबत आदेश १७ मे रोजी  असतांना सुध्दा रात्री दरम्यान लोकांना जमा करून सोशल डीस्टंसींगचे उल्लंघन युवक करीत होता.याकरिता ताज शरीफ राणा रा कांगरपुरा याचे विरुध्द  कलम २६९,२९४ ,५०६,१८८ भादवि अन्वये कायदेशीर फिर्याद देवून गुन्हे दाखल करण्यात आले,अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांनी दिली.




टिप्पण्या