Covid19: दोन महिने देशासाठी तर सहा दिवस शहरासाठी साथ द्या-पालकमंत्री


दोन महिने देशासाठी तर सहा दिवस शहरासाठी साथ द्या-पालकमंत्री
         शहरवासीयांना आवाहन

अकोला: दोन महिने देशासाठी तर सहा दिवस शहरासाठी साथ द्या,असे आवाहन पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकोलेकरांना रविवारी केले आहे.
रविवारी दिवसभर अकोलेकरांमध्ये जनता करफू संदर्भात संभ्रम निर्माण झाला होता.1 ते 6 जून पर्यंत जनता करफू आहे की नाही याबाबत समाज माध्यमात चर्चा झोडल्या गेल्या.अखेर सायंकाळी पालकमंत्री यांनी एक जनतेला आवाहन करणारे पत्र जाहीर करून,जनतेने स्वतःच्या व शहराच्या सुरक्षिततेसाठी करफू पाळावा,असे आवाहन या पत्राद्वारे केले आहे. 

पालकमंत्री यांनी जनतेला केलेले आवाहन

नमस्कार, समस्त अकोला वासीयांना सूचित करण्यात येते की, दि.28 मे रोजी झालेल्या सर्वपक्षीय  बैठकी मध्ये झालेल्या चर्चे नुसार दि. 1 जून ते 6 जून  या काळात संपूर्ण लॉक डाऊन करण्या बद्दल प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता, सदर प्रस्ताव अद्याप शासन स्तरावर विचाराधीन आहे , **त्यामुळे सर्व सन्माननीय विधी मंडळ सदस्य तथा स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी पक्ष प्रतिनिधी तसेच सन्मानिय अकोला वासीयांचे वतीने स्वयंप्ररणेने आवाहनास साथ द्यावी व आपल्या अकोला वासीयांचे स्वास्था करिता _शक्य असल्यास_ आपले प्रतिष्ठान/व्यवसाय/खाजगी कार्यालय दुकाने व इतर ठिकाणे (वैद्यकीय -कृषी अत्यावश्यक सुविधा वगळता) बंद ठेवावी, ज्या कुणाला असे करणे शक्य नसेल त्यांनी शासना द्वारे निर्गमित केलेल्या दिशा निर्देशाचे पालन करून ही आपत्ती अकोला शहरातून कायम स्वरूपी दूर करण्या करिता जिल्हा प्रशासन व कोरोना वारीयर्स यांना मदत करावी.**  या बाबद कुठलाही संभ्रम बाळगू नये.. हा जनता करफू अकोला वासीयांनी अकोला वासीयांचे करिता पाळायचा असल्याने यास शासकीय यंत्रणेची सक्ती नाही ..आपणा सर्वांना विनंती आहे. **दोन महिने देशासाठी तर सहा दिवस शहरासाठी साथ द्या..**

 [ बच्चू कडू ] 
पालक मंत्री -अकोला जिल्हा
......

टिप्पण्या