नामदार धोत्रे यांची कार्यतत्परता Covid-19 ग्रस्त रुग्णाला दिल्लीत भरती केले

नामदार धोत्रे यांची कार्यतत्परता Covid-19 ग्रस्त रुग्णाला दिल्लीत भरती केले
अकोला : अकोला लोकसभा मतदार संघातील नागरिकांच्या सुख दुःखात सहभागी होणारे कर्तव्यदक्ष खासदार केंद्रात राज्यमंत्री ना आमदार संजय  धोत्रे यांनी, पश्चिम विदर्भातील एक परिवारांचे घटक दिल्ली येथे राहत असताना त्यांना covid-19 ही लागण झाली. दिल्ली येथे कोणत्याही हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात येत नव्हतं .ही माहिती त्यांचे नातेवाईकयांना त्यांनी विदर्भाचे पंढरी शेगाव वाकोला येथे दिली. त्यांनी तात्काळ जिल्हा भाजपाचे अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर व भाजपा प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी यांच्याशी थेट संपर्क साधला. परिस्थिती संपूर्ण माहिती केंद्रीय राज्य मंत्री नामदार  धोत्रे यांना दिल्यावर त्यांनी तातडीने त्याकडे लक्ष केंद्रित करून, दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी संपर्क आपल्या पी ए ला पाठवून त्यांना व त्यांच्या मुलांना covid-19 ची लागण झाली आहे, ही संपूर्ण माहिती रिपोर्ट घेऊन त्यांनी तात्काळ केंद्रीय आरोग्य मंत्री नामदार हर्षवर्धन यांच्याशी संपर्क साधून त्यांना हॉस्पिटलमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली. त्यांनी तसेच दिल्लीचे उपमुख्य मंत्री मनीष सिसोदिया यांच्याशी सुद्धा त्यांनी संपर्क साधून, विदर्भाच्या पंढरी येथील रहिवाशी व अकोल्यातील सुप्रसिद्ध डॉक्टरांच्या नातेवाईकाला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये भरती करून त्यांचा उपचार सुरू केला, व त्या संदर्भात त्यांना त्यांनी त्यांच्या नातेवाईक व जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर व गिरीश जोशी यांना माहिती दिली. केंद्रीय राज्य मंत्री नामदार संजय धोत्रे यांनी तातडीने दखल घेऊन दोन तासात covid-19 च्या पश्‍चिम विदर्भातील रुग्णांना सुविधा उपलब्ध करून दिली .त्याबद्दल त्यांचे नातेवाईक यांनी भाजपाचे व नामदार धोत्रे यांचे आभार व्यक्त केले आहे.

टिप्पण्या