Coronavirusnews:अकोल्यात ५५ कोरोनाग्रस्त घेताहेत उपचार; आतापर्यंतचा रुग्णांची एकूण संख्या ७५

अकोल्यात ५५ कोरोनाग्रस्त घेताहेत उपचार; आतापर्यंतचा रुग्णांची एकूण संख्या ७५


३२ अहवाल प्राप्तः ११ पॉझिटीव्ह, २१ निगेटीव्ह

अकोला,दि.५ : आज दिवसभरात कोरोना संसर्ग तपासणीचे ३२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २१ अहवाल निगेटीव्ह  तर ११ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या ७५ झाली असून प्रत्यक्षात ५५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजअखेर एकूण १००९ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ९३७ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ८६२ अहवाल निगेटीव्ह तर ७५ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व  ७२ अहवाल प्रलंबित आहेत.

आजपर्यंत एकूण १००९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ८३३, फेरतपासणीचे ९५ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ८१ नमुने होते. आजपर्यंत एकूण ९३७ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ७६१ तर फेरतपासणीचे ९५ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ८१ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ८६२ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ७५ आहेत. तर आज अखेर ७२ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

आज प्राप्त झालेल्या ३२ अहवालात २१ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर ११ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

आता सद्यस्थितीत  ७५ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील सात जण मयत आहेत.  तर गुरुवारी (दि.२३एप्रिल) सात जण व सोमवारी (दि.२७एप्रिल) एका जणास, गुरुवारी (दि.३० एप्रिल) तिघांना आणि आज (रविवार दि.३ मे) दोघांना  असे १३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत ५५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

दरम्यान, आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी चार जण मोहममद अलि रोड येथील तर उर्वरित पैकी दोन जण बैदपुरा, आणि बाकीचे गुलजारपुरा, पिंजर, खंगारपुरा, कृषीनगर, ताजनगर येथील रहिवासी आहेत.

              दरम्यान आजअखेर ९५८ प्रवासी आले आहेत. त्यापैकी ३५७ गृहअलगीकरणात व १९८ संस्थागत अलगीकरणात असे ५५५ जण अलगीकरणात आहेत. तर ३११ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी  पूर्ण झाला आहे. तर ९२ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली

......

In Akola, 55 corona sufferers are receiving treatment;  The total number of patients so far is 75

टिप्पण्या