Corona virus:अकोल्यात ४४ पॉझिटिव्ह रुग्ण घेताहेत उपचार

अकोल्यात ४४ पॉझिटिव्ह रुग्ण घेताहेत उपचार

अकोला,दि.४ :आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ११३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १०४ अहवाल निगेटीव्ह  तर नऊ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या ६४ झाली असून प्रत्यक्षात ४४ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

In Akola, 44 positive patients are receiving treatment

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजअखेर एकूण ९४२ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ९०५ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ८४१ अहवाल निगेटीव्ह तर ६४ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व  ३७ अहवाल प्रलंबित आहेत.

आजपर्यंत एकूण ९४२ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ७६७, फेरतपासणीचे ९५ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ८० नमुने होते. आजपर्यंत एकूण ९०५ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ७३० तर फेरतपासणीचे ९५ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ८० अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ८४१ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ६४ आहेत. तर आज अखेर ३७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

आज प्राप्त झालेल्या ११३ अहवालात १०४ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर  नऊ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

अकोल्यात आतापर्यंत  ६४ अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आढळले. त्यातील सात जण मयत आहेत.  तर गुरुवारी (दि.२३एप्रिल) सात जण व सोमवारी (दि.२७एप्रिल) एका जणास, गुरुवारी (दि.३० एप्रिल) तिघांना आणि रविवारी (दि.३ मे) दोघांना  असे १३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत ४४ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

             आज सकाळी साडेनऊ वाजता अहवाल प्राप्त झाले तेव्हा नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते.  तर सायंकाळी सर्व अहवाल निगेटीव्ह आले. आज सकाळी ज्या नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले त्यातील पाच जण कृषिनगर अकोला येथील रहिवासी आहेत तर उर्वरित चौघांपैकी कोठडी बाजार,लाल बंगला, बैदपुरा अकोला व अंतरी बाळापूर येथील रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

......

टिप्पण्या