- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Akola@558: प्रत्यक्षात 141 पॉझिटिव्ह रुग्ण घेताहेत उपचार!
अकोला,दि.२९ : आज दिवसभरात (सायंकाळी सात वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे २७६अहवाल प्राप्त झाले. त्यातील २३४ अहवाल निगेटीव्ह तर ४२ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज दुपारपर्यंत ३९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातल्या १६ जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित २३ जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५५८ झाली आहे. तर आजअखेर प्रत्यक्षात १४१ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ५१०१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४८२९, फेरतपासणीचे ११० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १६२ नमुने होते. आजपर्यंत एकूण ५०८४ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४८१२ तर फेरतपासणीचे ११० व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १६२ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ४५२६आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ५५८ आहेत. तर आजअखेर १७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आज ४२ पॉझिटिव्ह
आज सकाळी प्राप्त अहवालात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात सहा पुरुष व दोन महिला आहेत. यातील दोघे जण इंदिरानगर तेल्हारा व बेलखेड तेल्हारा येथील रहिवासी आहेत. उर्वरित जठारपेठ, कौलखेड, गोरक्षण रोड, जुने शहर, न्यु खेतान नगर कौलखेड, हरिहरपेठ येथील रहिवासी आहेत.
आज सायंकाळी ३४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात १९ पुरुष व १५ महिला आहेत. यात गायत्रीनगर येथील सात, कौलखेड येथील चार रामदास पेठ येथील दोन, मोठी उमरी येथील दोन, सोनटक्के प्लॉट येथील दोन, रजपुतपुरा येथील दोन, अकोट फैल येथील दोन, जुने शहर येथील दोन तर न्यु तारफैल, हिंगणा रोड, बार्शीटाकळी, कैलास टेकडी, खैर मोहम्मद प्लॉट, मोमीनपुरा, काला चबुतरा, खदान, सिंधी कॅम्प, रेल्वे स्टेशन व गोकुळ कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
३९ जणांना डिस्चार्ज
काल रात्री व आज दुपारी ३९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील १९ जणांना घरी तर उर्वरित २० जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. त्यात २३ पुरुष व १६ महिला रुग्ण आहेत. त्यातील सहा जण बैदपूरा, चार जण हरीहर पेठ, चार जण अकोट फैल, तीन जण ताजना पेठ, तीन जण फिरदौस कॉलनी, रजपुतपुरा येथील दोन, लक्ष्मी नगर येथील दोन, माळीपुरा येथील दोन, तर मोह अली रोड, फतेह चौक, आदर्श कॉलनी, शास्त्रीनगर, पिंजर, गीता नगर, शिवाजी पार्क, गुलजारपुरा, गोरक्षण रोड, तेलीपुरा, राऊतवाडी, तेल्हारा व न्यु तारफैल येथील प्रत्येकी एक जण आहे.
१४१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत ५५८ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील २९ जण (एक आत्महत्या व २८ कोरोनामुळे) मयत आहेत. तर आज ३९ जणांना डिस्चार्ज दिला आहे. आता डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ३८८ झाली आहे. तर सद्यस्थितीत १४१ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी तीन रुग्ण हे मुर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत तर एक जण कोविड केअर सेंटरला दाखल आहे. तर आज एका रुग्णाला नागपूर येथे संदर्भित करण्यात आले आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे
.........
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा