Corona Virus news:उगवा येथे एक पॉझिटिव्ह रुग्ण;आरोग्य पथकामार्फत घरोघरी सर्वेक्षण

उगवा येथे एक पॉझिटिव्ह रुग्ण;
आरोग्य पथकामार्फत घरोघरी सर्वेक्षण
अकोला: तालुका अकोला येथील प्रा.आ केंद्र आगर अंतर्गत उगवा येथे कोव्हीड १९
संसर्गाचा १ पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यामुळे त्या ठिकाणी एकूण १५ टिम तयार
करण्यात आल्या असुन एकुण ११९२ घरांना भेटी देवुन ५६३० लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उगवा येथे सर्वेक्षणाच्या दरम्यान स्वतः जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुरेश आसोले, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विजय जाधव, अति.गटविकास अधिकारी मदन
वहुरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ जगदीश बनसोडे, साथरोग अधिकारी डॉ.मानकर तसेच डॉ.गावंडे तसेच वैद्यकिय अधिकारी डॉ.नाथक, आरोग्य कर्मचारी व गटप्रवर्तक,आशा आदि सर्वेक्षणाच्या वेळी उपस्थित होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली १५ टिम तयार करण्यात
येवुन सर्वेक्षणाचे कार्य करण्यात आले आहे. सर्व्हेक्षण अहवालानुसार ५० तिब्र
जोखीम सपंर्काचे तर २६९ कमी जोखमीचे नागरीक आढळून आलेत. तिन जोखमीचे
नागरीकांना १०८ संदर्भसेवा देवुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे
संदर्भात करण्यात आले. तर कमी जोखमीचे २६९ नागरीकांना १४ दिवस गृह
विलगीकरण करण्याबाबत सुचित करण्यात आले. यावेळी प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन
गावामध्ये बाहेरगावावरुन व ईतर राज्यातुन आलेल्या सर्वाची आरोग्य तपासणी
करण्याबाबत तसेच रुग्ण व त्यांचे नातेवाईकांनी स्वतःहुन तपासणी करुन घ्यावी अशा सुचना जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिल्या. तसेच नागरीकांनी घरी रहावे व स्वच्छतेच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यात येवुन कोरोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरीत वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत तपासणी करुन घेण्याबाबत नागरीकांना आवाहन केले. यावेळी गावचे सरपंच, पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरीक यांनी संपुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिले, असे जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी यांनी 
सांगितले.

टिप्पण्या