corona virus news:अकोल्यात आतापर्यंत एकूण १८६ कोरोना पॉझिटिव्ह!

अकोल्यात आतापर्यंत एकूण १८६ कोरोना पॉझिटिव्ह!

      १११ पॉझिटिव्ह घेताहेत उपचार

अकोला,दि.१३: आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे १८१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १६३ अहवाल निगेटीव्ह तर १८ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता  पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींची एकूण संख्या १८६ झाली आहे.दरम्यान काल रात्री ४१ जणांना पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. तसेच काल रात्रीच एका महिलेचे उपचार घेतांना निधन झाले.त्यामुळे आजअखेर प्रत्यक्षात १११ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण २२१३ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी १८६५ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण १६७९ अहवाल निगेटीव्ह तर १८६ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व  ३४८ अहवाल प्रलंबित आहेत.

आजपर्यंत एकूण २२१३ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २०१३, फेरतपासणीचे ९८ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०२ नमुने होते. आजपर्यंत एकूण १८६५ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १६६५ तर फेरतपासणीचे ९८ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०२ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १६७९ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १८६ आहेत. तर आजअखेर ३४८ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

आज १८ पॉझिटिव्ह

आज दिवसभरात प्राप्त झालेल्या १८१ अहवालात १६३ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर १८ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळी  पॉझिटीव्ह आढळलेल्या १८ रुग्णात नऊ महिला व नऊ पुरुष आहेत. त्यातील सात जण खैर मोहम्मद प्लॉट मधील रहिवासी आहेत. तर तिन जण गवळीपुरा, तीन जण रामनगर, आणि बापू नगर अकोट फैल, अकोट फैल, सराफा बाजार, जुने शहर पोलीस स्टेशन, जुने आलसी प्लॉट येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत.

एका महिलेचा मृत्यू

दरम्यान एक ६२ वर्षीय न्यू भिमनगर येथील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यू काल (दि.१२) रात्री झाला आहे. ही महिला सोमवार दि.४ मे रोजी दाखल झाली होती.

४१ रुग्णांना डिस्चार्ज

तसेच काल (दि.१२) रात्रीच ४१ रुग्णांना पूर्ण बरे झाल्यानंतर डिस्चार्ज करण्यात आले. हे रुग्ण मोमीन पुरा पाच, सिंधी कॅम्प येथील चार, कृषि नगर सहा, बैदपूरा सात, न्यू भिमनगर तीन, कोठडी बाजार दोन,  कंवरनगर दोन, भिमनगर, मोहम्मद अली रोड, कमला नगर , शिवाजीनगर, शंकरनगर अकोट फैल, जुने शहर, सुधीर कॉलनी, फतेह चौक, अंत्री, लाल बंगला, राधाकिसन प्लॉट येथील प्रत्येकी एक असे रहिवासी आहेत. त्यामुळे आता एकूण ६० जण पूर्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

१११ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आता सद्यस्थितीत  १८६ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील १५ जण (एक आत्महत्या व १४ कोरोनामुळे) मयत आहेत.  तर गुरुवारी (दि.२३एप्रिल) सात जण व सोमवारी (दि.२७ एप्रिल) एका जणास, गुरुवारी (दि.३० एप्रिल) तिघांना आणि रविवार दि.३ मे रोजी दोघांना, बुधवार दि.६ मे  रोजी एकास व (मंगळवार दि.१२ मे) पाच जणांना तसेच त्याच दिवशी रात्री ४१ असे ६० जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत १११ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.



टिप्पण्या