corona virus news:अकोल्याने नागपूरलाही मागे टाकले!कोरोनाच्या फैलावाला जवाबदार अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी

अकोल्याने नागपूरलाही मागे टाकले!
  कोरोनाच्या फैलावाला जवाबदार     अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी

अकोला: सध्या अकोला प्रत्येक बाबीत एक नंबरवर ठरत आहे ते म्हणजे वाढता तापमान असो किंवा वाढती कोरोना बाधितांची संख्या . अकोला महानगरासह जिल्हा कोरोनाचे 'हॉटस्पॉट' ठरले असून आता अकोल्याने नागपूरलाही मागे टाकले आहे .५० दिवसात बाधितांचा आकडा ५०० च्यावर पोहचला आहे. वाढती कोरोना बाधितांची संख्या आता अकोलेकरांसाठी चिंतेची बाब बनली आहे. कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अकोल्यात पहिला रुग्ण ७ एप्रिलला सापडला होता मात्र आकडा झपाट्याने ५१६ वर पोहचला आहे .रुग्णांचा आकडा विदर्भात सर्वाधिक असून सर्वाधिक रुग्ण असलेल्या नागपूरला ही अकोल्याने मागे टाकलं आहे. यामुळे आता अकोलेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अकोल्यात आतापर्यंत ५१६ तर नागपूरात सुमारे ४४५ कोरोना बाधिताची संख्या आहे. दरम्यान, गत आठवड्यात नागपूरातील कोरोनाचा उद्रेक पाहता तेथील स्थिती हाताबाहेर जात असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता तीच स्थिती अकोल्यात निर्माण झाली आहे. अकोल्यातील स्थिती हाताबाहेर जात असून प्रशासन सुद्धा हादरले आहे.लोकसंख्येचा विचार करता अकोला नागपूरच्या तुलनेत खूप अधिक पुढे आहे.
वाढत्या रुग्णांची संख्यासाठी महसूल ,पोलीस आणि महापालिका प्रशासनाचं आपसात समन्वय नसल्याचं अनेकवेळा भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी सांगितलं ,तर अकोल्यात सिआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली. अकोल्याने कोरोना बाधितांच्या आकड्यात नागपूरला तर मागे टाकलं आहे. त्याच बरोबर मृत्युदरातही अकोला नागपूरच्या पुढे आहे .नागपुरात आतापर्यंत जवळपास ८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला तर अकोल्यात २९ जणांचा मृत्यू झाला. अकोल्यात कोरोनाच्या फैलावासाठी आणि वाढत मृत्युदरासाठी येथील यंत्रणा जवाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला. अकोल्यातील सुजाण नागरिक गिरधर हरवानी यांनी थेट मुख्यमंत्रीं यांना पत्राद्वारे अकोल्यातील स्थिती बद्दल कळवलं आहे.कोरोनाच्या फैलावाला जवाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून येथे सक्षम अधिकारी नेमण्याची मागणी त्यांनी केली.

अकोल्यातील कोरोना रूग्णांची सध्यस्थिती 
एकूण रूग्ण : ५१६
मृत्यू : २९
आत्महत्या : ०१



सध्याच्या परिस्थितीमुळे जनतेच्या मनातील प्रश्न 

१) अकोल्याची परिस्थतीत सुधरणार का ?
२) खरेदीसाठी वाढवून दिलेली वेळ अधिक नाही का ?
३) लॉक डाउनच पालन करणारे नागरिक सुरक्षित राहतील का ?
४) वाढत्या रुग्णांच्या संख्येला प्रशासन आळा घालणार का ?

तर याला उपाय म्हणून
१) प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची अंमलबजावणी.
२) प्रतिबंधित शत्रेयातील प्रत्येक व्यक्तीची चाचणी.
३) जनतेने प्रशासनाला सहकार्य कराव.आणि नियमांचे पालन कराव.
४) यंत्रणेनी आपसात समन्वयक ठेवावं.
५) प्रशासनाने नागरिकांसाठी खरेदीची वेळ बदलावी.

 कोरोनाची वाढती रूग्णसंख्या आणि वाढते मृत्यू ही मोठी चिंतेची बाब आहे. यंत्रणेचं आपसात समन्वय नसल्याने ही समस्या उद्भवली. पुढच्या काळात अकोल्यावरचं हे संकट दूर करण्यासाठी प्रशासन, आरोग्ययंत्रणा अन पर्यायानं जनतेचीही जबाबदारी वाढणार आहे.

टिप्पण्या