- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मनपा परिसरात फिजिकल डिस्टनसिंग नियमाचा उडाला फज्जा!
अकोला,दि.१८: एकीकडे देश कोरोनाच्या संकटाशी दोनहात करीत आहे. तर काही ठिकाणी नियमांची पायमल्ली सर्रास होतांना दिसत आहे.असच काहीस चित्र आज अकोला महापालिकेच्या आवारात ओरिएंट बँकेच्या समोर पाहायला मिळाले. महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचा आज पेंशनचा दिवस. आपले पेंशनचे पैसे काढण्यासाठी या नागरिकांनी एकच गर्दी केली. कोणत्याही नियमांचं पालन न करता , कोणताही फिजिकल डिस्टनसिंग न ठेवता हे लोक अशा प्रकारे नियमांचा फज्जा उडवतांना दिसले.अकोल्यात कोरोना बधितांची संख्या आता २६० वर गेली आहे. तरी देखील लोकांना याच गांभीर्य नाही का ,असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. तर या प्रकारामुळे नियमांची अंमलबजावणी करण्याची जवाबदारी असलेल्या संस्थेच्याच दिव्या खाली अंधार दिसून येत आहे. विशेष म्हणजे मनपा आयुक्तांच्या दालनात समोर हा प्रकार घडत असताना,एकाही मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांला दिसले नाही,याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
......
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा