corona virus news:पातुर व बाळापुर येथे आरोग्य पथकामार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण

पातुर व बाळापुर येथे आरोग्य पथकामार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण
अकोला: प्राथमिक आरोग्य केंद्र पातुर अंतर्गत शहरी भागामध्ये कोरोनाचा
 १ पॉझिटीव्ह रुग्ण आढळला. तसेच तालुका बाळापुर येथील शहरी भागात कोबीड १९ संसर्गाचा प्रत्येकी १ पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यामुळे या दोन्ही ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, जिल्हा शल्य चिकित्सक राजकुमार चव्हाण तसेच अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पातुर येथे एकुण ७ टिम तयार करण्यात आल्या असुन एकुण २४७ घरांना भेटी देवुन ११६३ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षण दरम्यान आढळुण आलेल्या ११
व्यक्तींना शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे तपासणी करिता संदर्भीत करण्यात आले. तसेच कमी जोखमीच्या १६ व्यक्तींना शाळेमधील विलगीकरण कक्षात ठेवण्या बाबत सुचित करण्यात आले.
तसेच बाळापुर येथे एकुण ४ टिम तयार करण्यात आल्या असुन एकुण ६६ घरांना भेटी देवुन ४६२ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षण दरम्यान आढळुण आलेल्या कमी जोखमीचे १० व्यक्ती आढळुण आले. सदर व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यास सुचित करण्यात
आले. सदर आरोग्य सर्वेक्षणा वेळी, उपविभागिय अधिकारी रमेश पवार, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी,मुख्याधिकारी बाळापुर गोपिचंद पवार,तहसीलदार पातुर दिपक बाजड, डॉ.रेवाळे वैद्यकीय अधिकारी तसेच जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.सुनिल मानकर अधिकारी डॉ भावना हाडोळे, डॉ महानकर,डॉ इर्शाद खान, तसेच आरोग्य अधिकारी व कर्मचारी आशा/एएनम गटप्रवर्तक ईत्यादि उपस्थित होते.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन गावामध्ये बाहेरगावावरुन ब ईतर राज्यातुन आलेल्या
सर्वाची आरोग्य तपासणी करण्याबाबत तसेच रुग्ण व त्यांचे नातेवाईकांनी स्वतःहुन तपासणी करुन घ्यावी, अशा सुचना देण्यात आल्या तसेच नागरीकांनी घरी रहावे व स्वच्छतेच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यात येवुन कोरोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरीत वैद्यकीय अधिकारी
यांच्या मार्फत तपासणी करुन घेण्याबाबत नागरीकांना आवाहन केले. यावेळी गावचे सरपंच, पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरीक यांनी संपुर्ण सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले,अशी माहिती जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी यांनी दिली.
.........


टिप्पण्या