corona virus news:कोरोनाबाधित हिंदू धर्मीय रुग्णांवर मुस्लिम बांधवांनी केला अंत्यसंस्कार!

रमजान ईद दिन विशेष

कोरोनाबाधित हिंदू धर्मीय रुग्णावर  मुस्लिम बांधवांनी केला अंत्यसंस्कार!
    कोरोनाच्या भीतीने वडिलांचे पार्थिव       सोडून पळाला मुलगा


नीलिमा शिंगणे-जगड
अकोला:भारता मध्ये धर्म,भाषा,प्रांत अश्या विविधतेत एकता आणि अखंडता आजही कायम असल्याचे अनेक प्रसंगातून समोर येते.असाच काहीसा प्रसंग अकोल्यात एका कोरोना बाधित हिंदू धर्मीय रूंग्णावर मुस्लिम बांधवांनी केलेला अंत्यसंस्कार.
कोरोनामुळे आता नाते आणि संबंधात दुरावा निर्माण होत असल्याचं दिसत आहे .अकोल्यात एका कोरोनाबाधित रुग्णाच काल रात्री निधन झाले. घरांमध्ये फक्त त्यांची पत्नी. मुलगा बाहेरगावी. मात्र, दुसरे कोणी नातेवाईक नसल्याने अंत्यविधी करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. हे पाहून गेल्या दोन महिन्या पासून कोरोनाच्या काळातही सेवा देणाऱ्या मुस्लिम समाजाच्या काही जागृत आणि संवेदनशील व्यक्तींनी या कोरोना बाधित रुग्णाचा अंत्यविधी हिंदू पद्धतीने अकोल्यातील मोहता मिल मोक्षधाम येथे केला.
मृत व्यक्तीच्या मुलाने मात्र आपल्याच  वडिलांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणे टाळले. या घटनेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनात कर्तव्य बजावणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्याला मोठं दुःख झाले .
मृत व्यक्तीचा मुलगा नागपूरला वास्तव्याला आहे. वडिलांच्या मृत्यूची बातमी कळताच तो अकोल्यात दाखल तर झाला; मात्र ' कोरोनाच्या धास्तीने त्याने आपल्या वडिलांच्या अंत्यसंकाराला उपस्तिथ राहणे टाळले. वडिलांच्या अंत्यविधीला लागणार खर्च देऊन रुग्णालयातून त्याने पाय काढला. मात्र ,आपली जवाबदार आणि माणुसकीच्या नात्याने मुस्लिम बांधवांनी या रुग्णाचा अंत्यविधी पार पडला.वसीम खान समीर खान या मुस्लिम युवकाने हिंदू पद्धतीने या पार्थिवाला मुखाग्नी दिली.
या घटनेमुळे समाजातील दोन्ही बाजू समोर आली. माणुसकी जपणारे आणि माणुसकी हरपलेली माणसे असे दोन चेहरे समोर आले. एक जो ज्याचा मृत व्यक्ती सोबत कोणतेही नातेसंबंध नाही;आणि दुसरा जो स्वतःच्या वडिलांच्या पार्थिवाला अनोळखी लोकांच्या हाती सोपवून पळ काढला. कोरोनाच्या काळात माणुसकी न हरवता ती जिवंत ठेवा, हाच संदेश या घटनेतून मुस्लिम तरुणांनी दिला.
.........


टिप्पण्या