corona virus news:आकड्यांचा योगायोग!अकोल्यात २३ तारखेला २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; मृतांची संख्याही झाली २३

आकड्यांचा योगायोग!

अकोल्यात २३ तारखेला २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; मृतांची संख्याही झाली २३



नीलिमा शिंगणे-जगड

अकोला,दि.२३ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अकोल्यात दिवसेंदिवस  वाढत असून, शनिवार, २३ मे रोजी २३ रुग्णांचा वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर आजपर्यँत कोरोनाने मृत्यू झालेले रुग्ण संख्या देखील २३ झाली आहे.आता अकोल्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३७८ झाली आहे, ही बाब अकोलेकरची चिंता वाढविणारी आहे.

शनिवारी दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे १५३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १३० अहवाल निगेटीव्ह तर २३ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. काल (दि.२२) व आज (दि.२३) मिळून आणखी  १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील सात जणांना घरी पाठवण्यात आले आहे तर उर्वरित सहा जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या ३७८ झाली आहे.  तर आजअखेर प्रत्यक्षात १३६ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण ३६३९ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ३५२२ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ३१४४ अहवाल निगेटीव्ह तर ३७८ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व  ११७ अहवाल प्रलंबित आहेत.

आजपर्यंत एकूण ३६३९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३३९१, फेरतपासणीचे १०९ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १३९ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३५२२ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३२७४ तर फेरतपासणीचे १०९ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १३९ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ३१४४ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ३७८ आहेत. तर आजअखेर ११७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

 २३ पॉझिटिव्ह

आज दिवसभरात १५३ अहवाल प्राप्त झाले त्यात २३ अहवाल पॉझिटीव्ह तर १३० निगेटीव्ह आले. आज सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या सात रुग्णांपैकी सहा महिला व एक पुरुष असून त्यात पाच जण फिरदौस कॉलनी येथील रहिवासी असून उर्वरित एक माणिक टॉकीज जवळ टिळकरोड तर अन्य लोहिया नगर खोलेश्वर येथील रहिवासी आहे. तर आज सायंकाळी पॉझिटिव्ह आलेल्या १६ रुग्णांपैकी नऊ महिला व सात पुरुष असून त्यात दोनजण फिरदोस कॉलनी, दोन जण लोहिया नगर खोलेश्वर येथील रहिवासी आहे. तर उर्वरित  माळीपुरा, मोहम्मद अली रोड, नानकनगर निमवाडी,  चांदखा प्लॉट वाशीम बायपास,  गोरक्षण रोड मलकापूर, यमुना संकुल, श्रावगी प्लॉट,  हरिहर पेठ,   इकबाल कॉलनी मोहता मिल जवळ, मलकापूर,  रेल्वे झोन रामदास पेठ, दसेरा नगर हरिहर पेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

१३ जणांना डिस्चार्ज

तसेच काल (दि.२२) रात्री पाच जणांना तर आज (दि.२३) आठ जणांना  असा  १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील सहा जण कोवीड केअर सेंटरला निरीक्षणात आहेत. तर सात जणांना घरी सोडण्यात आले आहे. काल (दि.२२) रात्री पाच जणांना डिस्चार्ज देण्यात त्यातील दोघे खैर मोहम्मद प्लॉट येथील तर अन्य फिरदौस कॉलनी, आगर वेस व अकोट फैल येथील रहिवासी आहेत. या पाचही जणांना घरी सोडण्यात आले आहे.

आज (दि.२३) दुपारी  आठ  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या आठही महिला आहेत. त्यातील दोघींना घरी सोडण्यात आले आहे. त्या दोघी फिरदौस कॉलनी व  सुभाष चौक येथील रहिवासी आहेत. तर अन्य सहा महिलांना  संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले असून त्यात दोघी जणी  फिरदौस कॉलनी येथील तर अन्य   रेवतीनगर, सुभाष चौक, माणिक टॉकीज जवळ, लोहिया नगर येथील रहिवासी आहेत.

१३६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आता सद्यस्थितीत ३७८  जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील २३ जण (एक आत्महत्या व २२ कोरोनामुळे) मयत आहेत. काल शुक्रवार दि.२२ रोजी रात्री पाच तर आज (दि.२३) आठ जणांना असा १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या २१९  झाली आहे. तर सद्यस्थितीत १३६ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान आज अखेर ३४२० प्रवासी आले आहेत. त्यापैकी १९४८ गृहअलगीकरणात तर १३९ जण संस्थागत अलगीकरणात  असे २०८७ जण अलगीकरणात आहेत. तर १२०० जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी  पूर्ण झाला आहे.  तर १३३ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

......


टिप्पण्या