corona virus news:अकोल्यात आतापर्यंत २२० कोरोना पॉझिटिव्ह!१०३ रुग्ण घेताहेत उपचार!

अकोल्यात आतापर्यंत २२० कोरोना पॉझिटिव्ह!

 १०३ पॉझिटिव्ह रुग्ण घेताहेत उपचार

अकोला,दि.१६ : आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे ९५ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ९३ अहवाल निगेटीव्ह तर दोन अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता  पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींची एकूण संख्या २२० झाली आहे. आजअखेर प्रत्यक्षात १०३ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण २४६५ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी २२३८ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण २०१८ अहवाल निगेटीव्ह तर २२० अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व  २२७ अहवाल प्रलंबित आहेत.

आजपर्यंत एकूण २४६५ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २२४४, फेरतपासणीचे १०९ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ११२ नमुने होते. आजपर्यंत एकूण २२३८ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २०१७ तर फेरतपासणीचे १०९ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ११२ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २०१८ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल २२० आहेत. तर आजअखेर २२७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

आज दोन महिला पॉझिटिव्ह

आज दिवसभरात प्राप्त झालेल्या ९५ अहवालात ९३ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर दोन अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज पॉझिटीव्ह आढळलेल्या दोन्ही रुग्ण महिला असून त्या जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित झालेल्या आहेत. त्या २१ व २२ वर्षाच्या असून त्यातील एक फिरदौस कॉलनी लकडगंज तर अन्य मेहरुन्नीसा फंक्शनल हॉल लकडगंज येथिल रहिवासी आहेत.

१०३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आता सद्यस्थितीत  २२० जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील १७ जण (एक आत्महत्या व १६ कोरोनामुळे) मयत आहेत. तर गुरुवारी (दि.२३एप्रिल) सात जण व सोमवारी (दि.२७ एप्रिल) एका जणास, गुरुवारी (दि.३० एप्रिल) तिघांना आणि रविवार दि.३ मे रोजी दोघांना, बुधवार दि.६ मे  रोजी एकास, मंगळवार दि.१२ मे रोजी ६० जणांना तर गुरुवार दि.१४ रोजी आधी १२ व नंतर रात्री उशीरा २८ असे ४० जणांना म्हणजेच एकूण १०० जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत १०३ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे

टिप्पण्या