corona virus news:अकोल्यात आतापर्यंत १६८ पॉझिटिव्ह रुग्ण!१३५ रुग्ण घेताहेत उपचार

अकोल्यात आतापर्यंत १६८ पॉझिटिव्ह रुग्ण!

१३५ रुग्ण घेताहेत उपचार!

अकोला,दि.१२: आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे ८१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ७२ अहवाल निगेटीव्ह तर नऊ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता  पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींची एकूण संख्या १६८ झाली आहे.दरम्यान आज सायंकाळी पाच जणांना पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजअखेर प्रत्यक्षात १३५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण १९२१ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी १६८४ अहवाल आले आहेत.आजअखेर एकूण १५६१ अहवाल निगेटीव्ह तर १६८ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व  २३७ अहवाल प्रलंबित आहेत.

आजपर्यंत एकूण १९२१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १७२१, फेरतपासणीचे ९८ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०२ नमुने होते. आजपर्यंत एकूण १६८४ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १४८४ तर फेरतपासणीचे ९८ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०२ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १५१६ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १६८ आहेत. तर आजअखेर २३७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

आज दिवसभरात प्राप्त झालेल्या ८१ अहवालात ७२ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर नऊ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुणांपैकी  आज सकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णात एक दीड वर्षाचा बालक ,एक आठ वर्षाचा मुलगा, एक ६२ वर्षीय इसम तर एक २३ वर्षीय महिला असून हे सर्व जण भवानी पेठ तारफ़ैल या भागातील रहिवासी आहे. तर आज सायंकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या पाच रुग्णांपैकी तीन महिला व दोघे पुरुष आहेत.ते खैर मोहम्मद प्लॉट, भीमनगर व तिघेजण गवळीपूरा या भागातील रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

पाच जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज सायंकाळी पाच जणांना पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.त्यातील चौघे कलाल की चाळ व एक फतेह चौक येथील रहिवासी आहेत. हे पाचही जण दि.२८ एप्रिल रोजी दाखल झाले होते. आज पुर्ण बरे होऊन व त्यांचे सर्व अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला व सायंकाळी डिस्चार्ज करुन निरोप देण्यात आला.

१३५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आता सद्यस्थितीत  १६८ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील १४ जण (एक आत्महत्या व १३ कोरोनामुळे) मयत आहेत.  तर गुरुवारी (दि.२३एप्रिल) सात जण व सोमवारी (दि.२७ एप्रिल) एका जणास, गुरुवारी (दि.३० एप्रिल) तिघांना आणि रविवार दि.३ मे रोजी दोघांना, बुधवार दि.६ मे  रोजी एकास व आज (मंगळवार दि.१२ मे) पाच जणांना असे १९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत १३५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

......

टिप्पण्या