corona virus news:अकोला@516: फिरदौस कॉलोनीतील रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यु

अकोला@516: फिरदौस कॉलोनीतील रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यु

अकोला,दि.२८: कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंतेची बाब ठरत आहे.  आज गुरुवारी दिवसभरात (सायंकाळी सात वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे २०१अहवाल प्राप्त झाले. त्यातील १९२ अहवाल निगेटीव्ह तर नऊ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज दुपारनंतर ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातल्या सात जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित २७ जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.  दरम्यान उपचार घेतांना फिरदौस कॉलोनी येथील राहवासी असलेले  ८० वर्षिय वृद्ध मरण पावले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५१६ झाली आहे.  तर आजअखेर प्रत्यक्षात १३८ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ४८९५ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४६२६, फेरतपासणीचे ११० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १५९ नमुने होते. आजपर्यंत एकूण ४८०८ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४५३९ तर फेरतपासणीचे ११० व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १५९ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ४२९२ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ५१६ आहेत. तर आजअखेर ८७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

आज नऊ पॉझिटिव्ह

आज सकाळी  प्राप्त अहवालात केवळ एक जणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आज सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेला रुग्ण हा ४६ वर्षीय पुरुष असून सोनटक्के प्लॉट येथील रहिवासी आहे. तर आज सायंकाळी प्राप्त आठ पॉझिटीव्ह अहवालात सहा पुरुष व दोन महिला आहेत.  हे रुग्ण सनगर कॉलनी वाशीम बायपास,  राऊतवाडी,  गायत्रीनगर कौलखेड, सिंधी कॅम्प,  कमलानेहरुनगर,  हरिहरपेठ, तेलीपुरा, गोरक्षण रोड मलकापूर येथील रहिवासी आहेत.

३४ जणांना डिस्चार्ज

आज दुपारी  ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील सात जणांना घरी तर उर्वरित २७ जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. त्यात  १८ पुरुष व  १६ महिला रुग्ण आहेत.

एका रुग्णाचा मृत्यू

आज एका रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण ८० वर्षीय वृद्ध असून फिरदौस कॉलनी येथील रहिवासी आहे.  हा रुग्ण दि.१५ रोजी दाखल झाला होता. त्याचा अहवाल दि.१७ रोजी पॉझिटीव्ह आला होता. त्याचा आज उपचार घेतांना मृत्यू झाला.

१३८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आता सद्यस्थितीत ५१६  जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील २९ जण (एक आत्महत्या व २८ कोरोनामुळे) मयत आहेत.  तर आज ३४ जणांना  डिस्चार्ज दिला आहे. आता डिस्चार्ज दिलेल्या  एकूण  व्यक्तींची संख्या ३४९  झाली आहे. तर सद्यस्थितीत १३८  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी तीन रुग्ण हे मुर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत तर एक जण कोविड केअर सेंटरला दाखल आहे,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या