- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आज 16 पॉझिटिव्ह; रेल्वे कॉलोनीत 3 नवे रुग्ण!
*जिल्हा माहिती कार्यालय,अकोला*
*कोरोना अलर्ट*
*आज गुरुवार दि.२१ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-१०४*
*पॉझिटीव्ह-१६*
*निगेटीव्ह-८८*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी प्राप्त अहवालात नऊ पुरुष तर सात महिला आहेत. त्यात रेल्वे कॉलनी जठारपेठ येथील तीन जण, फिरदौस कॉलनी येथील दोन, डाबकी रोड येथील दोन, नायगाव येथील दोन तर रजतपुरा, ज्योतीनगर सिव्हिल लाईन्स, न्यू राधाकिसन प्लॉट, गोरक्षण रोड, सोनटक्के प्लॉट, पुरपिडीत कॉलनी अकोट फैल, लक्ष्मीनगर येथील प्रत्येकी एक जण आहेत.
दरम्यान काल (दि.२०) भिमचौक अकोट फैल येथील रहिवासी असलेला ६८ वर्षीय रुग्ण उपचार घेतांना मयत झाला आहे. हा रुग्ण दि.१८ रोजी दाखल झाला होता.
तसेच काल दि.२० रोजी रात्री २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील २१ जण कोवीड केअर सेंटरला निरीक्षणात आहेत. तर तिघांना घरी सोडण्यात आले आहे.
हे रुग्ण अकोली गितानगर-चार, आंबेडकरनगर- चार, भिमचौक अकोट फैल-तीन, अकोट फैल भवानी पेठ-दोन, तर फिरदौस कॉलनी, डाबकी रोड, अकोट फैल, खोलेश्वर, रंगारहट्टी बाळापूर, सुभाष चौक, नेहरु नगर, खदान, सिव्हिल लाईन, खैर मोहम्मद प्लॉट, रामदास पेठ पोलीस क्वार्टर येथिल प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-३२४*
*मयत-२१(२०+१),डिस्चार्ज-१९१*
*दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-११२*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा