corona effect:स्थलांतरित मजूर गोंडकरिता रवाना

स्थलांतरित मजूर गोंडकरिता रवाना

अकोला,दि.९ : येथून उत्तर प्रदेशातील गोंड येथे जाण्यासाठी ४२७ स्थलांतरीत मजूर हे १६ एस,.टी. बसेस मधून अमरावती रेल्वेस्टेशनला रवाना झाले. अमरावती येथून सायंकाळी विशेष रेल्वे गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे.

आज सकाळी अकोला बसस्थानकातून तब्बल १६ बस गाड्यांमधून हे  स्थलांतरीत मजूर रवाना झाले. त्यावेळी बसस्थानकावर निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, तहसिलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते. यावेळी जाणाऱ्या प्रत्येक मजूराला प्रवासात पिण्याच्या पाण्याची बाटली, बिस्कीटे आदी देण्यात आले. त्यांची दुपारच्या जेवणाची व्यवस्था अमरावती रेल्वे स्टेशन येथे करण्यात आली होती.  दुपारपर्यंत अमरावती रेल्वे स्टेशन येथे पोहोचून तेथे दुपारी जेवण व विश्रांती घेऊन हे मजुर सायंकाळी विशेष रेल्वे गाडीने गोंड उत्तर प्रदेश येथे रवाना होतील. प्रवासातही त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांनी दिली.

टिप्पण्या