Corona Alert:एकाच दिवशी आठ पॉझिटीव्ह;कोरोनाचा पश्चिम झोन मध्ये शिरकाव

एकाच दिवशी आठ पॉझिटीव्ह;कोरोनाचा पश्चिम झोन मध्ये शिरकाव

अकोला,दि.२:आज सकाळी साडेनऊ वाजता अहवाल प्राप्त झाले तेव्हा सहा जण पॉझिटीव्ह रुग्ण आढळले होते. तर सायंकाळी पाच वाजता प्राप्त अहवालात दोघा जणांचे अहवाल प्राप्त झाले. सकाळी प्राप्त अहवालातील एक रुग्ण हा मोहम्मद अली रोडवरील रहिवासी आहे. तर अन्य पाच हे अकोट फैल, मेहेरनगर, सुधीर कॉलनी,  शिवाजी नगर, कमलानगर अशा पाच वेगवेगळ्या भागातील रहिवासी आहेत. हे पाचही जण एकाच खाजगी रुग्णालयात काम करतात. त्यात डॉक्टरचाही समावेश आहे. दि. २८ रोजी अत्यवस्थ अवस्थेत दाखल ज्या महिला रुग्णाचा लगेचच मृत्यू झाला होता, त्या महिलेच्या संपर्कात हे पाचही जण आले होते. शासकीय रुग्णालयात येण्याआधी  ती महिला या खाजगी रुग्णालयात गेली होती. तर सायंकाळी अहवाल आलेले रुग्णांत एका ३० वर्षीय महिलेचा समावेश असून  अन्य एक ४० वर्षीय पुरुष आहे आणि ते फतेह चौक व बैदपूरा या भागातील रहिवासी आहेत, त्यांचे संपर्क शोधण्याचे काम सुरु आहे.
 दरम्यान आजअखेर ७८८ प्रवासी आले आहेत. त्यापैकी  ३२४ गृहअलगीकरणात व ९८ संस्थागत अलगीकरणात असे ४२२ जण अलगीकरणात आहेत. तर २४५ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी  पूर्ण झाला आहे.  तर १२१ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली

आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे ५८ अहवाल प्राप्त झालेत्यातील ५० अहवाल निगेटीव्ह  तर आठ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान शुक्रवारी (दि.१) दाखल एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान आता पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या ४० झाली असून प्रत्यक्षात २४ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजअखेर एकूण ७७० नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ७२९ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ६८९ अहवाल निगेटीव्ह तर ४०अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व  ४१ अहवाल प्रलंबित आहेत.
आजपर्यंत एकूण ७७० जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ६०२, फेरतपासणीचे ९४ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ७४ नमुने होते. आजपर्यंत एकूण ७२९ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५६१ तर फेरतपासणीचे ९४ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ७४ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ६८९ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ४०  आहेत.
आज प्राप्त झालेल्या ५८ अहवालात ५० अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर आठ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

आता सद्यस्थितीत  ४० जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील पाच जण मयत आहेत.  तर गुरुवारी (दि.२३) सात जण व सोमवारी (दि.२७) एका जणास व गुरुवारी (दि.३०) तिघांना असे ११ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत २४ जण उपचार घेत आहेत.
दरम्यान   शुक्रवारी (दि.१)  पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या ७९ वर्षीय पुरुष रुग्णाचे उपचारा दरम्यान निधन झाले,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून देण्यात आली.

टिप्पण्या