शेतकरी कापूस:शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी कापूस जाळा आंदोलन

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी कापूस जाळा आंदोलन

अकोला:शेतकरी संघटने तर्फे कापूस शेतकऱ्यांच्या प्रश्ना कडे लक्ष वेधण्याकरिता कापूस जाळा आंदोलन राज्यभर जाहीर करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत शेतकरी संघटना अकोट -तेल्हाराच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्या समोर कापूस जाळा आंदोलन करण्यात आले. 

महाराष्ट्रात सीसीआयची कापूस खरेदी सुरू आहे. ही खरेदी संथ गतीने सुरू आहे. शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. पेरणीचा हंगाम समोर आलेला आहे. शेतकऱ्यांना पैशाची अडचण आहे.नेहमी प्रमाणे शासकीय खरेदी संथ गतीने सुरू आहे.सीसीआय फक्त लांब धाग्याचा कापूस विकत घेत आहे. मध्यम व अरुंद बाजारपेठ मध्ये मागणी नाही.सी सी आई मध्ये तीन ग्रेड आहेत लांब धाग्याचा, मध्यम,व अरुद धाग्याचा परंतु शासनाने सीसीआयला फक्त लांब धाग्याचा कापूस असे आदेश आहेत त्यामुळे शासनाने सर्व ग्रेडचा कापूस खरेदी करावा,अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. तसेच गुणवत्ता करिता सीसीआयने ग्रेडर नेमलेला आहे परंतु बहुतेक ठिकाणी कापसाच्या गुणवत्ता मध्ये जीन मालक हस्तक्षेप करत असल्याने शेतकऱ्यांना अडचण निर्माण झालेली आहे. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी कापूस जाळा आंदोलन:पहा व्हिडीओ

शासनाने मालाची  गुणवत्ता तपासणी करिता सीसीआय ग्रेडरची नेमणूक केलेली असून सुद्धा भाडे तत्वावर दिलेले जीन मालक शेतकऱ्यांना त्रास देत आहेत समोर खरीपाची पेरणीचा हंगाम आहे. एकीकडे शासनाचे धोरण फक्त लांब धाग्याचा कापूस खरेदी करण्याचे धोरण तर दुसरीकडे कोणतेही अधिकृत अधिकार नसताना जिनींग मालकाचा कापसाच्या गुणवत्तेत हस्तक्षेप यामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत अडकलेला आहे. शासकीय धोरणाचा निषेध व जिनिग मालकाचा हस्तक्षेप याचा निषेध नोंदविण्याकरिता फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करून शेतकरी संघटना अकोट तेल्हारा यांच्या संयुक्तरित्या  कापूस जाळा आंदोलन करण्यात आले. 

या आंदोलनामध्ये शेतकरी संघटना माहिती व तंत्रज्ञान आघाडीचे जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर,तेल्हारा तालुका प्रमुख निलेश नेमाडे, शेतकरी संघटना युवा आघाडी दिनेश देऊळकार, कुशल राऊत, दिनेश गिर्हे, आकाश देऊळकार, बाळू बोदडे, प्रल्हाद भोपळे, गणेश इंगळे, अनिल सिरसागर, विश्वनाथ रेळे, शरद उमाळे, विशाल निमकर्डे, शाम राऊत,ऋषिकेश निमकर्डे,सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

टिप्पण्या