नियमाची पायमल्ली करणाऱ्या स्वीटमार्टवर मनपाची कारवाई

नियमाची पायमल्ली करणाऱ्या        स्वीटमार्टवर मनपाची कारवाई
अकोला : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक शहरात ऑनलाईन विक्रीला सुरुवात झाली आहे .मात्र अनेक ठिकाणी  नियमाची पायमल्ली होतांना दिसत आहे. अकोल्यात ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी अनेक व्यवसायांना मालाची ऑनलाईन विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे यात मिठाई - फरसाण दुकानांचाही समावेश आहे.. या दुकानांना आपला माल फक्त ऑनलाईन विकण्याची परवानगी आहे मात्र अकोल्यातील अनेक प्रतिष्ठान सर्रासपणे माल थेट दुकानावर विकत असल्याचे चित्र आहे .अशाच अकोल्यातील जठारपेठ चौकातील प्रसिद्ध गणेश स्वीटमार्टवर महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी कारवाई केली .हे प्रतिष्ठान ग्राहकांना मालाची विक्री आपल्या दुकानातून करत असल्याचं आढळून आल्याने दुकानदाराला पन्नास हजाराच दंड ठोठावण्यात आला आहे.लॉक डाउनच्या काळात महापालिकेतर्फे दंड आकारण्याचीही सर्वात मोठी कारवाई आहे .वास्तविकता पाहता ही कारवाई अन्न व औषधी विभागाकडून अपेक्षित होती मात्र या विभागाने डोळेझाक केल्यामुळे ही कारवाई महापालिकेला करण्याची वेळ आली आहे .
........

टिप्पण्या