- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मांगुळ मिर्झापुरच्या सरपंचांना गावात येण्यास मनाई करावी-गावकऱ्यांची मागणी
ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांचे जी. प. सी. ई. ओ. सहित अधिकाऱ्यांना निवेदन
अकोला: सध्या जगात कोरोना या महा भयंकर विषाणू च्या धास्तीने सर्वच त्रासले आहेत या विषाणू पासून बचाव करण्यासाठी सुरक्षित अंतर राखने तसेच कोरोनाग्रस्त परिसरातून येणाऱ्यांना रोकने हाच एकमेव पर्याय उपलब्ध असल्याने, बार्शीटाकळी तालुक्यातील मांगुळ मिर्झापुर या गावाच्या सरपंच दर्शना पहुरकर ह्यांना गावातून येणे जाणे करण्यास मज्जाव करण्यात यावा किंवा त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन आज मांगुळ मिर्झापुर ग्रामपंचायत उपसरपंच आणि सदस्य तसेच नागरिकांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ,सह जिल्ह्यातील सर्व जबाबदार अधिकारी यांना देण्यात आले आहे .
सध्या अकोला शहर हे कोरोनाचे विदर्भातील हॉटस्पॉट बनलेले आहे. आणि मांगुळ मिर्झापुरच्या सरपंच दर्शना पहुरकर ह्या अकोला शहरातील खडकी येथे वास्तव्य करीत आहेत, असे असतानाही त्या गावात ये जा करीत आहेत. त्यांनी कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी केलेली नाही. त्यामुळे त्यांच्यापासून गावात कोरोना संक्रमण होण्याचा धोका वाढलेला आहे. हे संभावित संक्रमण होऊ नये यासाठी आम्ही उपसरपंच आणि सदस्य ग्रामपंचायतच्या मासिक सभेलाही उपस्थित राहत नाही. त्यामुळे हे संभावित संक्रमण थांबविण्यासाठी मिर्झापुरच्या सरपंच पहुरकर यांना गावात ये जा साठी मज्जाव करण्यात यावा आणि गावातील नागरिकांना कोणतीही असुविधा होऊ नये, यासाठी तोपर्यंत सरपंच पदाचा पदभार उपसरपंच यांना देण्यात यावा. त्यांची तसेच सरपंच यांची वैद्यकीय तपासणी करून मांगुळ मिर्झापुरच्या नागरिकांची आरोग्याची सुरक्षा करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
.........
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा