रवींद्रनाथ टागोर जयंती दिनविशेष

रवींद्रनाथ टागोर जयंती दिनविशेष
रवींद्रनाथ टागोर यांना "गुरुदेव" असेही संबोधले जाते.रवींद्रनाथ एक ब्राम्होपंथीय चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी ,संगीतकार होते .एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकाच्या प्रारंभी त्यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्य व बंगाली संगीतात आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियातील पहिले "नोबेल "विजेते होते ."गीतांजली" म्हणजे "रवींद्रनाथ टागोर" असे समीकरण होऊन गेले आहे. रवींद्रनाथांना "गीतांजली "या अप्रतिम काव्यसंग्रह बद्दल इसवीसन 1913 साली "नोबेल पारितोषिक" मिळाले आणि जगात भारताची मान उंचावली. जगातील उत्तम काव्याबद्दलचे ते सव्वा लाख रुपयांचे  बक्षीस हे लाखमोलाचे ठरले.

 रवींद्रनाथांचा जन्म ७ मे इसवीसन १८६१ साली कलकत्त्यात झाला. लक्ष्मी आणि सरस्वती या दोन्हींचा वरदहस्त त्यांच्या कुटुंबावर होता .त्यांचे वडील देवेंद्रनाथ हे महान विद्वान होते .रवींद्रनाथांनी बॅरिस्टर व्हावे असे त्यांना वाटे .रवींद्र यांना लहानपणापासून सृष्टी सौंदर्याची आवड होती. वडिलांच्या आग्रहास्तव रवींद्रनाथ विलायतेला गेले. पण तिथे कायद्याचा अभ्यास करण्याऐवजी त्यांनी काव्याचा अभ्यास केला. रवींद्रनाथांना वडिलांनी परत भारतात बोलावले. रवींद्र यांचे मन कशातच रमेना. एकांतात राहणे त्यांना फार आवडे. निसर्गाचे वेड तर त्यांना लहानपणापासूनच होते. त्यांनी "गीतांजली" लिहिली. त्यांना लोकांनी "कवि सम्राट "पदवी बहाल केली. रवींद्रनाथांचे नाव शांतिनिकेतनशी कायमचे निगडित आहे. शांतिनिकेतन आश्रमाची स्थापना ही त्यांची विशेष मोठी कामगिरी आहे.या आश्रमाचे प्रगत स्वरूप म्हणजे "विश्व भारती विद्यापीठ" होय. नोबेल पारितोषिकाचे पैसे, या विद्यापीठासाठी रवींद्रनाथांनी खर्च केले. या विद्यापीठात विविध कलांचे शिक्षण, जगातल्या विविध देशातील विद्यार्थी घेत असतात .रवींद्रनाथांनी जगभर हिंडून ,आपल्या कविता गाऊन दाखवून जग जिंकले ."जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता "हे गाणे तर आता आपल्या देशाचे राष्ट्रगीत म्हणून आपण मान्य केले आहे. राष्ट्रगीत म्हणताना प्रत्येकाला त्यांची आठवण येते .रवींद्रनाथ टागोरांचा मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात भव्य पुतळा आहे .तिथे होणारे नाट्यप्रयोग ही रविद्रांची कलाप्रेमीची अवीट स्मृति आहे.
                                        लेखक
                                प्रा. वंदना शिंगणे
                                        अकोला

                                       

टिप्पण्या