सर्वाधिक तापमान:अकोलेकर दुहेरी संकटात; आज सर्वाधिक तापमानाची नोंद!जगात चौथ्या क्रमांकावर

अकोलेकर दुहेरी संकटात; आज सर्वाधिक तापमानाची नोंद!
जगात चौथ्या क्रमांकावर!
अकोला: अकोल्यात आज सोमवार, २५ मे रोजी या उन्हाळ्यात सर्वाधिक 47.4℃ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. तापमानाचा हा आकडा महाराष्ट्रात सर्वाधिक असून , भारतात दुसरा आणि जगात चौथा क्रमांकावर आहे.आज देशात सर्वाधिक 47.5℃ तापमानाची नोंद राजस्थान येथील चुरू येथे करण्यात आली. तर जगात सर्वाधिक तापमान इराक येथे 50.5℃ ची नोंद करण्यात आली.
एकीकडे कोरोना सोबत सामना करीत असताना,अकोलेकरांना आता सुर्यदेवतेचा कोपही सहन करावा लागत आहे.अकोलेकर आता दुहेरी संकटात साप डले आहेत. वाढते तापमान आणि वाढता कोरोना संसर्ग बघता,अकोलेकरांना घरातच थांबणे अत्यावशक झाले आहे.

टिप्पण्या