तळीरामांसाठी खुशखबर!!!ऑनलाईन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध!

तळीरामांसाठी खुशखबर!!!

ऑनलाईन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध!

        file photo

मुंबई दि. २२ : मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण १० हजार ७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी ५ हजार ८६४ अनुज्ञप्ती सुरू सुरू आहेत. आज दिवसभरात ३४ हजार ३५२ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात  आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

राज्य शासनाने ३ मे पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद  मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. सदर  मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राज्यातील ३३ जिल्ह्यात ( ३ कोरडे जिल्हे वगळता गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर ) काही जिल्ह्यांमध्ये सशर्त अनुज्ञप्ती सुरू आहे तर काही जिल्ह्यांमध्ये मद्य विक्री बंद आहे. राज्यात १५ मे पासून घरपोच मद्यविक्री योजनाअंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येतआहे. आज एका दिवसात अंदाजित ३४,३५२ ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थलावर ऑनलाईन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

ऑनलाईन मद्यसेवन परवाना घेताना येतअसलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची सुधारणा करण्यात आली असून आता इच्छुक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, तसेच IOS प्रणालीव्दारे ऑनलाईन परवाने घेऊ शकतात. तसेच कोणालाऑनलाईन परवाना घ्यायचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्कविभागाच्या सर्व अधीक्षक/निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने Offline पध्दतीने सुध्दा उपलब्ध आहेत. सदर मद्यसेवन परवाने एक वर्षाकरीता रु.१००/- किंवा आजीवन परवान्याकरिता रु.१,०००/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकतात. तरी मद्यविक्री करणाऱ्या दुकानांसमोर गर्दी न करता मद्यसेवन परवाने घेऊन मद्य घरपोच सेवेचा लाभ घ्यावा.

दि.२४ मार्च पासुन राज्यात लॉकडाऊन सुरु आहे.महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधून होणारी अवैध मद्य तस्करीरोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असून १२ सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहेत.काल २० मे रोजी राज्यात ८३ गुन्हे नोंदविण्यात आले असून ३२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. रु.३१.५७/- लाखकिंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि.२४ मार्च पासुन २० मे पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण ५९८४ गुन्हे नोंदविण्यात आले असून २६६४ आरोपींना अटककरण्यात आली आहे. ५९९ वाहने जप्त करण्यात आली असूनरु.१६.१६/- कोटी किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष २४X७ सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.  यासाठी टोल फ्री क्रमांक -  १८००८३३३३३३  व्हाट्सअप क्रमांक – ८४२२००११३३ हा असून  ई-मेल - commstateexcise@gmail.com असा आहे.

......

टिप्पण्या