एचटीबिटी वरील धाडी थांबवा शेतकऱ्यांवर कार्यवाही करु नका- वामनराव चटप

एचटीबिटी वरील धाडी थांबवा शेतकऱ्यांवर कार्यवाही करु नका- वामनराव चटप
अकोला,दि ३०: एचटीबीटी वर पडणाऱ्या धाडी थांबविण्या संदर्भात शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळाने एड वामनराव चटप यांचे नेत्तृत्वात राज्याचे गृहमंत्री नामदार अनिल देशमुख यांचेशी चर्चा केली.यावेळी ,विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते रामभाऊ नेवले, माजी कुलगुरु डॉ सि डी मायी, शेतकरी संघटनेचे नेते ललीत बहाळे, शेतकरी संघटना युवा आघाडीचे प्रमुख सतीश दाणी, अकोल्याचे सतीष देशमुख, तंत्रज्ञान आघाडीचे विजय निवल,कापुस आंदोलनाचे सेनापती मधुसुदन हरणे,सोशल मिडीयाचे राजेंद्र झोटींग, अकोला युवा आघाडीचे लक्ष्मीकांत कौठकर उपस्थित होते.
 या प्रसंगी डॉ  मायी यांनी तंत्रज्ञान विषयक माहीती दिली. या प्रसंगी एड वामनराव चटप  म्हणाले  की, लोकसभेत तारांकीत प्रश्नावर ,केंद्रीय पर्यावरण मंत्री बाबुल सुप्रियो यांनी, जी  एम बियाणे शरीराला घातक नाही. तेंव्हा राज्य सरकारने स्थानिक पातळी ट्रायल घेवुन नव्या तंत्रज्ञानाच्या पाठीशी राज्य सरकारने रहावे.विदर्भ आंदोलन समिती नि शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष राम नेवले म्हणाले १}एच टी बी टी वर बंधन असल्यामुळे बरेचदा बोगस बियाण्यामुळे शेतकर्यांची फसवणुक होवु शकते,२}राज्य सरकारने केंद्र सरकारवर दबाव आणुन तंत्रज्ञान खुले करण्या करीता प्रयत्न करावे.३}जगात जि एम तंत्रज्ञानामुळे सोयाबीनचे ऊत्पादन ४० क्विंटल पर्यन्त वाढले,जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर ऊत्पादन वाढले नाही.ललित बहाळे यांनी शेतकर्यांना जि एम तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळाले तर देशात क्रुषि ऊत्पादनात क्रांती होईल.नामदार अनिल देशमुख यांनी शेतकर्यांच्या प्रश्ना संदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले,अशी माहिती विलास ताथोड यांनी दिली.

टिप्पण्या