- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कोरोना आणि वाढते तापमानात अपुऱ्या सुविधेत कर्तव्यदक्ष पोलीस!
१६०० वाहन आणि २०० दुचाकी स्वारांवर कारवाई
नीलिमा शिंगणे-जगड
अकोला : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामूळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. कोरोना आणि वाढते तापमान असे दुहेरी संकट अकोलेकरांवर आहे. या दोन्ही संकटांसोबत पोलीस मात्र तटस्थपणे सामना करीत आहेत. प्रचंड उन्हातही पोलीस आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत . परंतू, असं असतांनाही उन्हापासून संरक्षणासाठी पोलिसांना कुठल्याही सुविधा मिळत नाही. मूलभूत सुविधा देखील पोलिसांकडे उपलबध्द नाहीत. परिणामी पोलिसांना जीवावर उदार होवून कोरोना सोबतच आता तीव्र उन्हाचाही सामना करावा लागत आहे.
मार्च ,एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तापमानात मोठी वाढ होते. त्यामुळे अकोल्यात दुपारच्या वेळी व्यवहार थंडावलेले दिसतात. दुपारच्या वेळी उन्हात बाहेर पडत जायचे असेल तर अकोलेकरांना एखाद्या सैनिकाला युद्धासाठी सज्ज होण्यास तयारी करावी लागते,तशी तयारी करावी लागते. डोक्याला दुपट्टा. काळा गॉगल. सन कोट, हॅण्डग्लोवज असे सर्व परिधान करूनच घराबाहेर पडावे लागते. घरामध्ये असताना एसी, कुलर,पंखा अश्या साधनांनी अकोलेकर उन्हापासून स्वतःचा बचाव करीत आहेत. मात्र,' ऑन ड्युटी 24 तास ' असलेले पोलिस मूलभूत सुविधांपासूनच वंचित आहेत.
गाडीच्या भन्नाट वेगाला आवर घालणाऱ्या आणि नियमांचं पालन करवून घेणाऱ्या शहर वाहतूक पोलीसांना तर आणखीन दिव्यांतून पार करावे लागते. लॉकडाउन मुळे वाहतूक जरी बंद असली तरी आवश्यक काम असणारी लोक रस्त्याने ये-जा करीत असतात. तर यामध्ये काही रिकामटेकडी लोकही बिनकामाचे रस्त्याने फिरत असतात. पोलिसांच्या समोरूनच (पळून जाण्याच्या बेतात असलेले) सुसाट वेगाने गाडी चालवतात. यामुळे पोलिसांवर विनाकारण कामाचा ताण वाढत आहे. परंतू अशाही परिस्थितीत वाहतूक पोलिस तापत्या उन्हातही कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. सध्या शहरामध्ये उड्डाण पूल , रस्ते निर्माण कार्य जोमाने सुरू आहे. यामुळे वाहतूक पोलिसांसाठी असलेली संरक्षण शेड आणि चौथरे, बेट, वाहतूक स्थळ आदी सुविधा विस्कळली आहे. तरीसुद्धा विनातक्रार पोलीस कर्तव्यदक्ष आहेत.
विदर्भात सध्या उष्णतेची लाट आहे , अकोला शहराचे तापमान गेल्या काही दिवसांपासून ४७ डिग्री पर्यंत पोहचले आहे. तापत्या उन्हात वाहतूक पोलिसांना आपली कामगिरी करतांनाच त्यांना नियमित कारवाई सुद्धा करावीच लागते. मात्र, लाखो रुपयांचा महसूल वसूल करून सरकारी तिजोरीत जमा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची झोळी मात्र रिकामीच आहे. अकोल्यातील पोलिसांची ही समस्या राज्यातील पोलिसांचं दुखः सांगणारी प्रातिनिधिक समस्या आहे.
विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई
''लॉकडाउनच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या १६०० वाहन आणि डबल सीट फिरणाऱ्या २०० दुचाकीं स्वारांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. कोरोनाच्या काळात अकोला पोलिसांना उन्हासोबतही दोन हात करावे लागत असल्याचे शहर वाहतूक पोलीस निरीक्षक (अकोला) गजानन शेळके यांनी सांगितले.''
.........
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा