मुर्तिजापुर येथे सीसीआयचे कापुस खरेदी केंद्र सुरु करण्यास परवानगी

मुर्तिजापुर येथे सीसीआयचे कापुस खरेदी केंद्र सुरु करण्यास परवानगी

          संंग्रहित चित्र

अकोला, दि.९ : भारतीय कपास निगम (सी.सी.आय.)  चे कापूस खरेदी केंद्र हे मुर्तिजापुर येथे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरु करण्यास परवानगी मिळाली असून मुर्तिजापुर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता येत्या सोमवार दि.११ पासून नोंदणी करता येणार असून प्रत्यक्ष खरेदी मंगळवार दि.१२ पासून सुरु होणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी कळविले आहे.

या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बच्चू कडू, केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे व स्थानिक आमदार हरिष पिंपळे  यांनी सतत पाठपुरावा केला होता.

मुर्तिजापुर कार्यक्षेत्रातील  कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस खरेदी होण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांची गैरसोय दूर होण्यासाठी  सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरु व्हावे असे आ. हरिष पिंपळे यांनी दि.२८ एप्रिल रोजी कळविले होते. यासंदर्भात दि.३० एप्रिल रोजी पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनीही बैठक घेऊन निर्देश दिले होते.  तसे केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनीही दि.६ रोजी आढावा बैठक घेऊन निर्देश दिले होते. त्यादृष्टीने भारतीय कपास निगम यांची कापूस केंद्र उघडण्याची प्रक्रिया पुर्ण झाली असून मंगळवार दि. १२ पासून खरेदी सुरु करता येणार आहे. त्यासाठी नोंदणीची सुरुवात दि. ११ पासून करता येणार आहे.

तरी मुर्तिजापूर कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी  सोमवार दि.११ पासून सकाळी ११ ते सायं ४ या वेळेत शेतकरी खालील क्रमांकावर फोन करुन नोंदणी करावी व  टोकण क्रमांक घ्यावा.

नितीन पाठक-9405153256

गावंडे मॅडम-7038692447

शेतकऱ्यांनी ही नोंदणी फोन वरुन करावयाची आहे त्यासाठी प्रत्यक्ष येण्याची गरज नाही. मंगळवार दि.१२ मे पासुन प्रत्यक्ष खरेदीस सुरुवात सुरु होईल, असे डॉ. लोखंडे यांनी कळविले आहे.

ही सर्व प्रक्रिया पार पाडतांना कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर  विविध प्रतिबंढात्मक उपाययोजनांचा अवलंब काटेकोरपणे करावा असे ही बाजार समितीच्या सभापती व सचिवांना कळविण्यात आले आहे.

कापूस खरेदी व विविध सुविधांबाबत माहितीसाठी सहकार विभागाची फेसबुक लिंक

अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी CCI मार्फत कापुस खरेदी, नाफेड ची खरेदी, पिककर्ज, कर्जमाफी योजना,APMC ई. बाबत नियमित माहीतीसाठी फेसबुक ग्रुपच्या खालील लिंकवर क्लिक करावे असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे यांनी केले आहे.

लिंक याप्रमाणे-

https://www.facebook.com/groups/2380735472207590/

टिप्पण्या