अहिल्याबाई होळकर यांची जयंती घरीच साजरी करा

अहिल्याबाई होळकर यांची जयंती घरीच साजरी करा
मल्हार गर्जना युवा मंचचे आवाहन

अकोला: दरवर्षी ३१ मे रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. परंतु यावर्षी देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे सर्वांनी घरीच राहून, सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करून जयंती घरीच साजरी करावी, असे आवाहन मल्हार गर्जना युवा मंचतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त कार्यक्रमासाठी जो खर्च होणार होता ती रक्कम यावेळी समाजातील काही गरजू लोकांना एक हात मदतीचा या उपक्रमातून देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मंचचे संस्थापक अध्यक्ष सुहास साबे यांनी दिली आहे.
दरवर्षी दरवर्षी ३१ मे रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती संपूर्ण देशात, विशेषत: महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यावर्षी या कार्यक्रमावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे या संकटकाळात सर्वांनी घरीच राहून, सरकारने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत जयंती घरीच साजरी करावी, तसेच या कार्यक्रमासाठी येणारया खर्चाची रक्कम समाजातील गरजू लोकांना एक हात मदतीचा या उपक्रमातून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी सर्वांनी घरी राहूनच ही जयंती साजरी करावी, असे आवाहन सुहास साबे यांच्यासह डॉ. प्रमोद पातुर्डे, शंकर खराटे, डॉ. सुरेश नागे, डॉ. अशोकराव पातुडे, प्रमोद पाचपोहे, शुभम वैतकार, प्रदीप पातुर्डे, अक्षय कात्रे, रवी बचे, दिनेश लवणकर, अंकुश वडे, निलेश पातुर्डे, गोपाल बचे, अमोल घाटोळे, रविद्र बोरशे, प्रकाश घाटोळ, शीतल कचरे, अभिजित पाचपोर, डॉ.निलेश जुमळे, कैलाश चाटे, महादेव लहाळे, संदीप वैतकार यांनी केले आहे.
-----------------------------

टिप्पण्या