जेष्ठ गांधीवादी कनुभाई मश्रूवाला यांचे निधन

जेष्ठ गांधीवादी कनुभाई मश्रूवाला यांचे निधन

अकोला,दि.२ : जेष्ठ गांधीवादी कनुभाई मश्रूवाला यांचे आज शनिवार,२ मे रोजी अकोला येथे निधन झाले.मृत्यूसमयी ते ९४ वर्षाचे होते.

कनूभाई यांचा महात्मा गांधी यांच्याशी पारिवारिक संबंध होता.कनूभाई यांच्या बहिणीशी महात्मा गांधी यांचे पुत्र मणीलाल यांचा विवाह झाला होता. त्यामुळे महात्मा गांधी यांचे अकोल्यात येणे-जाणे राहायचे. महात्मा गांधी यांचे नातू जेष्ठ विचारवंत, व्याख्याते तुषार गांधी  देखील अकोल्यात नेहमीच येत असतात.अशाप्रकारे गांधी परिवाराशी अकोल्याची नाळ जुळली आहे. अकोल्याच्या सामाजिक,सांस्कृतिक चळवळीचे प्रेरणास्थान कनुभाई मश्रुवाला होते. गांधी मार्गावरील खुले नाट्य गृहासमोर कनुभाईंचे निवासस्थान आहे. राहत्या घरी शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

कनूभाई यांची दुसरी बहिण ताराबेन यांनी सर्वोदय आश्रम काढुन समाजसेवेला आपले जीवन समर्पित केले होते. स्वातंत्र्याच्या आदोलनातही अकोला अग्रेसर होते.स्वदेशी शिक्षणाची मुहुर्तमेढ टिळक राष्ट्रीय शाळेच्या स्थापनेने अकोल्यात झाली.  राष्ट्रीय शाळेच्या अध्यक्षपदाची धुरा कनुभाई मश्रुवाला यांनी सांभाळली.त्यांच्या निधनामुळे अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाचा आधारवड कोसळला.

......






टिप्पण्या